गर्भधारणेदरम्यान बायोटिन खूप महत्वाचं आहे. कमतरतेमुळे येईल थकवा आणि नैराश्य! आहारातून बायोटिन कसं काय मिळेल.

Advertisements

मूल गर्भात असताना, आई ज्या पद्धतीने खाते किंवा वागते, त्याचा थेट परिणाम मुलावर होतो. त्यामुळे मिळत आहेत ना! असं एक जीवनसत्व म्हणजे बायोटिन किंवा व्हिटॅमिन बी7. हे पाण्यात विरघळणारं बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन आहे, जे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्यात मोठी भूमिका बजावते. प्रोटिन्स, कार्ब्स,फॅट्स शोषून घ्यायला हेच बायोटिन आवश्यक आहे. म्हणूनच डॉक्टर गर्भवती महिलांना गर्भधारणेदरम्यान बायोटिन आणि फॉलिक अँसिडच्या गोळ्या यांसारख्या सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतात.

गर्भधारणेदरम्यान बायोटिनच्या कमतरतेची लक्षणे

अनेक गर्भवती महिलांना बायोटिनच्या कमतरतेचा त्रास होतो कारण गर्भधारणेदरम्यान त्यांच्या शरीरात बायोटिन अधिक वेगाने विघटित होते. बायोटिनच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, खराब नखं आणि केस, डायबिटीस, भूक न लागणे, थकवा, निद्रानाश, नैराश्य येणे असे एक ना अनेक आजार जडू शकतात.

बायोटिनच्या कमतरता भरून काढण्यासाठी हे पदार्थ खा

दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी

अंड्यातील पिवळ बलक मध्ये बायोटिन मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय दूध, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्येही बायोटिनचे प्रमाण चांगले असते. गरोदरपणात तुम्ही या गोष्टी तुमच्या आहारात सहज समाविष्ट करू शकता. अंड्यातील पिवळ बलक आणि दुग्धजन्य पदार्थांमधूनही तुम्हाला भरपूर प्रोटिन्स मिळू शकतात, जे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक आहे.

सुका मेवा खा

गरोदरपणात ड्रायफ्रूट्स खाल तर तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत..अक्रोड, शेंगदाणे आणि बदाम काजू यांसारख्या ड्रायफ्रूट्स मधून आणि संपूर्ण धान्यांमध्ये बायोटिन मुबलक प्रमाणात आहे.

Advertisements

याव्यतिरिक्त, त्यात ओमेगा -3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी आणि थायामिन असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी आणि हाय बीपी कमी करतात. ड्रायफ्रूट्स नियमित खाल तर गर्भधारणेदरम्यान खूप फायदेशीर आहेत.

मासे आणि मांस

बायोटिन मासे आणि मांसामध्ये देखील मुबलक प्रमाणात आहे. जे गर्भधारणेदरम्यान तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. यामुळे तुम्हाला चांगली झोपही मिळते आणि तणाव आणि नैराश्य येत नाही.

शेंगा

काळे वाटाणे किंवा बकव्हीट, सोयाबीन आणि इतर शेंगा देखील बायोटिनचे समृद्ध स्त्रोत आहेत,ज्याने केस मजबूत होतात आणि स्नायूंचा थकवा भरून काढायला होते. बायोटिनच्या कमतरतेमुळे अनेकांना चक्कर येणे, पायात मुंग्या येणे असे त्रासही होतात.

फळे आणि भाज्या

अनेक ताजी फळं आणि भाज्या हे व्हिटॅमिन्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. एवोकॅडो, फुलकोबी, रास्पबेरी, मशरूम, गाजर, काकडी आणि कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात बायोटिन असते. तसेच, पालेभाज्या खाऊन आपल्याला अनेक प्रकारची पोषक घटक मिळतात.

Advertisements

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories