मासिक पाळीच्या त्रासातही राहा आनंदी आणि निरोगी. फक्त एवढंच करा. कसलाही त्रास जाणवणार नाही.

मासिक पाळीच्या काळातही तुम्हाला बरं वाटेल. जर तुम्हालाही मासिक पाळी दरम्यान तणाव, दुःख, वेदना, चीड, राग सगळं दाटून येत असेल, काहीही नवीन करावं वाटत नसेल तर येथे दिलेल्या टिप्स फॉलो करा.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. दर महिन्याला महिलांना ओटीपोट, कंबर, मांड्या, डोके या दुखण्यातून जावे लागते. यामुळे त्यांना चार ते पाच दिवस बरे वाटत नाही.

मासिक पाळीचा त्रास कमी करा सोप्या टीप्स ने

1. व्यायामामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल

3 21

मासिक पाळी दरम्यान बेडवर झोपू नका. या दिवसातही हलका व्यायाम, ध्यान, योगासने करा. त्यामुळे मन प्रसन्न होते. मूड चांगला राहील. तुम्हाला हवं असल्यास, घरी चालणे, स्ट्रेचिंग व्यायाम करा. यामुळे अंगातल्या वेदना कमी होतील.

2. अंग शेकवून काढा

4 19
- Advertisement -

ते दाबून तुम्ही मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त होऊ शकता. गरम पाण्याच्या पिशवीत गरम पाणी ठेवा आणि त्याद्वारे कंबर, पोट इत्यादी शेकवा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल. पोट, कंबर वगैरे गरम पाण्याच्या पिशवीने भिजवा. दुखण्यात आराम जाणवेल.

3. शरीर हायड्रेटेड ठेवा

5 20

शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका. मासिक पाळीच्या काळातही द्रवपदार्थ सेवन करणे आवश्यक आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी प्या. दूध, रस इत्यादी प्या. यामुळे तुम्हाला बळही मिळेल. काही महिलांना मासिक पाळीच्या वेळी पोट फुगणे, पोटदुखी असे त्रास होतात. अशा परिस्थितीत पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने या त्रासांपासून बचाव होतो.

4. ॲक्टिव्ह बना

6 17

दिवसभर अंथरुणावर पडून राहणे देखील चांगले नाही. ऍक्टिन नसल्यामुळे, लक्ष वारंवार वेदना, तणाव आणि मूड स्विंगकडे वळवले जाईल. सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. थोडं चाला छोट्या छोट्या गोष्टी करा. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. फोनवर मित्राशी बोला. बरं वाटेल.

5. भरपूर विश्रांती आणि झोप घ्या

7 17
- Advertisement -

रात्री उशिरापर्यंत जागे राहू नका. पुरेशी झोप घेणं देखील महत्त्वाचं आहे. सकाळी ताजा मूड घेऊन जाग येईल. रात्रीच्या वेळीही पोटदुखी होत असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने शेकून घ्या. यामुळे त्रास कमी होईल आणि झोप लवकर येईल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories