जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही तुमच्या आहारात जिरं आणि गुळाचे लाडू समाविष्ट करू शकता. मासिक पाळीच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी जिरं आणि गुळाचे लाडू खा, कसे बनवायचे ते जाणून घ्या
मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी स्त्रियांसाठी थोडी त्रासदायक सुद्धा ठरते. मुली आणि महिलांना महिन्यातून एकदा मासिक पाळी दरम्यान समस्यांना सामोरे जावेच लागते. अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान खालच्या ओटीपोटात तीव्र वेदना होतात. खूप दुखतं. कारण ह्या काळात प्रोस्टॅग्लॅंडिन हार्मोन सोडला जातो, ज्यामुळे खालच्या ओटीपोटात वेदना आणि पेटके येतात.
जरी हे दुखणं नॉर्मल आहे, परंतु कधीकधी ही वेदना असह्य होते. यासोबतच महिलांना मासिक पाळीदरम्यान चिडचिड होणे, डोकेदुखी, सूज येणे आणि थकवा यासारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक महिला औषधांचा आधार घेतात.
पण, हया औषधांचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी एक प्रभावी उपाय सांगणार आहोत.
जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही तुमच्या आहारात जिरं आणि गुळाचे लाडू खाऊ शकता. जिरं आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने मासिक पाळीच्या दुखण्यापासून लवकर आराम मिळतो. यासह, हे पौष्टीक लाडू मूड स्विंग्स व्यवस्थापित करण्यास देखील मदत करतात. मासिक पाळीत अनेक महिलांना भूक न लागणे आणि अपचनाचा त्रास होतो. अशा वेळी गूळ आणि जिऱ्याचे लाडू खाल्ल्याने पचन चांगलं होतं आणि भूकही लागते.
चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे जिरं आणि गुळाचे लाडू
- साहित्य
- 50 ग्रॅम जिरं
- 25 ग्रॅम गूळ
- ड्रायफ्रूट्स
- १ चमचा तूप
जिरा आणि गुळाचे लाडू कसे बनवायचे
- जिरं आणि गुळाचे लाडू बनवण्यासाठी एका कढईत जिरं आणि गूळ घालून चांगले तळून घ्या.
- थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. पावडर होईपर्यंत ते बारीक करावे लागते.
- नंतर दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा.