About Marathi Health Blog

आपल्या निरोगी आरोग्य व शरीर स्वास्थ्य कमावण्याकरता आपण सुरु केलेल्या प्रवासामध्ये आम्ही आपले सोबती आहोत! आपल्या शरीर अस्वास्थ्यामुळे आपण आयुष्यातील जे अनमोल क्षण व संधी गमावल्या आहेत त्या प्रत्येक क्षणाचे महत्व आम्ही जाणतोव समजतो! आपले चांगले आरोग्य व फिटनेस जपण्याकरता आपण सुरु केलेल्या या फिटनेस प्रवासामध्ये आम्ही कायम आपल्या सोबत आपले मित्र, मार्गदर्शक व प्रोत्साहक होऊन आपल्या या प्रवासात निरंतर आपली साथ देवू.

कोणी जाहिरातबाजी करतो किंवा सेलिब्रिटीजकडुन केलेल्या मार्केटींगमुळे आपणही तसे फिटनेस फंडे वापरणे चुकीचे आहे. प्रत्येकाच्या आहार-विहार तसेच प्रकृती भिन्नतेनुसार प्रत्येकाचे फिटनेस रुटीन वेगळे असायला हवे असे आम्हाला वाटते. याकरता आम्ही प्रत्येक व्यक्तिकरता अगदी वैयक्तिक मार्गदर्शन करायला हवे या मताचा पुरस्कार करतो. केवळ जाहिराती पाहुन किंवा एखाद्या व्यक्तीचा अनुभव हा प्रमाण न मानता प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो यावर आमचा विश्वास आहे.

कोणाचे अंधानुकरण करण्यापेक्षा प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे पर्सनालाईज फिटनेस रुटीन असायलाच हवे. तुमच्या शरीर स्वास्थ्य व फिटनेसकरता आम्ही तुमची मदत करू इच्छितो. मराठी हेल्थ ब्लॉगद्वारे आम्ही आपल्याला शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल मुक्तपणे बोलणारे व ऐकुन घेणार्‍या आपल्या मित्राची भूमिका आम्ही बजावतो. फिटनेस कमवण्यासोबतच आम्ही आपणास आपल्या संपुर्ण आयुष्यभरासाठी आपली सोबत देवू इच्छितो.

जेव्हा लोक आमच्याकडे वेगवेगळे फिटनेस चॅलेंजेस घेऊन आमच्याकडे येतात. तेव्हा आम्ही आपले म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतो व आपल्या सर्व आरोग्य समस्या व शारीरीक अडचणींवर आमच्या संघटना मार्फत आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते. आपला फिटनेस जपण्यास आणि आपल्याला निरोगी व स्वस्थ आरोग्य लाभावे हाच आमचा कयास आहे. आपला प्रत्येक हेल्थ गोल पूर्ण  करण्यात आम्ही या प्रवासात आपल्याशी बांधिल आहोत.

आपण आमच्या मराठी हेल्थ ब्लॉगच्या संबंधित इतरी स्रोतांद्वारे निरोगी शरीर व स्वस्थ जीवन जगण्यासाठी मराठी हेल्थ ब्लॉगचे इतर स्त्रोत जसे लायब्ररी, बातमीपत्र, एप्प्स , पॉडकास्ट आणि समूह संघटनांना आपण भेट द्यावी.

आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

– Team Marathi Health Blog