पीरियड्स लवकर येण्यासाठी आलं असं वापरा! आल्याचा उपाय करुन मासिक पाळीचे त्रास कमी होतील..

सध्या महिलांमध्ये उशीरा मासिक पाळी येणे किंवा वेळेवर न येणे ही समस्या खूप सामान्य आहे. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे ही समस्या उद्भवते.

स्त्रियांमधील हार्मोनल असंतुलनामागे अनेक कारणे देखील कारणीभूत असू शकतात, ज्यामध्ये खराब आहार, बैठी जीवनशैली, शरीरातील पोषणाचा अभाव, PCOS आणि PCOD इत्यादी समस्यांचा समावेश आहे. 

शरीरातील हार्मोन्स च्या असंतुलनामुळे केवळ महिलांना मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या उद्भवते, तर मासिक पाळीदरम्यान तीव्र क्रॅम्प्स आणि गर्भधारणेदरम्यान समस्या देखील दिसून येतात. मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी आणि अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी महिला विविध औषधे आणि घरगुती उपायांचा अवलंब करतात. पण तरीही अनियमित मासिक पाळीची समस्या कायम आहे.

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि आहारतज्ज्ञ  यांच्या मते, जर एखाद्या महिलेला मासिक पाळी वेळेवर येत नसेल, तर तिने या विषयावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून ते मूळ कारण शोधू शकतील. तुमचे डॉक्टर उपचारांसाठी काही औषधे आणि जीवनशैलीत बदल सुचवू शकतात.

जर तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा उपचारासोबत समावेश केला तर ते तुम्हाला तुमची मासिक पाळी येण्यास मदत करू शकते – असे एक अन्न म्हणजे आले.  ह्या लेखात आपण पीरियड्स लवकर येण्यासाठी आल्याचा वापर कसा करता येईल याची संपूर्ण माहिती समजून घ्या.

मासिक पाळी येण्यासाठी आल्याचा उपयोग कसा होतो?

डायटीशियनच्या मते, जर महिलांनी आलं नियमित खाल्लं  तर ते मासिक पाळी नियमित करण्यात मदत करू शकतं. कारण आल्यामध्ये जिंजरॉल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातल्या आजारांवर लढण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. याशिवाय आलं प्रमाणात खाल्ल्याने गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावायला मदत होते. यासोबतच आलं हार्मोन्सचे संतुलन सुधारण्यातही आलं मदत करते. मासिक पाळी येण्यासाठी आलं कसं खायचं

चहा म्हणून घ्या

आहारात आल्याचा समावेश करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. आल्याचा चहा मध मिसळून दिवसातून २-३ वेळा पिऊ शकता. पण इथे आपण दूध आणि चहापावडर असलेल्या चहाबद्दल बोलत नाही आहोत. आपण हर्बल आल्याच्या चहाबद्दल बोलत आहोत. तुम्ही फक्त आलं पाण्यात उकळू शकता, गाळून घ्या आणि अधिक मध घालून प्या.

जेवणातून खा 

तुमच्या भाज्यांमध्ये मसाला म्हणून आल्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त जेवणासोबत सलाडच्या स्वरूपात आल्याचे तुकडे खाऊ शकता. यामुळे अन्नाचं पचन सुधारेल.

आलं आणि मध खा

आलं थेट एक इंचापर्यंत ठेचून, त्यात मध घालून तुम्ही त्याचे सेवन करू शकता. हे हार्मोन्सचे संतुलन सुधारण्यास देखील मदत करेल.

आलं अनियमित मासिक पाळीच्या उपचारांसाठी पर्याय नाही, ते फक्त योग्य उपचार आणि लाईफस्टाल सोबतचा उपाय म्हणून हार्मोनल प्रॉब्लेम्सवर मात करायला मदत करते. त्यामुळे सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन उपचार करा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories