मासिक पाळीत रक्ताच्या गुठळ्या का होतात? त्याकडे दुर्लक्ष करु नका तर कारण समजून घ्या.

मासिक पाळी आली की दर महिन्याला स्त्रियांना कधीकधी नव्या समस्यांना सामोरं जावं लागतं. काही वेळा मासिक पाळीत अशा काही गोष्टी घडतात की ज्यांची उत्तरं आपल्याला माहित नसतात. प्रसंगी काही वेळा प्रश्न पडतो की पिरियड क्रॅम्प्स का वाढतात किंवा मासिक पाळी मध्ये रक्तस्त्राव जास्त का होतो?

अजूनही एक प्रॉब्लेम स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी दिसतो त्या म्हणजे मासिक पाळीमध्ये रक्ताच्या गुठळ्या दिसतात. तुम्हालाही जर मासिक पाळीच्या वेळेस रक्तात अशा गुठळ्या होत असल्या तर याचं कारण काय आहे हे या लेखातून समजून घ्या.

पीरियड क्लॉट्स म्हणजे काय?

मासिक पाळी आली तर रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे गुठळ्या होतात. पण हे जर नियमित असं होत असेल तर मग अशा रक्ताच्या गुठळ्या झाल्यावर याचं कारण आणि उपाय आपल्याला शोधायलाच हवेत. हे चिंतेचे कारण आहे. मासिक पाळीमध्ये रक्ताच्या गुठळ्या का तयार होतात?

- Advertisement -

मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असेल तर त्याला मेनोरेजिया म्हणतात.  तुम्ही दर दोन तासांनी तुमचा पॅड बदलत असल्यास, तुम्हाला जास्त वेळ रक्तप्रवाह होऊ शकतो. हे अस्वस्थ करणारं आणि अनेकदा वेदनादायक असतं.

याची अनेक संभाव्य कारणे असू शकतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त मासिक पाळी येत आहे. पण या समस्येवर एक इलाज आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्याची कारणे काय आहेत ते जाणून घ्या.

सिरियल कलर्स किंवा जास्त रक्तस्त्राव होण्याची कारणे अनेक आहेत त्यामुळे मासिक पाळी खूप जास्त आल्यासारखे वाटते या त्रासावर उपाय सुद्धा आहेतच त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका तर त्यामागचं कारण, उपाय जाणून घ्या.

पीरियड क्लॉट्स/ रक्ताच्या गुठळ्या का होतात?

1. गर्भनिरोधक गोळ्या

- Advertisement -

तुम्हाला IUD झाला असेल तर तुम्हाला जास्त मासिक पाळी येते. यामागचं कारण आहे गर्भनिरोधक गोळ्या घेणे. ह्यालाच नॉन हार्मोनल पिल्स म्हणतात. जर तुम्ही नुकत्याच गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या असतील तर तुमच्या मासिक पाळीत गुठळ्या झालेल्या दिसू शकतात.  तुम्ही स्त्री रोग तज्ञाचा सल्ला घ्या.

2. गर्भपात

जर तुमचा गर्भपात सुरुवातीच्या काही दिवसात झाला असेल तर नंतर अनेकदा मासिक पाळीच्या वेळी रक्ताच्या गुठळ्या दिसतात. तुम्हाला असा त्रास होत असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा.

3.पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम PCOS

तुमच्या मासिक पाळीच्या चक्रात रक्त गोठून गुठळ्या होतात

तर याचं कारण आहे पीसीओएस. PCOS म्हणजे हार्मोनल असंतुलन. पीसीओएस मध्ये अंडाशयावर फॉलिकल्स तयार होतात आणि त्यामुळे गुठळ्या होतात. PCOS अशी लक्षणे दिसल्यास उपचार घ्या.

4. एंडोमेट्रिओसिस

तुमच्या गर्भाशयाच्या आत वाढणारी टिशू गर्भाशयाच्या पोकळीच्या बाहेर वाढते यालाच एंडोमेट्रिओसिस  म्हणतात. यामुळे तुमच्या मासिक पाळीच्या चक्रात फक्त स्त्राव भरपूर होतो ओटीपोटात दुखतं आणि क्रॅम्प येतात. हे खूप त्रासदायक असतं आणि वेदना सुद्धा होतात.

5. फायब्रॉइड्स

फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयातल्या गाठी. प्रायव्हेट फायब्रॉइड्स सारख्या गाठी गर्भाशयाच्या आतमध्ये वाढतात. मग मासिक पाळीत त्रास होऊन मासिक पाळी वेदनामय होते. फायब्रॉइड्सचे अनेक प्रकार आहेत सबम्यूकोसल फायब्रोइड्स गर्भाशयाच्या पोकळीत वाढत जातो. त्यामुळे भरपूर रक्तस्त्राव आणि रक्ताच्या गुठळ्या होतात.

मासिक पाळी आली की अंग दुखायला लागतं. हे सगळे त्रास गर्भाशयाच्या मुखावर किंवा गर्भाशयाच्या अस्तरात वाढणारे हे फायब्रॉइड्स असतात. जर तुम्हाला मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असेल किंवा पाठदुखीचा त्रास होत असेल तर ते फायब्रॉइड्समुळे असू शकतं. मासिक पाळीत  पीरयड क्लॉट्स म्हणजे रक्ताच्या गुठळ्या दिसल्या असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories