10 Best Skin Care Tips In Marathi – त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

महिला असो अथवा पुरुष आपल्या चमकदार सुंदर व निकोप त्वचेमुळे चार लोकांमध्ये आपण उठून दिसावे असे प्रत्येकालाच वाटते (Best Skin Care Tips In Marathi) आपल्या शरीरावरील आवरण म्हणजे त्वचा. त्वचेचे एकूण सात थर असतात. त्वचेच्या आतील आवरणामध्ये निर्माण होणाऱ्या मेलेनिन नावाच्या घटकामुळे त्वचेचा रंग ठरत असतो. व्यक्तीच्या त्वचेचा  रंग हा जन्मजात अनुवंशिकतेमुळे ठरत असतो. तसेच त्वचेतील मेलॅनिन नावाचा घटक त्वचेचा रंग कमी अधिक होण्यास कारणीभूत ठरत असतो. त्वचेचे सौंदर्य जपण्याकरता आपण अनेक उपाय करतो.

आपली त्वचा चिर:तरूण, तजेलदार व निकोप रहावी याकरता अनेक घरगुती उपाय आपण करतो तसेच बरेच लोक हजारो रुपये खर्च करुन महागड्या केमिकल पील ऑफ ट्रिटमेंट्स करवुन घेतात. ब्युटी सलून व पार्लरमध्ये जाऊन स्त्री-पुरुष त्वचेची देखभाल घेतात. बरेचसे स्किन क्लिनिक आपल्याला या ट्रीटमेंट व सेवा पुरवत असतात.

Skin Care Tips In Marathi

मोठमोठे सेलिब्रिटीज आणि स्टार्स आपल्या स्कीन रुटीनबद्दल सामान्यांना नेहमीच माहिती देत असतात. आपली स्कीनदेखील आपल्या आवडत्या स्टार्स व सेलिब्रिटीज प्रमाणे चमकावी आणि उजळावी याकरता आपण सेलिब्रिटीजचे स्कीन रुटीन फॉलो करत असतो. शरीरावरील त्वचेच्या सौंदर्याबरोबरच चेहऱ्याच्या त्वचेचे सौंदर्य जपणे देखील महत्वाचे आहे. आपला चेहरा निकोप, तजेलदार,डाग विरहित व चमकदार व तरुण रहावा याकरता अनेक प्रयोग व उपाय योजना केल्या जातात.

चंदनयुक्त, हळदयुक्त, गुलाबजलयुक्त हे सगळे जाहिरातीचे फंडे असतात. या क्रीम्समध्ये सुगंधी केमिकल वापरतात ज्यामुळे केवळ ग्राहकांची फसवणुक व उत्पादनाचा खप करणे हा एकमात्र उद्देश्य कंपनी मालकाचा असतो. ही केवळ मार्केटींग स्किल आणि स्ट्रॅटेजी असते.

- Advertisement -

त्वचेवी काळजी घेणे का गरजेचे आहे ? – Why Skin Care Is Important ?

Skin Care Tips In Marathi

त्वचेची निगा राखण्यामागचा एकमेव हेतु म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व! आपल्या त्वचेच्या स्वरुपावरुन व्यक्तिबद्दल जाणुन घेता येते. व्यक्तीने आपल्या त्वचेचा काळजी व निगा कशी ठेवलेली आहे यावरुन त्या व्यक्तीचा स्वभाव देखील समजत असतो. स्वत:ची वैयक्तिक काळजी व ग्रुमिंग ही त्वचेवरुन दिसुन येते.तसेच त्वचेच्या स्वरुपावरुन व्यक्तीचे आरोग्य कसे आहे हे देखील समजते! त्वचेची निगा ठेवण्याच्या काही पारंपारिक पद्धती व पूर्वापार वापरात आलेले काही नियम बदलत्या काळासोबत मागे पडले.

नैसर्गिक पदार्थ जसे हळद,मुलतानी माती, चंदन, बेसन हे पदार्थ फार प्राचीन काळापासुन सौंदर्य वृद्धीकरता वापरले जातात. मात्र धावत्या युगात वेळेचा अभाव व सगळे आयतेच हातात पाहिजे ही वृत्ती असल्याने हाताने करत बसण्यापेक्षा चार पैसे फेकुन काय ट्रिटमेंट करायची ती करु असा कल लोकांचा होत चालला आहे.  ताेच मध्यमवर्गातील स्त्री-पुरुष कोणत्याही माहितीशिवाय केवळ जाहिराती पाहुन घरात प्रोडक्ट्स घेवुन येतात. या जाहिरातीतील केमिकलयुक्त स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये पॅराबिन्स, सल्फेट्स यासारख्या घातक केमिकल्सचा भरमसाट वापर केला जातो. त्वचेची निगा राखण्याचा दावा करणार्‍या बॉडी लोशन्स, मॉईश्चरायझर, स्किन क्रीम्समधील केमिकल्स त्वचेला हानी पोहचवून त्वचेच्या स्किन सेल्स डॅमेज करतात, ज्यामुळे स्किन डिसिज व स्किन कॅन्सर देखील होऊ शकतात.

Skin Care Tips In Marathi

त्वचेची काळजी व निगा न घेतल्यास पिंपल्स,मुरुम, डाग,ब्लैकहेड,व्हाईट हेड यासारख्या समस्यांनी चेहरा विद्रुप होऊ लागतो. काही लोकांना तर त्वचेची काळजी न घेतल्यामुळे कमी वयात एजिंगची समस्या निर्माण होते. ज्यामध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येणे, फ्रेकल्स, ब्राऊन स्पॉट्स  पिग्मेंटेशन अशी लक्षण दिसु लागतात. याकरताच प्रत्येक वयात त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. त्वचा निरोगी व तरुण राहण्याकरता त्वचेच्या देखभालीकरता नैसर्गिक पदार्थांचा वापर केला पाहिजे.

त्वचेचे प्रकार – Types Of Skin Care Tips In Marathi

Skin Care Tips In Marathi

त्वचेचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत- तैलिय त्वचा, कोरडी त्वचा व मिश्र त्वचा!

- Advertisement -

१ : तेलकट त्वचा किंवा ऑइली स्किन (Oily skin)

 या स्कीनच्या प्रकारांमध्ये चेहऱ्याच्या स्किनमधील तैलिय ग्रंथीमधून जास्त प्रमाणामध्ये ऑइल निर्मिती होते व हे ऑइल वारंवार त्वचेतुन बाहेर पडत असते.

अशी त्वचा असणाऱ्या लोकांचा चेहरा कायमच  तेलकट व चिपचिपा चिकट दिसतो. ऑइली स्किन असलेले लोक लांबुनही ओळखता येतात,व्यवस्थित त्वचेची काळजी घेतली गेली नाही तर मोठे मोठे मुरुम, खुप पुळ्यांनी भरलेले गाल, कप‍ाळ, तेलाने पचपचलेला चेहरा कुठुनही ओळखता येतो की ही ऑइली स्किन आहे.

२ :कोरडी किंवा ड्राय स्किन (Dry skin)

- Advertisement -

अगदी सर्व ऋतुंमध्ये कोरडी असणारी व कायम रखरखीत होणारी त्वचा म्हणजेच कोरडी स्किन. या त्वचेच्या प्रकारांमध्ये त्वचा अगदी उन्हाळ्यातही फाटते. त्वचेला चिरा पडणे,  पांढर्‍या रेषा पडणे, रॅशेस येणे, उन्हाळ्यातही त्वचा उकलणे हे प्रमुख लक्षणे असतात. अशी त्वचा नरम राहत नाही. खूप पटकन कोरडी होते. तसेच हिवाळ्यामध्ये तर जास्तच फाटते अशा त्वचेमध्ये मॉईश्चर टिकुन राहत नाही व लवकर उडुन जाते.

३ : मिश्र त्वचा- (Mixed type of skin)

भारतामध्ये सगळ्यात जास्त मिष त्वचा पाहिली जाते. ही त्वचा उन्हाळ्यात ऑईली होते आणि हिवाळ्यात खुप ड्राय होते. ऑइली व कोरडी या दोन्हीं प्रकारांचे मिश्रण ही त्वचा आहे.

त्वचेच्या देखभालीच्या चुकीच्या सवयी – Some Bad Skin Care Habits

Skin Care Tips In Marathi
 • आपल्यातील बरेच स्त्री व पुरुष हे टीव्हीवरील जाहिराती पाहून किंवा आपले मित्र-मैत्रिणी जे प्रोडक्ट वापरतात त्यांना छान वाटतात म्हणून ते प्रोडक्स वापरण्यास सुरुवात करतात.  मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्वचेच्या प्रकारानुसार प्रोडक्सची निर्मिती केली जाते, अशावेळी आपण आपले मित्र मैत्रिणी सुचवतात व टीव्हीवरील सेलिब्रिटीज जाहिरातीत ओरडून सांगतात म्हणून असे लोक या प्रोडक्सचे अंधानुकरण करून बाजारातुन आणून वापरु लागतात जे अतिशय चुकीचे आहे.
 • आपल्याला आपल्या त्वचेचा पोत प्रकार माहित करुन प्रोडक्ट्स घेतले पाहिने. आपण कशाकरता प्रोडक्ट्स विकत घेत आहोत त्या समस्येबद्दल स्किन स्लेशालिस्ट व डॉक्टरचा सल्ला घेवुन प्रोडक्ट्स वापरावे.
 • पारंपारिक पद्धतीने अगदी दगडाने घासून घासून अंगाचा मळ काढणे, टॉवेलने एकसारखे लाल होईपर्यंत त्वचा घासणे. या सवयी चुकीच्या आहेत.
 • वेळोवेळी चेहरा साबण लावुन धुतल्याने चेहरा उजळतो अशा खोट्या माहितीवर विश्वास ठेवुन पुन्हा पुन्हा चेहरा साबणाने धुवणे, चेहरा घासणे असे अनेक प्रयोग केल्याने त्वचेचे मॉईश्चरायझर निघून जाते व त्वचा कोरडी होते.
 • आपल्या त्वचेची समस्या काय आहे हे माहित करुन त्यानुसार त्यावर काय उपाय केला पाहिजे.हे ठरवावे.
 • आपल्या रोजच्या चुकीच्या आहारामुळे आणि रोजच्या दैनंदिन सवयीमुळे सुद्धा आपल्या स्किन च्या आरोग्यावर चुकीचा इफेक्त्त पडत असतो त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहावे यावर लक्ष देणे सुद्धा गरजेचे आहे.

हे पण वाचा : आरोग्यविषयक चांगल्या सवयी लावून घेण्याचे १० मार्ग !

स्त्री व पुरुषाच्या त्वचेच्या देखभालीमधील फरक – Difference Between Man And Woman Skin

Skin Care Tips In Marathi

स्त्री व पुरुषांची त्वचा ही वेगळी असते. वयात आल्यानंतर शरीरवाढीची कारणे ही हार्मोन्सच्या बदलांमुळे होते. स्त्री-पुरुषांचे हार्मोन्स वेगवेगळे असतात. वयात आल्यानंतर स्त्री-पुरुष शरीरामध्ये आंतरिक व बाह्य बदल घडत असतात. या बदलांमध्ये त्वचेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. वाढत्या वयाबरोबर मुलींची त्वचा अधिक नाजूक होते तर मुलांच्या चेहऱ्यावर दाढी -मिशा आल्यामुळे मुलांची त्वचा रुक्ष, जाड व रखरखीत होते. यामुळे पुरुषांच्या त्वचेकरता स्त्रियांच्या स्किन क्रीमचा उपयोग होत नाही. तसेच पुरुषांच्या त्वचेची निगा राखण्याकरता व देखभाल करण्याकरता वेगळे प्रॉडक्ट वापरले जातात.

स्त्री व पुरुषांच्या त्वचेच्या समस्या वेगवेगळ्या असतात. बाहेरून पाहुन जरी सर्व समस्या सारख्या दिसल्या, तरी ही शरीरातील हार्मोन्स बदलामुळे या समस्या होत असतात. त्यामुळे त्वचेतील फरक संवेदनक्षमता लक्षात घेवून स्किन प्रोडक्ट्स बनवल्ले जातात. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या गडबडीमुळे त्वचेमध्ये तैलियना येणे स्किन डॅमेज व डल होणे असे प्रकार पाहायला मिळतात. तर पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन आणि अँड्रोजन या हार्मोनमुळे त्वचेमध्ये बदल होताना दिसुन येतात. याकरता स्त्री व पुरुषांचे स्किन केअर रुटीन देखील वेगळे असायला हवे!

स्त्रियांकरीता त्वचेची देखभाल करण्याकरता टिप्स – Women Skin Care Tips In Marathi

Skin Care Tips In Marathi
 • महिलांनी आपल्या त्वचेची निगा ठेवताना काही महत्त्वाच्या लक्षात बाबी लक्षात ठेवाव्यात.
 • प्रत्येक महिलेची त्वचा वेगळी असते तसेच प्रत्येकाच्या त्वचेचा पी.एच लेव्हल वेगळी असते, त्यामुळे आपल्या त्वचेच्या संवेदनशीलतेला लक्षात घेवूनच प्रोडक्ट्स विकत घ्यावे.
 • सेन्सिटीविटी टेस्ट करुनच  कोणतेही स्किन प्रोडक्टस वापरावे. जे प्रोडक्ट्स आपल्या त्वचेला सूट होतील याबाबत २४ तास क्वालिटी सेन्सिटिविटी चेक टेस्ट करुनच असे प्रोडक्ट्स विकत घ्यावेत.
 • स्त्रियांची त्वचा नाजूक व कोमल असते. वारंवार स्क्रबिंग करुन किंवा घासुन चेहरा जास्त काळा पडतो व जास्त स्क्रब केल्याने त्वचेला आतल्या थरापर्यंत दुष्परिणाम होतात.
 • उन्हात बाहेर जाताना कधीही स्कार्फ किंवा रुमालाचा वापर करावा.
 • चेहऱ्यावर चांगले सनस्क्रीन लोशन वापरावे.
 • आंघोळीचा साबण चेहर्‍यांवर वापरु नये.
 • चेहर्‍याकरता चांगला हर्बल फेसवॉश किंवा साधे डाळीचे पीठ वापरावे.
 • वॅक्सिंग किंवा हेअर रिमुवलकरत असाल तर नियमितपणर  त्वचेवर मॉइस्चरायझिंग लोशन वापरा.
 • चेहऱ्याच्या त्वचेकरता देखील चांगले मॉइश्चरायझिंग क्रीम लावावे. ज्यामुळे चेहर्‍याची त्वचा मुलायम व तुकतुकीत होते.
 • महिन्यातून एक वेळेस फेशिअल अवश्य करावे. फेशियल केल्यानंतर ऊन्हात बाहेर पडु नये.कारण फेशियलने त्वचा संवेदनशील झालेली असते.
 • केमिकल पिल ट्रिटमेंट कधीही करू नये. हर्बल ट्रिटमेंट करण्याकडे कल असावा.
 • मैत्रिणीला सुट झाले म्हणून तिने घेतलेले प्रॉडक्ट्स आपल्याला सुट होईलच असे नसते.
 • आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपल्याला त्वचेला सूट होतील असेच प्रॉडक्ट्स वापरावे.
 • चेहऱ्यावरील समस्या जसे, मुरूम, पुटकुळ्या, वांगाचे चट्टे इत्यादीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मनाने किंवा जाहीराती पाहुन प्रोडक्ट्स विकत घेवू नये.
 • आरोग्य चांगले असले तर त्वचा चांगली राहते, याकरता पोटाच्या समस्या असतील तर त्याचा परिणाम त्वचेवर होत असतो. म्हणुन आजर वेगळा उपाचार वेगळा असे करु नये.
 • रोज मेकअप करण्याची सवय असेल तर झोपण्याच्या अगोदर संपूर्ण मेकअप काढून टाकावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा नंतर झोपावे.
 • चेहऱ्यावर व अंगाला कमीत कमी केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करावा.
 • योग्य आहार व दिवसातून किमान ३ लिटर पाणी पिणे चांगल्या त्वचेकरता आवश्यक असते.
 • जेवनात चौरस आहार व ज्यस,सलाड यांचा समावेश कायम ठेवावा.

पुरुषांकरीता त्वचेची काळजी घेण्याकरता टिप्स – Men Skin Care Tips In Marathi

Skin Care Tips In Marathi
 • पुरुषांनी आपल्या त्वचेची काळजी घेण्याकरता पुरुषांकरिता बनवलेले विशेष प्रोडक्ट्सचा वापर करावा.
 • स्त्रियांकरता असलेले स्किन केअर रुटीन पुरुषांकरता वापरणे चुकीचे असते.
 • उन्हामध्ये बाहेर जाताना पुरुषांनी देखील सन स्क्रीन लोशन वापरले पाहिजे. चेहऱ्याला रुमालाने झाकले पाहिजे.
 • बर्‍याचशा पुरुषांना तैलीय त्वचवमध्ये खुप पुटकुळ्या व मुरुम येतात. याकरता बेसनाचा फेसपॅक निश्चित फायदेशीर आहे.
 • दाढीेचे ब्लेड वापरानंतर निर्जंतुक करुन घ्यावे.
 • दाढी केल्यानंतर त्वचेला डिसइन्फेक्टंट जेल किंवा तुरटी वापरावी.
 • वारंवार दाढी केल्याने दाढी दाट होते हा गैरसमज दूर करावा. दाढी ची ग्रोथ ही हार्मोन्स व अनुवांशिकतेवर अवलंबुन असते.
 • स्किन टाईप नुसार फेसवॉश,फेसपॅक व स्किन ट्रिटमेंट करावी.
 • फेशियल पुरुषांनी देखील केलेच पाहिजे ज्यामुळे त्वचेच्या मृतपेशी काढून टाकल्या जातात व त्वचेला नवी चमक येते.
 • गंभीर त्वचेच्या समस्यांवर घरगुती उपचार किंवा इंटरनेटवर सर्च करण्यापेक्षा चांगल्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला व उपचार घ्यावे.
 • ११.महिलांप्रमाणेच आहाराबाबत जागृक असावे. तेलकट, जंकफुड, फास्टफुड बंद करावे

कोरड्या किंवा शुष्क त्वचेकरता स्किन केअर टिप्स – Dry Skin Care Tips In Marathi

Skin Care Tips In Marathi
 • कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी कायम वर्षभर मॉईश्चरायझरचा वापर केला पाहिजे.
 • हिवाळ्यामध्ये कोरडी त्वचा जास्त डॅमेज होत असते त्याकरता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेला फाटण्यापासुन कोकम तेल किंवा पेट्रोलियम जेली वापरले पाहिजे.
 • हिवाळ्यात त्वचेकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मध, दही, दुधाची साय असे पदार्थ त्वचेवर लावावे त्यामुळे चेहर्‍यामध्ये मॉइश्चर लॉक होते व चेहरा मऊ राहतो.
 • तसेच हिवाळ्यातील डॅमेज पासून संरक्षण करण्याकरता अंगाला नियमित तेलाने मालिश करावी व नंतर अंघोळ करावी.
 • कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी सर्व ऋतुंमध्ये मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे.

तेलकट त्वचेकरता स्किन केअर टिप्स – Oily Skin Care Tips In Marathi

Skin Care Tips In Marathi
 • ऑइली त्वचा असणाऱ्या लोकांनी आपल्या चेहऱ्याची नियमित स्वच्छता ठेवावी.
 • वातावरणातील धूळ, माती, प्रदूषणामुळे चेहऱ्याच्या रोमछिद्रांमध्ये जाऊन चिकटतात व त्यामुळे चेहऱ्याचे रोमछिद्रे बंद होतात व चेहऱ्यावर पिंपल मुरूम अशा समस्या निर्माण होतात.
 • ऑइली स्किन असणाऱ्या लोकांनी कधीही वॉटर बेस प्रॉडक्ट्स वापरावे.
 • चेहऱ्याला तेलकटपणा आल्यावर लगेच कॉटन, टिश्यु किंवा रुमालाने पुसुन घ्यावा.
 • चेहरा घामाने ओला झाला तरी ही लगेच स्वच्छ करून घ्यावा.
 • चेहऱ्यावर अधिक तेल जमा होत असेल तर बेसनपीठाचा घरगुती फेसपॅक वापरत जावा. बेसणामुळे तैल ग्रंथी जास्त तेल निर्माण करत नाहीत.
 • ऑइली स्किन असणाऱ्या लोकांनी चेहऱ्यावर कधीही तेल किंवा ऑईल बेस असलेले प्रोडक्ट्स वापरु नये.
 • ऑइली स्किन असणार्‍या लोकांनी तेलकट, तुपकट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

ऑइली त्वचेची काळजी कशी घ्यावी ? वाचा इथे : तेलकट त्वचेवर उपचार करण्याचे 15 उपाय

त्वचेची निगा राखण्याकरता सर्वोत्तम रुटीन – Best Skin Care Routine In Marathi

Skin Care Tips In Marathi
 • त्वचेचा प्रकार कोणताही का असेना मात्र त्वचेची काळजी व निगा घेणे ही आपली जबाबदारी आहे.
 • वैयक्तिकरीत्या त्वचेची काळजी घेतल्यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्यांना जास्त सामना करावा लागत नाही.
 • चेहरा स्वच्छ करण्याकरता नेहमी चांगला हर्बल फेस वॉश वापरावा.
 • अंगाच्या साबणाने चेहरा कधीही धुवू नये.
 • केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्समध्ये जास्त हानिकारक केमिकल असतात, म्हणुन किमान पॅराबिन नसलेले प्रोडक्ट्स निवडुन मग वापरा
 •  चेहऱ्यावर नाजुक असतो. पिंपल्स,डाग, वांग कोणत्याही समस्या एका रात्रीत येत नाहीत व रात्रीत बर्‍या होत नाहीत! हे लक्षात घेवुन खाण्या-पिण्याच्या सवयी, योग्य झोप व चांगले स्किन केअर रुटीन पाळावे.
 • जास्त वेळा स्क्रबिंग करू नये. चेहरा कशानेच घासु नये.
 • वयाच्या तिशीनंतर फ्रूट फेशियल करणे उत्तम असते.
 • चेहरा स्वच्छ करताना कधीही जास्त जोराने घासू नका फक्त हळुवार पाणी टिपुन घ्यावे.
 • चेहऱ्याला रोज चांगल्या मॉईश्चरायझिंग क्रीम किंवा साध्या खोबरेल तेलाने मसाज करावा.
 • चेहर्‍यावर वर्तुळाकार मसाज देतांना चेहऱ्यावरील नाकाचे हाड, गालाचे हाड, हनुवटी, भुवयांजवळ प्रेशर पॉईंट्स हळुवारपणे दाबावे. आपल्या बोटांच्या अग्रांनी चेहर्‍याच्या स्नायूंचा व्यायाम होतो व रक्ताभिसरण सुरळीत होते.
 • पंधरा दिवसातून एकदा क्लीन अप करावे.
 • हेअर रीमुव्हल प्रोडक्स वापरताना किंवा हेअर रीमुव्हल करताना योग्य काळजी घ्यावी. सेन्सिटीवीटी तपासण्या करता कधीही प्रॉडक्ट वापरताना 24 तास अगोदर ही टेस्ट करून घ्यावी.
 • कोणी रेकमेंड केले किंवा जाहिराती पाहिले म्हणून कोणतेही प्रॉडक्ट्स बाजारातुन विकत आणुन चेहऱ्यावर ट्राय करत बसु नका.
 • महिन्यातून एखादी वेळा स्टीमबाथ किंवा चेहर्‍याला स्टीम द्यावी.यामुळे विषारी तत्व घामावाटे शरीरातून निघुन जातात.
 • व्यायाम, योगासने, ध्यानधारणा नियमित करावी ज्यामुळे त्वचेचे सौंदर्य आतून खुलुन येते.
 • ताज्या हिरव्या पालेभाज्या,काकडी ,गाजर, फळे यांचा आहारात समावेश करावा.

सारांश

या लेखातून आम्ही आपल्याला त्वचेची निगा व देखभाल ठेवण्याबद्दल माहिती सांगितली आहे, तसेच त्वचेचे जे प्रकार असतात ज्यामध्ये मुख्यत: तैलिय त्वचा, कोरडी त्वचा व मिश्र त्वचा असे तीन प्रकार असतात याबद्दल माहिती दिली. तसेच त्वचेच्या प्रकारानुसार त्वचेची काळजी व निगा कशी राखावी याबद्दल माहिती दिली आहे. तसेच सामान्यपणे त्वचेची निगा राखण्याकरता कोणत्या प्रोडक्ट्स वापराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल देखील आम्ही या लेखातून आपल्या माहिती दिली आहे. स्त्री व पुरुषांची त्वचा वेगवेगळे असते त्याकरता स्त्रियांचे त्वचा देखभालीचे रुटीन व पुरुषांचे त्वचा देखभालीचे रुटीन वेगळे असतेव ते कसे असावे याबद्दल आम्ही आपल्याला सविस्तर माहिती सांगितले आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट नक्की कळवा

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories