अजूनही तारुण्यात मी. चाळीशीतही पंचविशीतली तरुणी दिसाल, ह्या 10 टीप्स करायला सुरुवात करा.

चाळीशी नंतरही, निरोगी आणि सुंदर दिसण्याची इच्छा प्रत्येक स्त्रीला असतेच. स्त्री असो वा पुरुष, वाढते वय हे नवीन प्रश्न घेऊन येते. अशा परिस्थितीत, जेव्हा स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा चाळीशी नंतर बायकांच्या शरीरात अनेक बदल होतात. ह्याचं कारण असं की स्त्रीचं आरोग्य आणि कार्यप्रणाली तिच्या हार्मोनल हेल्थसोबत जोडलेली असते.

चाळीशी नंतर, हार्मोनल आरोग्य बदलते आणि हार्मोन्सचे उत्पादन कमी होते. याचा स्त्रियांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. ह्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर, हृदयरोग आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच चाळीशी नंतरही तारुण्य कायम ठेवून निरोगी राहा. फक्त ह्या टिप्स काळजीपूर्वक पाळा.

स्त्रियांसाठी चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टीप्स

सकाळचा पौष्टीक नाश्ता

4 32

नाश्ता महत्वाचा आहे, हे आतापर्यंत बऱ्याचदा तुम्ही हे ऐकलं असेल. सुदृढ आरोग्याची सुरुवात करायची असेल तर ती सकाळच्या नाश्त्याने करा. नाश्ता केल्याने चयापचय सुधारते आणि ते हळूहळू गतिमान होते. ह्यामुळे नंतर आपण जे काही खातो ते पटकन पचते आणि शरीरात चरबी जमा होत नाही. म्हणून निरोगी वजन राखण्यासाठी, आपण आपल्या दिवसाची सुरुवात पौष्टीक नाश्त्याने केली पाहिजे.

- Advertisement -

व्यायामाला पर्याय नाही

5 31

चाळीशीनंतर शरीराला व्यायामाची विशेष गरज असते. व्यायामामुळे फक्त तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यच सुधारत नाही तर कॅन्सर, हृदयरोग, डायबिटिस आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. तुम्ही थोडा हलका व्यायाम करा किंवा योगा करा, निश्चितपणे असे काहीतरी करा जे तुमच्या शरीराचा व्यायाम करेल, स्नायूंना सक्रिय करेल, शरीराला सक्रिय ठेवेल आणि मनाला डिटॉक्सिफाइड ठेवेल.

जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचे ररक्तभिसरण चांगले होते, ज्यामुळे तुमची त्वचा चांगली होते. तुमची साखर पचली जाते आणि इन्सुलिन योग्यरित्या काम करते, ज्यामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो आणि नंतर रक्तदाब संतुलित होतो, ज्यामुळे शेवटी तुमचे हृदयसुध्दा निरोगी राहते.

वजन वाढू देऊ नका

6 32

तुमच्या वयामुळे वजन वाढणे, मासिकपाळी निवृत्तीनंतरचे हार्मोनल बदल, चयापचय दर कमी होणे तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. ह्यामुळे तुम्ही लठ्ठपणाला बळी पडू शकता. अशा परिस्थितीत, पौष्टीक आहारासह काही व्यायाम प्रशिक्षणासह कार्डिओ एकत्र करून व्यायाम करायला सुरुवात करा.

अति टेन्शन घेऊच नका

7 28

कोणताही आजार दूर ठेवण्यासाठी ताण तणाव व्यवस्थापन आवश्यक आहे. योग, ध्यान किंवा नृत्य किंवा संगीत ऐकणे, आपल्यासाठी अशा ताण तणाव हलका करणाऱ्या गोष्टी शोधा. खरं तर, शरीरातील हार्मोनल आरोग्याव्यतिरिक्त, मानसिक आरोग्य असंतुलित करण्यासाठी तणाव देखील जबाबदार असतो. टेन्शन घेऊन त्वचाही निस्तेज आणि थकलेली बनते आणि उगाचच भूक वाढते. अशाप्रकारे, तुम्ही खूप खाता आणि तुमचा आकार बेढब करण्याबरोबरच ताण तुम्हाला लठ्ठ बनवू शकतो.

- Advertisement -

हाडांचे आरोग्य

8 23

वयानुसार, शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. अशा परिस्थितीत बायका अनेकदा टाच दुखणे, पाठदुखी आणि सांधेदुखीची तक्रार करतात. ह्यावर एकच करा आपल्या कॅल्शियमच्या सेवनाची विशेष काळजी घ्या. ऑस्टियोपेनिया आणि ऑस्टियोपोरोसिस टाळण्यासाठी कॅल्शियम 1 ग्रॅम आणि व्हिटॅमिन डी 800-1000 आययू दररोज आवश्यक आहे. परंतु ते घेण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांशी बोला.

आहारातील बदल

9 14

चाळीशीनंतर, शरीरात काही पोषक घटकांची कमतरता जाणवते. शरीराचे अवयव त्यांची क्षमता गमावू लागतात आणि शरीर अशक्त होते. अशा स्थितीत काही पोषक बदल करूया. ह्या पोषक घटकांची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करावेत जसे जास्त प्रोटीन मिळवण्यासाठी पालेभाज्या आणि सोबत सोयाबीन आणि अंडी खा.

लक्षात ठेवा मीठा खाणे कमी केल्याने तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहायला मदत होईल. ह्याव्यतिरिक्त, बायकांनी आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन बी -12, प्रोबायोटिक्स आणि ओमेगा -3 फॅटी ॲसिडने समृध्द पदार्थ दररोज खावेत.

थोडं सोशल व्हा

10 11

मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी स्वतःला सामाजिक जीवनात व्यस्त ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. ह्यासाठी तुमचे मित्र आणि नातेवाईक ह्यांच्याशी संपर्कात रहा. तुमचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी, तुमचा मूड वाढवण्यासाठी आणि तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी नेहमी स्वतःला चांगल्या लोकांनी घेरलेले ठेवा. ह्यामुळे वाढत्या वयानुसार होणारे नैराश्य आणि इतर मानसिक आजार तुम्ही टाळू शकाल.

- Advertisement -

रजोनिवृत्ती

11 7

एका वयानंतर शरीर मासिक पाळी निवृत्तीच्या दिशेने जाऊ लागते. प्रक्रिया लांब असली तरी, तुम्ही तुमची रजोनिवृत्ती सुधारण्यासाठी त्यावर काम करू शकता. म्हणूनच, तुमचा आहार आणि जीवनशैली चांगली ठेवा जेणेकरून तुमची मासिक पाळी निवृत्ती लवकर होऊ नये.

ह्याव्यतिरिक्त, रजोनिवृत्तीचा त्वचेवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, त्वचेमध्ये कोलेजनचे प्रमाण वाढवा, ज्यासाठी व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले पदार्थ खा. हे तुमचे सुरकुत्यांपासून रक्षण करेल आणि तुम्ही लवकर म्हातारे दिसणार नाही.

शरीराची नियमित तपासणी करा

12 3

डोळे आणि दात यांची काळजी घ्या. चाळीशीनंतर काही टेस्ट नियमित करा जसं की थायरॉईड टेस्ट, ब्लडशुगर आणि बीपी टेस्ट करा. लिपिड प्रोफाइल टेस्ट तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत, म्हणून त्याही पूर्ण करा. तसेच, गर्भाशय ग्रीवाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर तपासण्यासाठी दर काही महिन्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करत राहा.

अशा प्रकारे, आपण आपल्या आहार विहारात आणि जीवनशैलीमध्ये बदल करून चाळीशीनंतर निरोगी जीवन जगू शकता. तसंच तुम्हाला तंदुरुस्त आणि सुडौल शरीरासह चमकदार तरूण त्वचा मिळू शकेल.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories