व्हिटॅमिन्स आणि स्त्रिया ! पन्नाशीनंतर स्त्रियांना अनेक आजार सुरु होतात कारण ह्या ठराविक व्हिटॅमिन्सची कमतरता असते. ती कशी दूर करायची?

Advertisements

वयानुसार अनेक आजार वाढू लागतात. जर आपण पन्नाशीनंतरचं वय म्हणजे स्त्रियांच्या रजोनिवृत्ती नंतरचं असतं. मासिक पाळी बंद झाल्यामुळे अनेक समस्या वाढू लागतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अनेक आजरांची सुरुवात होऊ शकते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांचं नुकसान होतं. व्हिटॅमिन बी सारख्या इतर घटकांच्या कमतरतेमुळे पचन, आतड्याची हालचाल आणि शरीराच्या अनेक कार्यांवर परिणाम होतो.

अशा स्थितीत वयाच्या पन्नाशीनंतर महिलांनी शरीरातील काही जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण अशा तीन व्हिटॅमिन्सबद्दल माहिती घेऊया जी वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येक स्त्रीसाठी आवश्यक बनतात.

पन्नाशीनंतर महिलांमध्ये असते व्हिटॅमिनची कमतरता

व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेमुळे होतील हे त्रास

3 17

50 वर्षांनंतर महिलांमध्ये व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता दिसून येते. व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेमुळे त्वचेवर सूज आणि लालसरपणा येतो. त्यामुळे बर्‍याच वेळा त्वचेवर डाग, पुरळ येतो. हात आणि पाय सुन्न होऊ शकतात, त्यामुळे कधी कधी काटेरी वेदना जाणवू शकतात.

याशिवाय जीभ आंबट आणि लाल होऊ शकते आणि तोंडाच्या कोपऱ्यात भेगा पडू शकतात. याशिवाय, काही वेळा स्त्रिया गोंधळलेल्या, चिडचिड्या आणि दुःखी दिसू शकतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन बी 6 पुरवणे आवश्यक आहे. यासाठी पालक, चणे, एवोकॅडो, गाजर आणि सालमन फिश खा.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होणारे आजार

4 17

वयाच्या पन्नास वर्षांनंतरच्या महिलांमध्ये व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा धोका जास्त असतो. हे कदाचित वैद्यकीय स्थिती, कमी-कॅलरी असलेला आहार किंवा भूक न लागल्यामुळे होऊ शकतं. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता, जुलाब, भूक न लागणे किंवा गॅसची समस्या वाढते.

Advertisements

यासोबतच शरीर सुन्न व्हायला सुरुवात होते आणि मुंग्या बऱ्याचदा पायात आणि हातात येतात. यासोबतच कधी-कधी स्नायू कमकुवत होणे,चालायला त्रास होणे यांसारख्या मज्जातंतूचे त्रासही सुरु होतात. यासोबतच महिलांना नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे किंवा वागण्यात बदल यासारख्या मानसिक समस्याही जाणवू शकतात.

अशा परिस्थितीत व्हिटॅमिन बी 12 ची पूर्तता करा आणि त्यासाठी टयूना फिश, भरड धान्य, हरभरा, हिरव्या पालेभाज्या, केळी, पपई, संत्री आणि कॅनटालूप यासारखी फळं खा.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जाणवतील हे त्रास

5 13

व्हिटॅमिन डी आपल्या मजबूत हाडांसाठी आवश्यक आहे, कारण ते शरीराला आहारातून कॅल्शियम वापरायला मदत करते. पारंपारिकपणे, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा संबंध रिकेट्सशी जोडला गेला आहे, हा एक रोग असतो ज्यामध्ये हाडं स्वतःच कमकुवत होऊ लागतात.

त्यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर जेव्हा हाडांच्या समस्या वाढू लागतात तेव्हा समजून घ्या की व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. याशिवाय व्हिटॅमिन डीमुळे हृदयविकारासारखे गंभीर आजारही होऊ शकतात. अशावेळी फक्त सूर्यप्रकाश घेतल्याने काम होणार नाही, आपल्याला आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

त्यामुळे पन्नाशीनंतर शरीरात ह्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेची विशेष काळजी घ्या आणि तुम्हाला ह्या आजारांची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. काही टेस्ट करून ते तुम्हाला व्हिटॅमिन्स सप्लिमेंट देऊ शकतात आणि आजार असल्यास त्यावर उपचारही सांगू शकतात.

Advertisements

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories