9 Best Tips For Healthy Skin In Marathi – निरोगी त्वचेसाठी टिप्स

- Advertisement -

आज काल दिसण्याला जास्त महत्व प्राप्त होत आहे. आपला सुंदर लूक व आपले राहणीमान यामुळे व्यक्तिमत्त्वामध्ये चार चांद लागत असतात. आपले सौंदर्य टिकून राहावे व आपण चिरतरुण दिसावे याकरता प्रत्येक स्त्री व पुरुष अगदी अपटूडेट असताना आपण पाहत आहोत. केसांचे आरोग्य असो अथवा त्वचेची निगा असो त्वचेच्या आरोग्याकरता टिप्स (Tips for healthy skin in Marathi) आपण शोधत असतोच!

आजकाल अनेक ठिकाणी आपले सौंदर्य अबाधित राहण्याकरता मोठमोठे ब्युटी सॅलोन, ब्युटी पार्लर, महिला व पुरुषांचे यूनिसेक्स ब्युटी सॅलोन अनेक ठिकाणी उघडलेले आपण पाहिले असेल! या सलूनमध्ये महिला व पुरुषांच्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत काळजी घेतली जाते. पुन्हा पुन्हा नुसतेच फेशियल आणि क्लिन-अप करुन त्वचा चांगली राहत नाही तर त्वचेची काळजी घ्यावी लागते!

Tips For Healthy Skin In Marathi

आपले केस, आपली त्वचा आपले सौंदर्य खुलवत असते. मात्र पंचविशी नंतर वाढत्या वयामुळे केस व त्वचा यांचे आरोग्य खालावत जाते! योग्य काळजी व निगा ठेवली गेली नाही तर अगदी कमी वयामध्ये म्हातारपण आल्यासारखे दिसते. चेहऱ्याचे व त्वचेचे सौंदर्य यामध्ये सगळ्यात जास्त मॅटर करते ती आपली त्वचा!याचकरता आम्ही घेवुन आलो आहोत त्वचेच्या आरोग्याकरता टिप्स (Tips for healthy skin in Marathi)

आपली त्वचा तुकतुकीत, मुलायम, तेजस्वी व चमकदार रहावी याकरता आपण न जाणे किती प्रॉडक्ट विकत घेतो? मोईश्चरायझिंग क्रीम, फेस क्रीम, ब्युटी क्रीम, डे क्रीम, नाईट क्रीम, अशा अनेक क्रीम्स व लोशन आपण चेहऱ्याच्या व अंगावरच्या त्वचेवर लावत असतो. आपली त्वचा कायम तरुण, तुकतुकीत राहावी व आपण चार लोकांमध्ये उठून दिसावे हा त्याच्या मागचा उद्देश असतो!

- Advertisement -

आज आम्ही आपल्याला त्वचेच्या आरोग्याकरता टिप्स (Tips for healthy skin in Marathi) म्हणजेच हेल्दी स्किन ठेवण्याकरता काही टिप्स सांगणार आहोत!

त्वचेच्या आरोग्याकरता टिप्स (Tips for healthy skin in Marathi)

Tips For Healthy Skin In Marathi

 पंचविशी नंतर आपली त्वचा मोईश्चर सोडत असते, ज्यामुळे त्वचेमधील नैसर्गिकरित्या मोईश्चर निर्माण व तयार करण्याची प्रक्रिया हळूहळू कमी होत जाते. ज्यामुळे त्वचेमध्ये मॉईशचर लॉक न होता हवेने किंवा तापमानामुळे उडुन जाते. ज्यामुळे त्वचा कोरडी व खरबरीत होऊ लागते.

स्त्री असो अथवा पुरुष दोन्हींच्या स्कीनमध्ये वाढत्या वयासोबत मॉईश्चर म्हणजेच अोलावा टिकुन राहत नाही. याकरता आपण त्वचेच्या आरोग्याबद्दल गांभिर्याने विचार केला पाहिजे. नाहीतर वेळ निघुन गेला तर पश्चातापाशिवाय काही करता येत नाही. याकरता स्त्रिया असो किंवा पुरुष अंघोळीनंतर नियमित आपल्या त्वचेवर एक चांगले मॉइश्चरायझर वापरले पाहिजे. बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपनी आपले प्रॉडक्ट विकत असतात.मात्र आपण अशा प्रोडक्ट्स ला निवडा जे केवळ पॅराबिन फ्री असलेले असतील! नियमित वॅक्सिंग, शेविंग किंवा हेअस रिमुविंग प्रोडक्ट्स वापरणार्‍यांनी कायम त्वचेला मॉईश्चराईज करण्याकडे लक्ष दिले पाहिजे!हेअस रिमिव्हींग नंतर त्वचेची नीट देखभाल व निगा राखली नाही तर त्वचेवर सुरकुत्या पडतात व त्वचा काळवंडु लागते.

Tips For Healthy Skin In Marathi

मॉईश्चराईझर असे निवडावे जे आपल्या स्किनला सुट असलेले असावे. कोणतेही प्रोडक्ट डायरेक्ट कधीही त्वचेवर वापरू नये. वापरण्यापूर्वी २४ तास अगोदर प्रिटेस्ट करुन घ्यावी ज्यामुळे ते प्रोडक्ट्स आपल्या त्वचेला सुट होईल की नाही हे समजते. जर त्वचेला जळजळ,लाली,सुज, पुरळ उमटले किंवा खाज येत असेल तर ते प्रोडक्ट्स तुमच्या त्वचेकरता अयोग्य आहे असे समजावे. पॅराबिनयुक्त स्किन प्रोडक्ट्समुळे स्किन कॅन्सर होण्याचा देखील धोका असतो.

- Advertisement -

त्वचेची निगा व देखभाल करण्याकरता टिप्स (Tips for healthy skin in Marathi)

Tips For Healthy Skin In Marathi

आपल्या त्वचेची निगा व देखभाल करण्याकरता आपण ब्युटीपार्लर किंवा सलुनमध्येच गेले पाहिजे याची काहीएक आवश्यकता नाहीये. आपण अगदी घरच्या घरी देखील आपल्या त्वचेची नियमितपणे निगा व काळजी राखू शकता. दैनंदिन त्वचेचे रुटीन फिक्स केले पाहिजे. ज्यामध्ये त्वचेला मुलायम व तजेलदार तरुण ठेवण्याकरता वेगवगेळे स्किन नुसार खास करुन  बनवलेले साबन, फेस वॉश, बॉडी वॉश, बॉडी लोशन, मॉईश्चराईझर वापरावे.

ब्युटिपार्लर ट्रिटमेंट द्वारे देखील आपण त्वचेची निगा राखु शकता. तसेच अनेक प्रकारचे फेशियल देखील आपण घरच्या घरी देखील सहज करू शकता. पंचविशी ते तीस या वयादरम्यान असलेल्या महिलांनी शक्यतो पर्ल फेशियल, गोड फेशियल किंवा डायमंड फेशियल करणे चांगले असते. मात्र तिशीनंतर फ्रुट फेशियल केल्यामुळे चेहऱ्यामध्ये फ्रुट फेशियलमधील फळांचे गुण त्वचेमध्ये वाढत्या वयाचे त्वचेवर होणारे परिणाम सुरकुत्या, एजिंग साईन्स, फाईन लाईन्स, त्वचा ढिली पडणे या लक्षणांना रोखते.

Tips For Healthy Skin In Marathi

त्वचा कायम तजेलदार व तरुण रहावी याकरता मोठमोठे सेलिब्रिटीज अनेक स्किन ट्रिटमेंट करतात व वेगवेगळ्या सर्जरी देखील करतात. साधारणपणे त्वचेच्या देखभालीकरता घरगुती उपाय देखील लाभदायक ठरतात. तसेच रेग्युलरली आपली त्वचा स्वच्छ ठेवली पाहिजे. त्वचेचे तीन प्रकार असतात तैलीय त्वचा म्हणजेच अॉईली स्किन, कोरडी त्वचा म्हणजेच ड्राय स्किन आणि सामान्य त्वचा म्हणजेच मिक्स स्किन! त्वचेच्या प्रकारानुसार आपली त्वचा कोणती आहे हे जाणणे अगोदर आवश्यक असते.

आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार त्यांची काळजी कशी घ्यावी (Depending on the skin type Tips For Healthy Skin In Marathi)

Tips For Healthy Skin In Marathi
 • तैलिय त्वचा (Oily Skin Tips For Healthy Skin In Marathi) –

आपला चेहरा दर पंधरा मिनिटांनी तेलकट होत असेल व कायमच मुरुमांचा व पुटकुळ्यांचा त्रास आपल्याला होत असेल व तर आपली त्वचा तेलकट,तैलिय किंवा अॉईली त्वचा आहे असे समजावे. ओईली त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी कधीही ऑइल बेस प्रोडक्ट्स चेहऱ्यावर वापरू नये, कारण तैलिय त्वचेखालील तैलग्रंथीमधुन अगोदरच जास्त प्रमाणात तेल बाहेर सोडले जात असते. त्यामुळे त्वचा तेलकट झालेली असते! जर आपण बेस प्रोडक्ट्स त्यावर वापरले तर चेहर्‍यावर जास्त तेल जमा होईल व आणखीन मोठमोठे मोठे पिंपल्सदेखील येतील ज्यामुळे चेहरा अजुनच विद्रूप होत जातो. अॊईली स्किन असणाऱ्या व्यक्तीने कधीही वॉटरबेस ब्युटी प्रॉडक्ट्सच वापरावे.

- Advertisement -
 •  ड्राय स्कीन (Dry Skin Tips For Healthy Skin In Marathi)-

ड्राय किंवा कोरडी रुक्ष त्वचासहज ओळखायला येते. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो या कोरड्या स्कीन असलेल्या लोकांची स्किन कायम कोरडीखट्ट असते. हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास होणारी स्किन म्हणजे ड्राय स्किन!हिवाळा आला की त्वचा पांढरी होते,रखरखीत कोरडी होते, स्किनला चिरा पडतात, पूर्ण त्वच्या उकलून येते. अोठांना चिरा पडतात अोठ उकलतात प्रसंगी बरेचदा रक्त देखील येते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या ड्रायस्किन असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरील रोम छिद्र खूप मोठे मोठे दिसू लागतात. ड्राय स्कीन असणाऱ्या लोकांनी कधीही ऑइल बेस असलेले ब्युटी प्रॉडक्ट्स वापरावे, यामुळे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासोबतच आवश्यक ऑईल मिळते. त्यामुळे त्वचा तुकतुकीत मऊ व नरम राहते.

 • मिक्स किंवा सामान्य त्वचा (Mix Skin Tips For Healthy Skin In Marathi) –

मिक्स कीं असणाऱ्या लोकांचा लोकांना थंडीमध्ये त्वचा बर्‍यापैकी उकलते आणि उन्हाळ्यामध्ये थोडीशी ऑईली स्किन होते.ज्यांची मिक्स स्किन टाईप आहे असे लोक दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट्स आरामात वापरु शकतात.

घरच्या घरी स्किन ची काळजी कशी ठेवावी ?Home Skin Care Tips for healthy skin in Marathi

Tips For Healthy Skin In Marathi

घरच्या घरी आपल्या त्वचेची काळजी व निगा राखण्याकरता आपल्या घरातील वापराचे काही पदार्थ आपल्याला कामी येतात.

चला तर पाहुया घरगुती उपाय करुन त्वचेची निगा कशी राखावी?

 • कच्चे दूध – कच्चे दूध हे नैसर्गिक क्लिंजर असते. आठवड्यातून दोन वेळेस कच्च्या दुधाने चेहरा साफ करावा यामुळे चेहऱ्यावरील सर्व प्रकारचे धुळ,प्रदुषण व मातीचे कण त्वचेच्या रोमछिद्रातुन आतवर जावुन सफाई होते. ज्यामुळे त्वचेमध्ये पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते व त्वचेला चकाकी येते, त्वचा स्वच्छ व तुकतुकीत राहते.
 • गुलाब जल– रोज रात्री झोपण्याअगोदर गुलाब जलाने चेहरा व्यवस्थित पुसून घ्यावा. किंवा मेकअप वगैरे काढुन चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर कॉटन पॅडने गुलाबजल संपूर्ण चेहर्‍यावर लावावे. गुलाबजल नियमित वापरल्यामुळे चेहऱ्यावर हळुहळु एक गुलाबी छटा येऊ लागते, तसेच गुलाब जल लावल्यामुळे चेहऱ्याच्या बर्‍याचशा समस्या दूर होतात. त्वचा कोरडी होणे किंवा जास्त प्रमाणामध्ये ओईल होत असेल तर गुलाबजलचा नियमित वापर केल्यामुळे दोन्ही समस्यांवर उपाय होतो. ब्लॅक हेड, व्हाईट हेड पुन्हा पुन्हा चेहर्‍यावर येत असल्यास गुलाबजल व मुलतानी मातीचा लेप चेहर्‍यावर लावुन १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवुन टाका. हा उपाय आठवड्यातुन एकदा करावा. पोर्स बारीक होऊन व्हाईट हेड व ब्लॅक हेड समस्या राहणार नाही. गुलाब जल हे नैसर्गिक टोनर आहे. गुलाबजल मोकळे व मोठे झालेले त्वचेचे रोमछिद्र लॉक करते व त्यांना हळूहळू नॉर्मल करते.
 •  कॉफी ,साखर, मध-  कॉफी आणि साखर यांना एकत्र करून आपण त्यापासून एक चांगले घरगुती स्क्रब बनवू शकता. कॉफी आणि साखर एक चमचा घेऊन त्यामध्ये थोडेसे मध टाकून आपण एक चांगली पेस्ट बनवून घ्या. चेहरा अगोदर पाण्याने धुवुन घ्या व नंतर आपल्या चेहऱ्यावर वर्तुळाकार पद्धतीने मसाज करत स्क्रबिंग करा. कॉफीमुळे चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाते. ज्यामुळे त्वचा एक्सफोलियेट होते व आतील रंगत व चमकदार त्वचा बाहेर येते. चेहऱ्यामध्ये लस्टर वाढते. साखरेमुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो व त्वचेला ग्लुकोज देखील मिळते.
 • लिंबू-  जर आपल्याला चेहऱ्यावर किंवा अंगावर त्वचेवर हाताच्या कोपरांवर किंवा गुडघ्यांना काळेपणा जास्त प्रमाणात आला असेल किंवा त्वचा जास्त काळवंडलेली असतील तर आपण लिंबाच्या अर्ध्या फोडीवर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून काळवंडलेल्या स्किनवर दररोज पाच मिनिटे मसाज करावा. त्यानंतर दहा मिनिटे तसेच ठेवावे व सुकल्यानंतर दहा मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन टाकावे. हळूहळू काळवंडलेली त्वचा उजळु लागते. त्वचेवर जमा झालेला मळ व धुळ व डेडस्कीन निघुन जाते व  काळपटपणा निघून जातो.
 • हे दोन्ही पदार्थ नॅचरल ब्लीचचे काम करतात. एक चमचा मधामध्ये पाव चमचा लिंबाचा रस टाकून नियमित चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळतो आणि स्किन नॅचरली ब्लिच होते. लिंबु स्किन पॉलिशींग करुन डेड स्किन हटवण्यात मदत करते. लिंबामुळे चेहर्‍यावर पिंपल्स येण्यापासुन रोख लागते.
 • बटाटा – बटाटा देखील स्किनच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर लाभदायक आहे. बटाटा देखील नॅचरल क्लिसिंग व ब्लिचिंग एजंटचे काम करतो. डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे असो किंवा चेहऱ्यावर आलेले वांगाचे चट्टे, पिगमेंट्स किंवा ब्राऊन स्पोट्स असो. यावर उपाय म्हणजे फक्त अर्धा बटाटा किसून घ्या. गाळणीने बटाट्याचा रस बाजुला काढून घ्या. जिथे- जिथे पिगमंटेशन व डाग आहेत त्या जागेवर हा रस लावावा व सोबतच वर्तुळाकार पद्धतीने पाच मिनिटे मसाज करावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवुन टाका.जास्त प्रमाणात डाग असल्यास आपण हा उपाय आठवड्यातून तीन वेळेस करावा. बटाट्यामुळे चेहऱ्यावरील सगळे डाग-धब्बे निघून जातील व चेहरा अगदी एकसारखा तेजस्वी बनेल व स्किन कॉम्प्लेक्शन निघून जाईल व चेहरा चमकदार बनेल. आपण बटाट्याचा रस न काढता बटाट्याचे पातळ काप करुन बटाट्याच्या चकत्यांनी संपूर्ण चेहऱ्यावर मालिश करावी. त्यामुळे स्किन टोन सुधारतो व उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग किंवा सनटॅन झाले असेल तर देखील निघून जाते.
 • मुलतानी माती- मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्र करून त्यांचा आहे फेसपॅक बनवावा फेस पॅक चेहऱ्यावर ती आठवड्यातून एक वेळेस लावा यामुळे चेहरा सुंदर व चमकदार होतो. अॉईली स्किन असणाऱ्या लोकांनी मुलतानी मातीचा फेस पॅक नियमितपणे वापरला पाहिजे. तैलिय ग्रंथीतुन होणारा अधिकचा तैलस्त्राव कमी होतो.
 • बेसन- बेसन देखील आपल्या चेहऱ्याकरता अतिशय उपयुक्त आहे.  एक चमचा बेसन घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद व २ चमचे पाणी टाकुन फेसपॅक बनवावा. हा फेसपॅक चेहऱ्याला लावून पंधरा मिनिटे तसाच ठेवुन सुकु द्यावे. बेसनामुळे चेहऱ्याला चकाकी येते व चेहऱ्यावरील डाग व डार्क स्पॉट निघून जातात. चेहरा डाग विरहित होतो व त्वचा सुंदर दिसू लागते.
 • तांदळाचे पीठ- पारंपारिक रित्या तांदळाचे पीठ हेअर रिमूवींग करता वापरले जाते. तांदळाच्या पिठामध्ये पाणी टाकून थोडीशी पातळ पेस्ट बनवावी. हाताला पायाला व चेहऱ्याला ही पेस्ट लावावी. ही पेस्ट वाळल्यानंतर हळूहळू केसांच्या उगवण्याच्या विरुद्ध दिशने गोलाकार मसाज करत चेहऱ्यावरून हा पॅक हळुहळु काढावा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. नियमित वापर केल्यास काही दिवसांतच आपल्याला अंगावरील अनावश्यक केस कमी झालेले व ग्रोथ ही कमी झालेली दिसेल. नियमित वापर केल्यामुळे फायदा होतो.
 • काकडी- काकडीच्या रसामध्ये अँटी एजिंग गुण असतात. काकडीच्या रसाने चेहऱ्याला मालिश करावी. त्यामुळे चेहऱ्याच्या सुरकुत्या निघून जातात. डोळ्याखालची काळी वर्तुळे येत असल्यास काकडीचे काप डोळ्यावरती नियमित ठेवल्यास डोळ्याची काळी वर्तुळे हळूहळू नष्ट होतात.
 • विटामिन ई कैप्सूल-  बाजारामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असलेली विटामिन ई कैप्सूल देखील आपल्या चेहर्‍याकरता व केसांकरता देखील खूपच लाभदायक आहे. रोज झोपताना एक विटामिन ई कैप्सूल फोडून चेहऱ्यावरती मसाज केल्यास आपला चेहरा तरुण राहतो व चेहऱ्यावर वाढत्या वयाप्रमाणे येणारे एजिंग साईन कमी होतात. यामुळे चेहरा सुंदर दिसू लागतो.
 • खोबरेल तेल- शुद्ध खोबरेल तेल आपल्या त्वचेकरता टॉनिकचे काम करते. आंघोळ करण्यापूर्वी संपूर्ण अंगाला खोबरेल तेल कोमट करुन त्वचेची मालिश करावी. त्यानंतर आंघोळ करावी यामुळे त्वचेमध्ये चकाकी येते. खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉईश्चराईझर आहे. ज्यामुळे त्वचा मऊ, चमकदार व तेजस्वी राहण्यास मदत होते.

कोरफड – कोरफडीचा वापर प्राचीन काळापासुन केसांसाठी व त्वचेच्या सौंदर्याकरता देखील केला जातो. त्वचेवर सुरकुत्या येत असतील तर आपण कोरफडीचा गर किंवा बाजारात मिळणारे कोरफड जेल चेहऱ्याला नियमित रात्री झोपण्यापूर्वी लावावे. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या निघून जातात व चेहरा चमकदार वतरुण राहतो.

कोरफड बद्दल अधिक माहिती इथे वाचा : रात्री झोपण्यापूर्वी अ‍ॅलोव्हेरा क्रीम लावा, चेहऱ्यावर दिसतील आश्चर्यकारक बदल

 • चंदन-  शुद्ध चंदन बाजारात मिळत नाही. शुद्ध चंदन अतिशय महाग असते. बाजारात मिळणारे चंदन हे भेसळयुक्त असते. शुद्ध चंदन पावडर आणि मुलतानी माती मिक्स करून फेसपॅक बनवुन चेहर्‍यावर नियमित लावल्याद त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

हेल्दी त्वचेकरता आहार कसा असावा? (Diet Tips for healthy skin in Marathi)

Tips For Healthy Skin In Marathi

त्वचेच्या आरोग्य चांगले राहण्याकरता पोटामध्ये अन्न देखील चांगले गेले पाहिजे. सकस आहार व आहारामध्ये सर्व विटामिन्सचा समावेश असेल तर तुमच्या त्वचेवर आतून ग्लो येतो. या करता आहारामध्ये ताज्या फळांचा समावेश करावा. नियमित वेगवेगळा व सकस आहार घ्यावा. कडधान्याच्या ऊसळी, हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, काकडी, ताजी फळे, लिंबुवर्गीय फळे जसे संत्री, मोसंबी, यांचा आहारात समावेश करावा. आपल्या प्रकृतीनुसार पथ्य असलेले पदार्थ खावे.

हेल्दी त्वचेकरता व्यायामाचे महत्व – Workout Importance for healthy skin in Marathi

Tips For Healthy Skin In Marathi

आहारासोबतच घाम गाळणार्‍या शारीरिक हालचाली, कसरत, योगा, झुंबा, सायकलिंग, जॉगिंग असे व्यायाम देखील केले पाहिजे. व्यायामामुळे शरीरामधील विषारी पदार्थ घामावाटे शरीराबाहेर टाकले जातात. ज्यामुळे त्वचेचे सौंदर्य आतुन उभारुन येते.नैसर्गिकरित्या चमकदार व तजेलदार त्वचा होण्याकरता व्यायामाकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल?

त्वचेचे रक्षण करण्याच्या टिप्स – Tips for healthy skin in Marathi

Tips For Healthy Skin In Marathi
 • घरगुती उपाय,आहार, आणि व्यायामासोबतच त्वचेचे रक्षण देखील महत्त्वाचे असते.
 • घरातून बाहेर जाताना सुर्यप्रकाशामुळे व ऊन्हामुळे त्वचेवर प्रभाव होतो. याकरता घरातुन बाहेर निघताना नेहमी आपली शरीराची त्वचा पूर्णपणे झाकली पाहिजे.
 • चेहरा स्कार्फने गुंडाळला पाहिजे.शक्यतोवर रंगबेरंगी स्कार्फ ऐवजी हलके रंग असलेले स्कार्फ वापरावे.डोक्यावर हॅट,कॅप किंवा रुमाल वापरावे.
 • ऊन्हापासुन संरक्षण करण्याकरता डोळ्याला नेहमीच यु.वी रेज प्रोटेक्शन असलेला गॉगल वापरला पाहिजे.
 • बाहेर जाताना सनस्क्रीन लोशनचा नियमित वापर केला पाहिजे व नियमित हॅन्ड ग्लोज वापरले पाहिजे.
 • ऊन्हामध्ये फिकट रंगाचे कपडे किंवा पांढरे कपडे वापरण्यावर भर द्यावा. ज्यामुळे सन एक्स्पोजरचा त्रास होत नाही व त्वचेचे रक्षण होते.

सारांश- वरील लेखातुन आम्ही आपल्याला त्वचेचे आरोग्य जपण्याकरता काही Tips for healthy skin In Marathi (टिप्स) सांगितल्या. ज्यामध्ये घरगुती वापराच्या पदार्थांचा सौंदर्यवर्धनाकरता उपाय कसा करायचा ते आपण पाहिले. त्वचेच्या आरोग्याकरता सकस आहाराचे व नियमित व्यायामाचे महत्व आपण पाहिले. तसेच त्वचेची ऊन्हापासुन काळजी घेण्याकरता टिप्स पाहिल्या.

हे हि वाचा : त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories