गर्भधारणा – लक्षणे, चाचण्या, आहार, काळजी, व्यायाम, मालिश, आणि वैद्यकीय सेवा

या जगाची जगरहाटी सुरळीत चालावी म्हणून प्रत्येक जीवाला आपल्यासारख्या जीव निर्माण करण्याची क्षमता निसर्गाने दिली आहे. प्रत्येक जीवाला आपल्यासारखा व आपला अंश असलेला जीव जन्माला घालण्याची प्रजनन क्षमता निसर्गाने प्रत्येक प्राणीम‍ात्राला दिली आहे.

काही प्राणी, पक्षी अंडी घालतात तर काही पिलांना जन्म देतात. पृथ्वीवरील जीवजंतूंचे वर्गीकरणाचे ५ प्रकार आहेत हे वर्गीकरण त्यांच्या अंगावरील केस व कातडी, डोक्यावरचे केस, पंख,पाठीचा कणा,प्रजननक्षमता, हालचाल यावर अवलंबून असते.

गर्भधारणा

यापैकी सस्तन प्राण्यांमध्ये जीव जन्माला घालणे येते. मॅमल्स म्हणजेच सस्तन या वर्गामध्ये माणूसही येतो. इतर प्राण्यांमध्ये मूल जन्माला घालण्याची प्रजनन प्रक्रिया अगदी सहज सोपी आहे. बर्‍याचशा सस्तन प्राण्यांमध्ये एका वेळी पाच ते सहा पिल्ले होतात. गाय,म्हैस, हत्ती असे मोठे प्राणी सोडले तर सस्तन वर्गातली माता म्हणजेच मादी स्वतःची पिल्ले स्वतः बाहेर काढुन प्रसुती करतात. एव्हाना निसर्गाने त्यांना ही शक्ती दिली आहे.

- Advertisement -

मात्र मानवाच्या बाबतीत अगदीच वेगळा प्रकार आहे. माणसाला सर्व प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता दिली असली तरी माणूस प्रजनन क्षमतेच्या बाबतीत स्वतः काहीच करू शकत नाही. प्रजजन किंवा बाळंतपण हे दुसर्‍यांकरवी करून घेतले जाते.

माणसांतील प्रजनन –

गर्भधारणा

माणसांमधील प्रजननपद्धती बरीच जटिल व क्लिष्ट आहे. गर्भधारणा झाल्यापासून अगदी बाळंतपणापर्यंत अनेक टप्प्यांमध्ये वेगवेगळे आयाम येतात. ज्यांना मातेला सामोरे जावे लागते.

मुल जन्माला येण्यासाठी माता व पिता हे शारीरिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे. कोवळ्या वयातील मुली माता झाल्यानंतर त्यांचे स्वतःचे शारीरिक स्वास्थ्य खराब होते आणि बरेचदा मातामृत्यू होतो. भारतामध्ये आदिवासी भागांमध्ये अनेक कमी वयाच्या मुलींमध्ये गर्भधारणेचे प्रमाण जास्त आहे. तसेच आदिवासी भागातील या महिला व मुलींमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू होण्याच्या घटना देखील जास्त आहेत.

- Advertisement -

बरेचदा पुरेशा ज्ञानाच्या अभावामुळे किंवा पारंपारिक पद्धतीमुळे महिलांचे प्रसूती दरम्यान मृत्यू होतात. यामध्ये जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, वेळेवर रक्ताची उपलब्धता न होणे किंवा ब्लडप्रेशर अचानक शूट होणे तसेच अतिदक्षता विभागाची सोय नसल्यामुळे अनेक मातांना आपले जीव गमवावे लागले आहेत. बाळंतपण म्हणजे आईचा दुसरा जन्म असतो असे म्हटले जाते ते

याचमुळे! बाळंतपण व आई होणे ही नैसर्गिक  प्रक्रिया असली तरी या प्रक्रियेच्या दरम्यान व्यवस्थित काळजी घेणे, योग्य व सकस व सर्वंकष आहार घेणे, साधे व्यायाम व योगासने करणे, प्रसूतीच्या दरम्यान प्रसूती करणारे हात स्वच्छ व योग्य तंत्र शिकलेले व अनुभवी असतील तर ही प्रक्रिया अगदी सुसह्य होते. पूर्वी वैद्यकीय सुविधा फारशा उपलब्ध नसल्यामुळे गावाकडे सुईन किंवा दायींन या बायकांच्या प्रसूतीची कामे करत असत. ज्यामध्ये बरेचदा मुलाची गर्भनाळ ही जुन्या ब्लेडने, विळ्याने किंवा दोऱ्याने कापली जायची ज्यामध्ये हायजीन पाळला जात नसायचा ज्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका जास्त राहत असे.

अशा परिस्थितीमध्ये तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या मेडिकल शाखेचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांना व नर्सेसना खूप चॅलेंजेसला सामोरे जावे लागले. आज परिस्थिती इतकी बिकट नाही मात्र तरीही काळजी घेतली जावी ही प्रत्येकाची अपेक्षा असते. बाळ व बाळंतीण सुखरूप व स्वस्थ असले तर जीव सुखावतो.

गर्भधारणा कशी होते? Pregnancy Information In Marathi

गर्भधारणा

प्रत्येक मुलीला वयाच्या १२ ते १४ वर्षापर्यंत मासिक पाळी(Menstrual cycle) सुरु होते. मासिक पाळीमध्ये ३ ते ७ दिवस रक्तस्राव होतो. स्त्रीयांचे शरीर दरमहिन्याल‍ा गर्भधारणेला पुरक असे अस्तर बनवत असते. तसेच महिलांच्या शरीरामध्ये दर महिन्याला एक किंवा दोन स्त्रीबीजे तयार होतात. मासिक पाळीच्या 12 ते 14 दिवसाच्या काळामध्ये ओव्ह्युलेशनची (ovulation) प्रक्रिया होते.

अोव्ह्युलेशनच्या २ ते ३ दिवसात स्त्री पुरुषाचा असुरक्षित शारीरिक संबंध आला तर या दरम्यान परिपक्व झालेले स्त्री बीज पुरुषाचे शुक्राणु यांचा संयोग किंवा मिलन होते.  पुरुषाचे शुक्राणू सर्विक्स (Cervix) म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाद्वारे स्त्रीबीजापर्यंत पोहचतात. गर्भनलिकेमध्ये (fallopian tube) स्त्रीबीज(ovum) व शुक्राणू(sperms) यांचे मिलन होते. यातून झायगोट (zygote) नवीन जीव तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.

पहिल्या 24 तासात तयार झालेला ही नवीन पेशी म्हणजेच झायगोट(zygote) मूत्राशयामध्ये(uterus) तरंगत राहते. 24 तासांनंतर हा परिपक्व गर्भ (foetus) मुत्राशयातुन वाहत येत गर्भाशयाच्या भिंतीला येवुन चिकटतो. जिथे गर्भाचा विकास सुरु होतो. नाळ व वार म्हणजेच (placenta) ची निर्मिती होते. ज्याद्वारे विकसित होणार्‍या भ्रुणाला अन्न, पाणी व पोषण मिळते.

दिवसागणिक गर्भाशयातील भ्रुणाची वाढ होऊ लागते. या वाढीतील काही टप्पे खुप महत्वाचे मानले जातात. याकरता गर्भधारणा झाल्यापासुन ३ महिने, ५ महिने, ७ महिने व ९ महिने व प्रसुतीपूर्व गर्भाशयात वाढणार्‍या गर्भाचा आकार व वाढ याकडे लक्ष देण्याकरता व काही क्लिष्टता असल्यास योग्य निगरानी ठेवण्याकरता सोनोग्राफी केली जाते. गर्भाचा आकार वाढण्याबरोबर, पेशी, ऊती, इंद्रिय, इंद्रियसंस्थेची निर्मिती व अवयवांची वाढ होऊ लागते.

गर्भधारणा लक्षणे

गर्भधारणा
 • मासिक पाळी चुकणे- गर्भधारणा झाल्यामुळे अोव्हरीतुन स्त्रीबिज तयार होण्याची प्रक्रिया राबवणारे हार्मोन्स अक्रिय होतात व गर्भाची वाढ करणारे हार्मोन्स स्त्रवण्यास सुरवात होते.ज्यामुळे मासिक पाळी पुढच्या ४० आठवड्यांकरता थांबते.
 • हलके स्पॉटिंग होणे- बर्‍याचशा महिलांना गर्भधारणा (implantation) झाल्यावर हलके स्पॉटींग होते.याकरता सोनोग्राफीद्वारे कन्फर्म करणे महत्त्वाचे असते कारण बरेचदा गर्भ हा गर्भाशयात न चिकटता गर्भनलिकेत (fallopian tube)चिकटतो. याला Ectopic pregnancy असे म्हणतात. योग्य वेळी लक्ष दिले तर हा गर्भ रिप्लांट करता येतो मात्र योग्य वेळी तपासणी केली नाही तर गर्भनलिका कापावी लागते.
 • रक्तस्रावाची आणखी काही कारणे- प्रेग्नेंसी नंतर रक्तस्राव होत असेल तर याची काही गंभीर कारणे देखील असू शकतात. बरेचदा महिलांमध्ये गर्भ थांबत नाही व त्यामुळे मिसकॅरेज किंवा अॅबोर्शन होते. तर कधीकधी एक्टोपिक प्रेग्नेंसीमुळेदेखील फॅलोपियन ट्युबमध्ये गर्भ चिटकून राहतो व त्याचे लक्षण म्हणजे रक्तस्राव होतो.
 • डोके जड होणे व डोकेदुखी होणे- गर्भधारणेमुळे शरीरात आंतरक्रिया व अंतर्गत बदल घडतात, ज्यामुळे हार्मोन्सपातळी खाली-वर होते. ज्यामुळे डोके जड होणे व डोकेदुखीची समस्या निर्माण होते.
 • कोरड्या उलट्या व उलटीची भावना होणे- हा परिणाम सुद्धा गर्भधारणेचे कारण असते.
 • बद्धकोष्ठताचा त्रास होणे- गर्भाशयात गर्भ वाढत असल्याने पचनसंस्थेवर अतिरिक्त भार येतो यामुळे बद्धकोष्ठता व पचनसंस्थेसंबंधी समस्या निर्माण होतात.
 • शारीरिक थकवा वाटणे- गर्भधारणेमुळे होणार्‍या लक्षणांमुळे शारीरिक थकवा येतो. झोप,भुक व आरामाचे तंत्र बिघडल्यामुळे शरीर लवकर थकते.गर्भधारणेमुळे होणार्‍या शारीरिक बदलांमुळेदेखील शरीर थकते.
 • चक्कर येणे- गर्भधारणेमुळे रक्तदाब अनियमित होतो, त्यामुळे सुरवातीच्या दिवसात वारंवार चक्कर येण्याची समस्या निर्माण होते.
 • कंबरदुखी पाठदुखी- गर्भाशयावर अतिरिक्त भार आल्यामुळे व गर्भात वाढणार्‍या जीवाला आधाराची आवश्यकता असल्याने कंबरदुखी व पाठदुखीचा त्रास होतो.
 • पायात गोळे चढणे,पायांना सुज येणे- शारीरिक बदल व हार्मोन्समधील बदलांमुळे पायांना सुज येणे व पायात गोळे चढणे अशी लक्षणे दिसु लागतात.
 • स्तनांचा आकार वाढणे – प्रेग्नन्सीचे अजून एक लक्षण म्हणजे ज्या स्त्रिया गर्भवती असतात त्यांच्या स्तनांचा आकार दिवसेंदिवस वाढू लागतो.निसर्ग मातेला बाळाच्या जन्मानंतर तयार करण्यासाठी हा बदल तयार होत असतो.
 • वजन वाढणे- पहिल्या तीन महिन्यानंतर गर्भवती स्त्रीचे वजन वाढू लागते. गर्भामध्ये असलेल्या  बाळाकरता मातेला अतिरिक्त आहार घ्यावा लागतो. त्यामुळे गर्भातील बाळासोबतच मातेचे देखील वजन वाढते.
 • रक्तदाब वाढणे- प्रेग्नेंसीमुळे रक्तदाबावर परिणाम होतो बऱ्याच या स्त्रियांना प्रेग्नेंसी मध्ये श्वास घेण्यास अडचण होते व त्यामुळे रक्तदाब वाढतो व जीव घाबरून येतो. याकरता वेळोवेळी रक्तदाब तपासणी करणे आवश्यक असते.
 • डायरिया किंवा पचनसंस्थेसंबंधी त्रास होणे- बऱ्याच स्त्रियांना गर्भधारणेनंतर जुलाब किंवा डायरिया त्रास होतो तसेच अन्न पचण्यासाठी देखील जास्त त्रास होतो.
 • डिप्रेशन – अनेक स्त्रियांना या काळामध्ये हार्मोनल बदलांमुळे डिप्रेशनचा त्रास होतो. यामध्ये अचानकच भीती वाटणे, सतत टेंशन येणे, चिडचिड होणे या प्रकारची लक्षणे दिसून येतात.

तणाव आणि गर्भधारणा –

गर्भधारणा

प्रेग्नेंसी किंवा गर्भधारणेमध्ये येणाऱ्या नवीन बाळाची चाहूल सगळ्यांनाच आनंददायी वाटते मात्र येणाऱ्या

बाळामुळे पती-पत्नीच्यव वैयक्तिक संबंधांमध्ये बदल होतो. तसेच बरेचदा आर्थिक बाबींचे नियोजन केलेले नसते त्यामुळे देखील ओढाताण होते. याकरता जास्त प्रमाणात ताण-तणाव निर्माण झाल्यास डॉक्टरांशी सल्लामसलत करून योग्य ते उपचार करावेत. जेणेकरून गर्भवतीच्या मनावरील ताण तणाव कमी होईल.

महत्वाचे टीप –

गर्भधारणा

गर्भधारणेची ही लक्षणे जरी आपण टिपली असतील. तरीही आपण घरगुती यु.पी.टी प्रेग्नेंसी टेस्ट करावी. ब्लड टेस्ट करून प्रेगनेंसी कन्फर्म आहे किंवा नाही याबद्दल माहिती घेतली पाहिजे. कारण यातली बरीच लक्षणे ही प्री मेंस्ट्रुअल सिम्प्टम्समध्ये देखील पाहायला मिळतात. याकरता शास्त्रशुद्ध पद्धतीने टेस्ट करून प्रेग्नेंसी कन्फर्म करून घ्यावी.

गर्भधारणेनंतर बाळाचा जन्म होईपर्यंत प्रेग्नेंसीच्या आठवड्याप्रमाणे तीन टप्प्यांमध्ये वर्गीकरण केले आहे.

 पहिले तीन महिने – (1St trimester)

गर्भधारणा

पहिल्या तीन महिन्यांमध्ये बाळाचा विकास झपाट्याने होत असतो. 1 ते 12 आठवडे गर्भातील बाळाचा विकास होतो. जसे मेंदू, मनका यांची वाढ होते. तसेच या काळामध्ये बाळाच्या हृदयाचे ठोके देखील समजू लागतात. पहिल्या तीन महिन्यांमध्ये मिसकॅरेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. एका शोधानुसार असे समोर आले आहे की 85% प्रेग्नेंसी या पहिल्या त्रैमासिक काळामध्ये नष्ट होतात याकरता पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भवती महिलेला जपणे खूप आवश्यक असते. या काळात जास्त जोरात हालचाल करणे, पायऱ्या उतरणे -चढणे,  गरम पडणारे पदार्थांचे सेवन करणे, जोरात चालणे हे टाळावे. तसेच प्रेग्नन्सीमध्ये सावकाश कामे करावी.

दुसरे तैमासिक (2nd trimester )

गर्भधारणा

दुसऱ्या तिमाही गर्भधारणा काळामध्ये 13 आठवड्यांपासून 27 आठवडे मोजले जातात. या काळामध्ये आरोग्यसुविधा देणाऱ्या कर्मचारी नर्सेस व डॉक्टरकडून सोनोग्राफीद्वारे बाळाच्या शरीराचे अवयव व त्यांच्या वाढीबद्दल चेकअप केले जाते. या टेस्टमध्ये बाळाच्या अवयवांसंबंधी काही अबनॉर्मलिटीज असतील तर ते शोधून त्यावर उपचार केले जाऊ शकतात. या काळामध्ये बाळाचे लिंग देखील समजते.

दुसऱ्या त्रैमासिक काळामध्ये बाळाच्या हालचाली जसे लाथ मारणे, ठोसे मारणे हे मातेला गर्भाशयाला जाणवतात. 23 आठवड्यानंतर बाळ पोटामध्ये एकसारखे हलू लागते. बाळाला बाहेर येण्याची धडपड आपल्याला जाणवू लागते. 23 आठवड्यानंतर प्रेग्नेंसीमध्ये कॉम्प्लिकेशन आले तर डिलेवरी करता येते. त्या काळात जास्त काळजी घ्यावी लागते कारण या काळामध्ये कधीही डिलिव्हरी होऊ शकते.

तिसरे त्रैमासिक (3rd trimester)

गर्भधारणा

शेवटच्यव तीन महिन्यांमध्ये 28 ते 40 आठवडे पूर्ण होतात. वजन भरपूर प्रमाणात वाढते. पोटाचा घेर वाढल्यामुळे व वजन वाढल्यामुळे लवकर थकवा येतो. शेवटच्या तीन महिन्यांमध्ये बाळ डोळ्यांची उघड झाप करू शकते. या काळात बाळाची हाडे तयार होतात. प्रसूती कळा येण्याअगोदर गरोदर महिलेला अोटीपोटाच्या भागात(Pelvic Area) अनकम्फर्टेबल वाटते. पाय सुजतात. गर्भाशयाच्या तोंडाजवळ एकसारखे आकुंचन-प्रसरण पावण्याच्या प्रक्रिया सुरु होतात. डिलिव्हरी होण्याच्या एक आठवडा अगोदर अशी लक्षणे सुरू होतात.

प्रेग्नन्सी आणि आहार/ प्रेग्नेंसी डायट –

गर्भधारणा

प्रेग्नेंसीकरता असलेले डायट हे अगदी आपल्या रोजच्या सकस आहार सारखेच असते. मात्र प्रेग्नेंसी दरम्यान 340 ते 450कॅलरीज एक्स्ट्रा घ्याव्या लागतात, ज्यामध्ये कर्बोदके(कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट), प्रथिने(प्रोटीन), भाज्या आणि फळे(व्हेजिटेबल्स अॅण्ड फ्रुट्स), हिरव्या भाज्या  यांचा आहारात समावेश करावा लागतो. या पदार्थांचा समावेश तुम्ही पहिल्यापासूनच आपल्या आहारात घेत असाल तर आपल्याला काही वेगळे खाण्याची आवश्यकता नाही. पातळ द्रवरुप पदार्थ ,जास्त फायबरयुक्त पदार्थ, तसेच लोहाच(आयर्नचा) उच्च स्रोत असलेले पदार्थ प्रेग्नेंसी दरम्यान खाणे चांगले असते.

जीवनसत्त्वे व खनिजे – (Vitamins &Minerals)

गर्भधारणा

गर्भवती महिलेला सामान्य महिलेच्या तुलनेत जास्त प्रमाणामध्ये जीवनसत्त्व व खनिजांची (Vitamins & Minerals)आवश्यकता असते. फॉलिक अॅसिड आणि झिंक यांचा समावेश आहारामध्ये जास्त प्रमाणात घ्यावा लागतो. गर्भधारणा झाल्यानंतर आपल्या आहारामध्ये जीवनसत्त्व व खनिजांचे प्रमाण वाढवावे लागते. मात्र कोणतेही न्यूट्रिशन किंवा सप्लिमेंट्स आपल्या आहारात सुरू करण्याअगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणतेही सप्लीमेंट किंवा OTC(over the counter) मेडिकेशन घेण्याअगोदर डॉक्टरांना विचारून घ्यावे. काही तुरळक पदार्थ सोडले तर जीवनसत्त्व व खनिजेयुक्त (Vitamin & Minerals) सप्लीमेंट व त्यांचे मिक्सर आपल्या प्रेग्नेंसीला सुलभ करतात व प्रेग्नेंसीसाठी आवश्यक आहाराचा पुरवठा करतात.

प्रेग्नन्सी आणि व्य‍ायाम –

गर्भधारणा

गर्भवती महिलेने व्यायाम करणे आवश्यक असते. त्यामुळे महिलेला आपले शरीर फिट रिलॅक्स आणि बाळंतपणा करता तयार ठेवता येते. योगामधील काही स्ट्रेचिंगच्या व्यायामांमुळे पाठदुखी व कंबरदुखी यांमध्ये आराम मिळतो. इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की, प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम गर्भवती महिलांनी करू नये. तसेच व्यायाम करताना ट्रेनर किंवा मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली व्यायाम करावे. इतर प्रकारचे व्यायाम जसे चालणे, टेहळणे, पोहणे  हे व्यायाम देखील गर्भवती महिला करू शकतात.

जर तुमचे  प्रेग्नन्सी अगोदर रोजचे फिटनेस रुटी फिक्स असेल तर गर्भधारणेनंतर या रुटीनमध्ये काही बदल करावे लागतील. कारण गर्भधारणेच्या काळानंतर हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात व शरीरातील ऊर्जा देखील लवकर कमी होते. याकरता आपल्या फिटनेस ट्रेनरच्या सल्ल्याने आपण योग्य ते व्यायाम करू शकता. पहिल्या तीन महिन्यांमध्ये आपल्या शरीराला झेपतील एवढेच व्यायाम करावे.

प्रेग्नेंसी मसाज –

गर्भधारणा

गर्भधारणेच्या काळामध्ये महिलांमध्ये मानसिक व शारीरिक बदल मोठ्या प्रमाणात होतात. ज्यामुळे अस्वस्थता, भीति, बैचेनी, श्वास लागणे, दम लागणे, घाम येणे असे त्रास होतात याकरता माईंड व बॉडी रिलॅक्स करतील असा मसाज करण्यास हरकत नाही. जर तुम्हाला चिंतामुक्त व्हायचे असेल तर तुम्ही गर्भधारणेच्या काळातील मसाजचा अनुभव घेऊ शकतात. प्रेनॅटल (Prenatal massag) मसाजमुळे मेंदू चिंतामुक्त होतो व टेन्शन कमी होते. या प्रेनॅटल मसाजमुळे स्नायूंची हालचाल केली जाते ज्यामुळे कंबरदुखी पाठदुखीत आराम मिळतो.

प्रेग्नेंसीच्या काळात मसाज करणे अतिशय चांगली असते. मात्र पहिल्या तीन महिन्यांमध्ये मसाज करणे टाळावे. कारण पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भपात (मिस्कॅरेज) होण्याचा जास्त धोका असतो. शास्त्रशुद्ध तंत्र व ज्ञान असलेल्या व्यक्तींकडूनच मसाज करून घ्यावा. मात्र प्रेग्नन्सी दरम्यान मसाज करनार असाल तर त्या अगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण बरेचदा काही कॉम्प्लिकेशन्स असे असतात ज्या करता प्रेग्नन्सीमध्ये मसाज करणे चुकीचे असते.

प्रेग्नेंसी आणि मूत्राशयाचे इन्फेक्शन – (UTI)

15 2

युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन महिलांमध्ये गर्भधारणेनंतर होणार्‍या त्र‍ासांपैकी एक त्रास आहे. U.T.I या इन्फेक्शनमुळे बॅक्टेरिया योनीमार्गातून किंवा लघवीच्या जागेतुन गर्भाशयामध्ये पोहोचतो, ज्यामुळे गर्भाशयातील बाळ गर्भाशयावर जास्त प्रमाणामध्ये जोर व दाब देते. या काळामध्ये कधीकधी अचानकच प्री मॅच्युअर डिलीव्हरी करावी लागते.

लघवीला जळजळ होणे, लघवी करताना दुखणे, कळ येणे, त्रास होणे हे बॅक्टेरिअल इन्फेक्शनचे सामान्य लक्षण आहे. याशिवाय नकळत लघवी होणे, मळमळ- उलटी होणे, कंबरदुखी व पाठदुखी वाढणे तसेच लघवी वाटे रक्तकण किंवा अंगावरुन गाढ दाट पांढरे पाणी जाणे ही बॅक्टेरिअल इन्फेक्शनचे लक्षणे असतात. याकरता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी उपचार करून हे इन्फेक्शन थांबवता येते व इन्फेक्शन पसरवणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करता येते.

प्रेग्नेंसी दरम्यान बॅक्टेरिअल इन्फेक्शन वाढू नये याकरता योनीमार्गाची स्वच्छता व काळजी घ्यावी लागते. जसे शरीरसंबंधांनंतर युरीन पास करणे, मुत्राशय पूर्णपणे रिकामे करणे, भरपूर प्रमाणात पाणी पिणे,  वैयक्तिक साफसफाई करताना केमिकल्सयुक्त साबणाचा किंवा केमिकलयुक्त पावडरचा वापर करु नये. जर आपल्याला वरीलपैकी काही लक्षणे दिसत असतील तर आरोग्य सेवकाला याबद्दल माहिती दिली पाहिजे.या समस्येवर लवकर उपचार केले तर अँटिबायोटिक्समुळे बॅक्टरिया नष्ट करता येतो तसेच स्वच्छतेच्या सवयी बाळगल्या तर असे इन्फेक्शन होत नाही.

अधिक माहिती वाचा इथे : प्रेग्‍नेंसी यूरिन इन्फेक्शन चा घरगुती इलाज

सारांश (Conclusion) –

16 2

या लेखातून आपण प्रेग्नेंसीची म्हणजेच गर्भधारणेची प्राथमिक लक्षणे पाहिली. गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रियांच्या शरीरात कोणकोणते बदल होतात याबद्दल माहिती घेतली. याच बरोबर गर्भातील बाळाच्या वाढीचे तीन टप्पे देखील आपण जाणुन घेतले. गर्भवती स्त्रीने कसा आहार घ्यावा याबद्दल आम्ही या लेखातून माहिती सांगितली आहे. गर्भारपणातील मसाज, प्रेनॅटलमसाज याबद्दल माहिती घेतली. गर्भारपणातील मूत्राशय मार्गाचे इन्फेक्शन (UTC), गर्भवती स्त्रियांसाठी आवश्यक असलेल्या आहारामधील जीवनसत्त्वे व खनिज पदार्थांची माहिती व सप्लिमेंट फुडचे महत्व तसेच गर्भधारणा ते बाळंतपण या दरम्यानच्या काळामध्ये महिलेने स्वत:ची वैयक्तिक स्वच्छता व काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती पाहिली.

आपल्याला हा लेख कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा.

हे हि वाचा : वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता

हे हि वाचा : आरोग्यविषयक चांगल्या सवयी लावून घेण्याचे 10 मार्ग

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories