लग्न करत आहात तर त्याआधी ह्या 6 मुद्द्यावर एकमेकांशी बोलणं खूप गरजेचं आहे.

लग्न पहावं करुन अशी म्हण म्हणून आपल्याकडे म्हटली जाते. कारण लग्न म्हणजे अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची कसरत असते. आपण जेव्हा लग्न करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या भावी पत्नीसोबत काही गोष्टी बोलण्याची गरज आहे त्या गोष्टी नेमक्या कोणत्या असाव्यात याची माहिती या लेखातून घ्या. लग्न म्हणजे एक प्रकारचा करारच आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याशी लग्न करण्याचा निर्णय घेता, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी आयुष्यभर बांधील राहण्यासाठी आणि प्रत्येक चढ-उतारात त्यांच्यासोबत राहण्यासाठी करारावर स्वाक्षरी करता.

लग्न टिकवण्यासाठी काही गोष्टी पूर्वीच स्पष्ट असण्याची गरज आहे. लग्न प्रेमाने असो वा अरेंज असो ते एक करार म्हणून स्वीकारा. म्हणूनच इतर महत्त्वाच्या करारांप्रमाणेच त्याच्या सर्व अटी व शर्ती वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रेम हे निःसंशयपणे सुखी वैवाहिक जीवनाचा आधारस्तंभ आहे, परंतु लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी अनेक गोष्टींची चर्चा करणे आवश्यक आहे. ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर पुढे ते वादाचं कारण बनू शकतात.

लग्न करण्यापूर्वी ह्या 6 मुद्द्यांवर बोला

आर्थिक योजना

3 72

लग्न टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नाही. लग्नानंतर पैशाची समस्या अनेकदा वादाचं गंभीर कारण बनते. कोणाशी लग्न करण्याआधी आणि नातं जोडण्याआधी जाणून घ्या पैशाशी त्याचं काय नातं आहे. म्हणजे ते पैसे खर्च करण्यावर विश्वास ठेवतात की बचत करण्यावर विश्वास ठेवतात? जर तुमचा जोडीदार ऐशोआरामात वाढला असेल तर तुमच्याकडे असलेल्या पैशाचे नियोजन आधीच करावं लागेल. आर्थिक जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या याबद्दल तुम्ही एकमेकांसोबत सहमत असणे गरजेचे आहे.

- Advertisement -

घराचे नियोजन करा

4 70

लग्नानंतर सुखी घराचं स्वप्न प्रत्येकजण पाहतो. तुम्ही कुठे राहता हा तुम्ही घेऊ शकता अशा सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे कारण त्याचा तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर परिणाम होतो . लग्नाआधी आपल्या जोडीदाराशी ‘घर’ आणि त्याच्याशी संबंधित तुमची कल्पना यावर चर्चा करा.

तुम्हाला कुठे स्थायिक व्हायचं आहे की भाड्याने राहायचं आहे? घर किती मोठं आणि सुखसोयींनी युक्त असावं? एकत्र कुटुंब चालेल का? की स्वतंत्र राहण्याची आवड आहे? अनेक प्रश्न एकमेकाला विचारा.

बाळाचा निर्णय

5 70

लग्न गाठ बांधण्यापूर्वी तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने तुम्हाला मुलं हवी आहेत की नाही आणि असेल तर कधी आणि किती यावर चर्चा करा. लग्नानंतर किती वर्षांनी मुल हवं आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच संगोपन कसं करायचं आहे.

मुलांसाठी तुम्ही कोणती स्वप्न पाहता. आपल्या मुलांसाठी शहर, गाव, शाळा अशा अनेक प्रश्नांवर मतं जाणून घ्या. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाळ हवच आहे की नकोच आहे हा प्रश्न आधीच सोडवून घ्या.

- Advertisement -

नोकरी

6 62

आपल्या नोकरीने नंतर एकमेकांच्या जगण्यावर प्रभाव पडतो. जग खूप वेगाने बदलत आहे. लग्नानंतर महिलांना काम करण्यापासून रोखणे आणि त्यांना स्वयंपाकघरात बंदिस्त करणे अन्यायकारक आहे. कुटुंबाचा एकमेव कमावणारा पुरुष असेल तर पुरुषांसाठी महागाईमुळे ओझं बनतं.

पण एक चांगली गोष्ट आहे की आज बहुतेक जोडपी जबाबदाऱ्या वाटून घ्यायला तयार आहेत. नवरा आणि बायकोला एकमेकांच्या करियर बद्दलच्या अपेक्षा विचारून घ्या. जर एकाला परदेशात जायचं असेल आणि एकाला इथेच मायदेशी राहायचं असेल तर मात्र पुढे जाऊन वाद होऊ शकतात. ह्याबद्दल न लपवता स्पष्ट मत सांगा.

काही सवयी

7 56

प्रत्येकाला काही चांगल्या आणि काही वाईट सवयी असतात. जोपर्यंत ते एखाद्याच्या मार्गात अडथळा बनत नाहीत तोपर्यंत ते ठीक आहे. एखाद्याशी लग्न करण्यापूर्वी, आपण आपल्याबद्दल आणि त्यांच्या सवयींबद्दल बोललं पाहिजे आणि पण नाही एकमेकांच्या सवयी शी जुळवून घेता येईल की नाही याबद्दल आधीच बोला. जर तुम्ही एकमेकांशी जुळवून घेण्यास तयार असाल तरच तुम्ही पुढे जा. त्याचबरोबर तुम्ही बोलण्यातून सुद्धा एकमेकांचा स्वभाव आणि सवयी ओळखू शकता.

संवाद आवडतो की नाही

8 30

सुसंवादाशिवाय संसार कधीही होत नाही. म्हणजेच नातं टिकवण्याचा संवाद हा एकमेव मार्ग आहे. जोडीदाराशी मतभेद असले तरी सुद्धा संवाद खूप महत्वाचा आहे, यामुळे तुमच्या नात्यात स्पष्टता, पारदर्शकता आणि विश्वासाची भावना येऊ शकते. संवादामुळे तुमच्या दोघांमध्ये एक संबंध निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. त्याचबरोबर सोशल मीडिया आणि समाजात कसं राहावं, कसं बोलावं याबद्ल एकमेकांची मत जाणून घ्या

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories