मानवी शरीरात सर्वात आकर्षनाचा भाग म्हणजे माणसाचे केस. जर हे माणसाचे केस मोठे आणि लांब असतील तर तो खुप सुंदर दिसतो. खासकरून महिलासाठी केस हे खुप महत्त्वाचे समजले जातात.
तसेच आपल्याला केसाच्या समस्या निर्माण झाल्या तर मग आपण अनेक डॉक्टराचा सल्ला घेतो काहीचे केस चांगले राहतात तर काहीना साईड इफेक्ट होतो आणि समस्या वाढ होते.
केस गळतीसाठी एक नैसर्गिक उपाय आज आम्ही सांगणार आहोत. यामुळे तुमचे केस गळणे आयुर्वेदिकरित्या बंद होईल. तर यासाठी तुम्हाला कांदा लागेल. याचा रस तुमचे केस गळती थांबू शकतो.
कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्फत असतात त्याने तुमचे केस लांब होण्यास मदत होते. एक कांदा घेऊन त्याला बारीक चिरून मिक्सरला लावून बारीक करून त्याचा रस फक्त काढून घ्या.
केस पांढरे होणे, गळणे, पातळ होणे, वाढ न होणे यासारख्या अनेक समस्या या नैसर्गिक उपायाने दुर होणास मदत होते. मग हा रस चांगल्या प्रकारे शोधून घेतल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लिंबुचे थेंब टाकून घ्या.
कारण लिंबुने केसातील कोंडा कमी करण्यासाठी मदत होते आणि कांदाच्या रसामध्ये व्हिटीमीन A , B, C असतात. याने केसांची वाढ होण्यास मदत होते. यामध्ये शेवटी आपले रोजच्या वापरातील केसाला लावायचे तेल त्यामध्ये मिक्स करून घ्या पण हे तेल नारळाचे असले पाहिजे.
आपण लहानपणापासून पाहतो की, या नारळाचे तेल खुप उपयोग आहे. आपले आजी-आजोबा पण आपल्याला सांगत होते की, केसांना फक्त नारळाचे तेल वापरायचे. याने केस मजबूत आणि काळे राहण्यास मदत होते.
या मिश्रणात तयार केल्यावर आपण अंघोळीच्या आधी कमीतकमी 10 मिनिटे आधी केसच्या अगदी तळापासून लावा म्हणजे सगळीकडे हे रस पोहोचु शकेल.
या कांदाच्या रसाने जेवढी चांगली मसाज कराल तेवढे उपाय परिणामकारक ठरणार. याने तुमचे केस पांढरे होणे, सतत तुटणे, पातळ होणे यावर चांगला उपाय करते.
तसेच काही वेळा आपण गडबड करून काही उपाय करतो मग तेच काही इफेक्ट होताना दिसत नाही. त्यामुळे अगदी हळुवार या केसची रोज अंघोळीच्या आधी मसाज करावी. गडबडीत हे केस तुटण्याची शक्यता असते.
योग्य प्रकारे मसाज झाल्यानंतर हे केस स्वच्छ पाण्याने धुऊन घावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कधीच गरम पाणी वापरून केस धुऊ नये त्याने केस कमजोर होण्याची शक्यता असते. हा उपाय केल्याने तुम्हाला लगेच केसातील फरक जाणवेल. केस अधिक काळे आणि लांब व दाट होण्यास मदत होईल.