चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांच्या समस्येने बऱ्याचशा स्त्रिया त्रासलेल्या असतात. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर लहान केस किंवा कूप असतात परंतु, काही स्त्रियांच्या चेहऱ्यावर जास्त काळसर, दाट आणि कडक केस असतात. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मेकअप करणे तर अवघड होतेच, पण महिलांचा आत्मविश्वासही कमी होतो.
चेहऱ्यावरील केसांपासून सुटका मिळवण्यासाठी आज बाजारात अनेक प्रकारची प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेतच त्याचसोबत स्त्रिया आणि मुली वॅक्सिंग, थ्रेडिंग किंवा लेझर ट्रीटमेंटसारख्या महागड्या पद्धतींनी या नको असलेल्या केसांपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात.
परंतु या पद्धतींचे फायदे त्यांना फार काळ मिळत नाहीत.पुन्हा पुन्हा केस येतातच. मग ह्यासाठी काय करावं? म्हणूनच चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हीही अधिक प्रभावी, स्वस्त आणि प्रभावी मार्ग शोधत असाल तर ह्या काही पद्धती वापरून पाहू शकता.
या पाककृती स्वयंपाकघरात आणि घरात वापरल्या जाणार्या दैनंदिन गोष्टींच्या मदतीने तयार केल्या जातात आणि त्यांचा वापर केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.
चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांपासून मुक्त होण्याचे सोपे उपाय
मध-लिंबू वॅक्स

- एका भांड्यात अर्धा ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा.
- नंतर त्यात २ चमचे साखर, चमचाभर मध आणि २-३ चमचे लिंबाचा रस मिसळा.
- मंद आचेवर सर्वकाही शिजवा.
- साखर वितळून जेलसारखी झाली की चमच्याने हळूहळू ढवळत असताना थोडा वेळ शिजवून घ्या.
- त्यातील पाण्याचे प्रमाण गरजेनुसार वाढवता येते.
- मिश्रणाचा रंग तपकिरी झाला की आचेवरून उतरवा.
- आता केस काढण्यासाठी तुम्ही वॅक्स क्रीम वापरता तसं हे वापरा.
ॲलोवेरा आणि पपई पॅक

- अर्धी वाटी पिकलेल्या पपईचे तुकडे घेऊन त्याची पेस्ट तयार करा.
- नंतर त्यात २ चिमूटभर हळद घाला.
- 3-4 चमचे ताजे कोरफड गर (किंवा तुम्ही बाजरात मिळणारं जेल वापरू शकता) मिक्स करा.
- सर्व साहित्य नीट मिसळा आणि चेहऱ्याच्या ज्या भागात जास्त केस आहेत त्या भागावर लावा.
- ही पेस्ट चेहऱ्यावर 20-25 मिनिटे राहू द्या.
- फेसपॅक सुकल्यावर हलक्या हातांनी पुसून टाका.
- चेहरा स्वच्छ झाल्यावर एलोवेरा जेलने चेहऱ्याला मसाज करा.
- 15-20 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ करा.वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर केस येण्याचा धोकाही वाढतो, जाणून घ्या