मासिक पाळी येण्यासाठी उपाय – मासिक पाळी नियमित येण्यासाठी करा हे 20 घरगुती उपाय.

मासिक पाळी येण्यासाठी उपाय – जर तुमची मासिक पाळी वय वाढणे, हार्मोन्सचं असंतुलन, वजन वाढणे अशा गोष्टींमुळे अनियमित असेल तर काळजी करू नका ह्या उपायांनी आपली मासिक पाळी नियमित येऊन मासिक पाळीचा त्रासही कमी होईल.

मासिक पाळी न आल्यास काय करावे? मासिक पाळी येण्यासाठी उपाय

गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅड वापरा.

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

मासिक पाळी येण्यासाठी तर गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅड वापरा. तुम्ही ऑर्थोपेडिक हीट बेल्ट वापरू शकता. फक्त प्लग करा, स्विच चालू करा आणि अंथरुणावर आराम करत उष्णतेने शेक घ्या. शरीरात उष्णता निर्माण झाली की मासिक पाळी वेळेवर येऊ शकते.

हर्बल नॉन-कॅफिनेटेड चहा प्या

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

कॅमोमाइल, तुळस किंवा कोणताही हर्बल नॉन-कॅफिनेटेड चहा किंवा गरम पातळ पदार्थ पिऊन मासिक पाळी येईल. अनियमित असेल तर ती नियमित येईल. मासिक पाळी येत नसेल तर दिवसभर उबदार पेय किंवा पातळ गरम पेय पिणे सुरू ठेवा.

मैदा खाणे बंद करा

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

काही महिन्यांसाठी, आपल्या आहारातून मैदा, साखर आणि तेलकट पदार्थ असलेले कोणतेही अन्न खाऊ नका. म्हणजे एका महिन्यासाठी तरी पूर्णपणे बंद करा. तुम्हाला डायबिटीस असल्यास तुम्ही शुगर फ्री टॅब्लेट वापरू शकता. मासिक पाळी अनियमित असेल तर मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी तुमच्यासमोर पाव, पांढरी ब्रेड, पिझ्झा, आणि बेकरी उत्पादन सोडण्याशिवाय इतर कोणताही उपाय नाही.

दररोज एक चमचा फ्लॅक्ससीड खा.

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

फ्लेक्स सिड म्हणजेच अळशीच्या बिया खाल तर अनियमित मासिक पाळीत फायदा दिसून येईल आणि मासिक पाळी येईल.

गायीचं तूप

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

आपल्या आहारात किमान 1 चमचा आणि जास्तीत जास्त 3 चमचे गायीचे तूप घ्या. गायीच्या तूपात आपल्या शरीराला सुदृढ करण्याची शक्ती असते. घरच तूप खाऊन तुमचं वजन वाढणार नाही. स्त्रियांचं थकलेल शरीर हे सुध्दा मासिक पाळी अनियमित येण्याचं कारण असतं.

शेवग्याची शेंग किंवा मोरिंगा पावडर

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

शेवग्याची शेंग जेवणात घ्या किंवा मोरिंगा ओलिफेराच्या म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी बनवा. ह्याने मासिक पाळी वेळेवर येईल.

अळीवाची खीर

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

मासिक पाळी येण्यासाठी अळीवाची खीर करा. आठवड्यातून दोनदा प्या किंवा तुम्ही अळीवाचे लाडू बनवू शकता.

वजन कमी करा

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) च्या सामान्य श्रेणीत आहात याची खात्री करा. म्हणजेच 18.5 ते 24.9. आवश्यक असेल तर आपलं वजन कमी करा. बहुतेक प्रकरणांमध्ये वेटलॉसने आपोआपच तुमची मासिक पाळी नियमित येईल. भुजिया, चिप्स, वडा असे तळलेले पदार्थ खाणं थांबवा.

ताण घेऊ नका

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

तुम्ही गृहिणी असा किंवा नोकरदार तुम्हाला जर मासिक पाळी अनियमित असेल तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही खूप ताण घेत असाव्यात. आपल्याला पीरियड्स दरम्यानसुध्दा भरपूर विश्रांतीची आवश्यकता असते. ताण घेणं टाळा.

व्यायाम करा

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

जेव्हा तुम्ही विश्रांती घेता तेव्हा असं नाही की दिवसभर अंथरुणावर पडून राहायचं. ह्या काळात व्यायाम करणे महत्वाचे आहे. लोअर बॅक आणि हॅमस्ट्रिंगसाठी फक्त काही स्ट्रेचिंग करा. आणि नंतर काही लोअर अप व्यायाम करा. फ्लटर किक, पाय लांब करून त्याचे व्यायाम करणे इ. हे दोन्ही व्यायाम एकाच वेळी खालच्या ओटीपोटात आणि मांड्या दोन्हीवर लक्ष्य करतात जिथे खूप दुखतं.

सर्वांगासन

12 1

मासिक पाळी अनियमित असेल तर सर्वांगासन हा योगासनाचा योग्य प्रकार आहे. वैज्ञानिकदृष्ट्या त्याचा तुमच्यावर किती परिणाम होतो हे कुणी सांगू शकत नाही, पण स्त्रियांचे काही डॉक्टर ह्याची शिफारस करतात. सर्वांगासन हे तुम्हाला माहित नसल्यास आपण मासिक पाळीच्या कालावधीत असता तेव्हा ते शिकण्याचा प्रयत्न करू नका. नंतर शिका आणि नियमित करा. मासिक पाळीत आराम करा.

एक पेनकिलर घ्या.

13 1

पेनकिलर घेणे हा जरी सर्वोत्कृष्ट पर्याय नसला तरी मासिक पाळी वेळेवर येत नसेल आणि आली तरी आराम करा आणि पेनकिलरची गोळी घेऊ शकता. हा असा तात्पुरता दिलासा घ्यावा लागतो. पण जर आपल्याला मासिक पाळी अनियमित येऊन आली की वेदना होत असतील वेदना कमी करण्याचं औषध घ्यायचं असेल तर कृपया स्त्रीरोग तज्ञाला भेट द्या.

दीर्घ श्वास आणि ध्यान

14 1

मासिक पाळी येण्यासाठी आणि मासिक पाळी अनियमित असेल तर प्राणायाम करा. दीर्घ श्वास घ्या. ह्यामध्ये आकुंचन लहरींमध्ये श्वास घेताना अत्यंत वेदनां जाणवतात आणि नंतर वेदनेची दुसरी लाट येण्यापूर्वी हळू हळू श्र्वास सोडा आणि वेदना दूर गेल्याच जाणवेल.

लोह सेवन आणि व्हिटॅमिन सी वाढवा.

15 1

स्त्रियांना सतत अशक्तपणा येतो म्हणजेच शरीरात लोहाची आणि व्हिटॅमिन सी ची पातळी कमी होते.

हायड्रेटेड रहा

16 1

मासिक पाळी येण्यासाठी रोजच्या दिवसांपेक्षा जास्त पाणी प्या. 3 लिटरपेक्षा जास्त आणि 5 पेक्षा कमी पाणी प्या.

दिवसभर कमी प्रमाणात खा.

17 1

बद्धकोष्ठता किंवा पित्त ह्या गोष्टी सामान्य आहेत, पण जास्त जेवू नका. पौष्टिक आहार घ्या.

चॉकलेट खा काम होईल

18 1

चॉकलेट खा आणि मासिक पाळी अनियमित असेल तर नियमित येईल. किंवा थांबली असेल तर लगेच मासिक पाळी येईल. अर्थात तुम्ही तुमच्या बाबतीत प्रयत्न करून बघू शकता. पण खूप उत्साहित होऊ नका. मासिक पाळी दरम्यान साखरेचा जास्त खाणे ही चांगली गोष्ट नाही. एखादं डार्क चॉकलेट पुरेस आहे. दिवसभरात डार्क चॉकलेटचे काही तुकडे खा.

मासिक पाळी यावी ह्यासाठी आपल्या चहामध्ये किंवा कॉफीमध्ये दालचिनी घाला.

19 1

शेवटी जर तुम्हाला महिन्याभरात ही विलक्षण, खूप जास्त किंवा थोड्या प्रमाणात रक्त (स्पॉटिंग) दिसलं तर कृपया स्त्रीरोगतज्ज्ञांना भेट द्या. पीसीओडी आणि एंडोमेट्रिओसिस असलेल्या स्त्रियांनी सर्व उपाय करून आणि औषधं वेळेवर घेतल्याने मासिक पाळी नियमित होते.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow
Urjas Vigour & Vitality Capsules for Men - ✅100% Ayurvedic | ✅No Side Effects
1 Month Pack @ ₹719 Only!

Recent Stories