तुमची आणि जोडीदाराची प्रजनन क्षमता वाढवायची आहे? तर रोज पेरू खा.

वैद्य सांगतात पेरूमध्ये असलेले विशेष औषधी गुण महिला आणि पुरुष दोघांची प्रजनन क्षमता वाढवतात. यासोबतच गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या हाडांच्या विकासासाठीही पेरू उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.

पेरू प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. संशोधनात झालंय सिद्ध

पावसाळा संपताच पेरूचा हंगाम सुरू होतो. हे असं फळ आहे, की ते पाहूनच ते खाण्याचा मोह होतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हे खूप फायदेशीर आहे. कच्च्या फळांव्यतिरिक्त, पेरू जाम, जेली, चटणी इत्यादी स्वरूपात खाल्ला जातो. आणि प्रत्येक स्वरूपात त्याचे आरोग्य फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की पेरू तुमची आणि तुमच्या जोडीदाराची प्रजनन क्षमता देखील सुधारतो. त्यामुळे जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या आहारात पेरूचा नक्कीच समावेश करा.

पेरू इतका औषधी आहे कारण…

तुमच्या आवडत्या पेरूमध्ये स्त्रीबीज आणि प्रजनन क्षमता वाढवण्याची क्षमता आहे. यामध्ये फायबर व्यतिरिक्त फोलेट आणि व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढते. निरीक्षण अभ्यास सांगतो की ज्या स्त्रियांनी जास्त आहारातील फायबर घेतले त्यांना कमी फायबर घेतलेल्या स्त्रियांपेक्षा गर्भधारणेची शक्यता जास्त असते.

पेरूसोबतच जगभरातील अनेक देशांमध्ये आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर केला जातो. जर तुम्हालाही प्रजनन क्षमता वाढवायची असेल किंवा निरोगी गर्भधारणा करायची असेल तर तुमच्या आहारात पेरूचा नक्कीच समावेश करा. हे फळ केवळ तुमची आणि तुमच्या जोडीदाराची प्रजनन क्षमताच वाढवत नाही तर गर्भधारणेदरम्यान खाणे देखील फायदेशीर आहे.

यूएस नॅशनल मेडिकल लायब्ररी पबमेडनुसार, विस्टर रॅट्सवर एक अभ्यास करण्यात आला. उंदरांना पेरूच्या पानांचा अर्क खायला दिला. काही दिवसांनी नर उंदरांचे शुक्राणूंचे उत्पादन वाढले. त्याआधारे पेरूच्या पानांमध्ये असलेल्या इथेनॉलमुळे हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

गरोदरपणात पेरू खाणं कितपत सुरक्षित आहे?

गरोदरपणात पेरू न खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. एक प्रसिध्द न्यूट्रिशनिस्ट नीता वोहरा यांनी याबाबत म्हणतात की, गर्भधारणेदरम्यान काही फळे खाण्यास मनाई आहे. पण काळजी करु नका, पेरू त्यापैकी एक नाही.

पण लक्षात ठेवा की गरोदरपणात पिकलेला आणि न सोललेला पेरू खायला हवा. कच्चा आणि कुजलेला पेरू खाऊ नका. यामुळे अतिसार होऊ शकतो. पेरू जास्त प्रमाणात खाल्ल्याने डिहायड्रेशन होऊ शकतं. यामध्ये असलेले फायबर आतड्याची हालचाल सुधारते. यामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असतं, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

गर्भात वाढणाऱ्या बाळासाठीही ते फायदेशीर आहे

पेरूमध्ये असलेले मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जातंतूंना आराम देते. जीवनसत्त्वे ए, सी, ई व्यतिरिक्त, पॉलिफेनॉल आणि कॅरोटीनॉइड्स बॅक्टेरियाच्या संसर्गापासून आणि रोगांपासून संरक्षण करतात. फॉलीक ऍसिड, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असलेले पेरू न जन्मलेल्या बाळाच्या मेंदू आणि हाडांच्या विकासासाठी मदत करू शकतात.

ह्यातलं फेनोलिक कंपाऊंड रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करते. जगभरातील पारंपारिक पद्धती मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग आणि परजीवी संसर्गावर उपचार करण्यासाठी पेरू आणि पेरूच्या पानांचा वापर करतात.

तसच पेरू आणि पेरूच्या पानांमध्ये फिनोलिक आढळतात, जे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमन करतात. तर पेरु खायला काहीच हरकत नाही. पण तुम्हाला कुठले गंभीर आजार सुरु असल्यास एकदा आपल्या डॉक्टरांना विचारा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories