स्त्रियांना कुठेही, कधीही चक्कर कोणत्या करणांमुळे येते. ही कारण तुम्हाला माहित असायला हवीत.

Advertisements

सगळं गोल फिरतं आणि कुठेही चक्कर येते. स्त्रियांना चक्कर येण्याची अनेक कारणं असू शकतात. तुम्हालाही हा त्रास होत असेल तर तुम्हाला ही कारणं माहीत असायला हवीत. डोक्यात अचानक दुखायला लागतं आणि डोक्यात गरगर फिरून पडणे यालाच चक्कर आली असं म्हणतात. स्त्रियांमध्ये चक्कर आली तर ती फक्त गर्भधारणेशी संबंधित नसते.

स्त्रियांना येणारी चक्कर ही जीवनसत्वाची कमतरता, थकवा, झोपेची कमतरता किंवा गंभीर आजाराचं लक्षण देखील असू शकते. कधीकधी आपण चक्कर येणे हा त्रास हलक्यात घेतो, परंतु जर ते वारंवार होत असेल तर ते एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

ही आहेत स्त्रियांना चक्कर येण्याची मुख्य कारणे

लो ब्लड प्रेशर चा त्रास

3 77

कधीकधी रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे चक्कर येते. चक्कर आल्याने डोळ्यांसमोर अंधार पडणे, काही क्षण बेशुद्ध होणे, हातपाय थंड पडणे इत्यादी गोष्टी होऊ शकतात. कधी-कधी उभं राहिल्यावर चक्कर जास्त जाणवते. अशावेळी जर तुम्हाला दीर्घकाळ लो-ब्लडप्रेशरची समस्या असेल आणि तुम्हाला चक्कर येत असेल, तर तुम्ही ताबडतोब मिठाचे पाणी प्यावे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषध सुरू करावे.

हिमोग्लोबिनची कमतरता

4 78

हिमोग्लोबिन कमी होणे हे चक्कर येण्याचे मुख्य कारण आहे. ही समस्या स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. हिमोग्लोबिनचे काम रक्ताला ऑक्सिजन देणे आहे. रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे एखादी स्त्री ॲनिमियाचा बळी होऊ शकते.

दैनंदिन आहारात लोहाची कमतरता, गर्भधारणेदरम्यान आणि मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते. कमी हिमोग्लोबिनमुळे महिलांना डोकेदुखी, अशक्तपणा आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे महिलांनी त्यांच्या आहारात मासे, हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीटरूट, अंडी आणि ड्रायफ्रूट यांचा समावेश करावा.

Advertisements

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता

5 70

गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन 12 ची कमतरता नॉर्मल आहे. शरीरात B12 च्या कमतरतेमुळे शारीरिक कमजोरी, भूक न लागणे, बद्धकोष्ठता आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तोंडावर फोड येणे, त्वचा पिवळी पडणे आणि चालण्यात अशक्तपणा येऊ शकतो, ज्यामुळे चक्कर येऊ शकते. हे व्हिटॅमिन प्राणीजन्य पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थामधून मिळेल.

मायग्रेनमुळे चक्कर येते

6 57

मायग्रेनमध्ये तीव्र डोकेदुखीमुळे चक्कर येते. मायग्रेन डोकेदुखी सोबतच मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात. स्त्रियांमध्ये, हे हार्मोनल असंतुलनामुळे होते. मायग्रेन टाळण्यासाठी स्त्रियांनी त्यांच्या जीवनशैलीत आणि आहारात काही बदल करायला हवेत. उन्हाळ्यात अतिप्रवास टाळा, दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी प्या, चहा-कॉफीचे पिणे कमी करा, खूप थंड पदार्थ खाऊ नका, चालण्याची सवय लावा आणि आहारात ताक, सूप आणि नारळाच्या पाणी जास्त प्या.

व्हर्टिगो/ कानाच्या इन्फेक्शनमुळे

7 49

जेव्हा कानाच्या आतील भागाला दुखापत, इन्फेक्शन किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्रास होतो, तेव्हा सुद्धा स्त्रियांना चक्कर येऊ शकते. या समस्येला व्हर्टिगो असेही म्हणतात. हा त्रास काही काळासाठी आणि दीर्घ काळासाठी देखील असू शकतो.

यामध्ये चेहऱ्यावर घाम येणे, अशक्तपणा जाणवणे, तीव्र डोकेदुखी यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. आता तुम्हाला चक्कर येण्याची कारणं माहित झालेली आहेत. चक्कर आल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Advertisements

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories