या आयुर्वेदिक उपायने वयाच्या 50 व्या वर्षी देखील तरुण दिसाल, चेहऱ्यावरील काळे डाग, वांग गायब…

चेहरा ही मनुष्याला मिळालेली एक प्रकारची नैसर्गिक देणगीच आहे. कारण माणसाचे हास्य, दु:ख, लोभ, पाप, पुण्य, क्रोध यांसारख्या भाव-भावना या चेहऱ्यावरूनच समजतात. चेहऱ्यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असते आणि चेहऱ्यावरूनच बऱ्याच वेळा माणसांची पारख केली जाते.

एवढे महत्व असणाऱ्या चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकुत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काळे डाग जर दिसू लागले तर त्या व्यक्तीला अवघडल्यासारखे वाटते, त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही कमी व्हायला लागतो. 

मग अशावेळी अनेकजण बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध क्रीम्स, पार्लर किंवा इतर औषधांचा सर्रास वापर सुरु करतात पण या सगळ्या प्रयोगात शरीराला किंवा चेहऱ्याला त्यांचे साईड इफेक्ट्स भोगावे लागु शकतात.

चेहऱ्यावर काळे डाग येण्याची प्रमुख कारणे अनुवंशिक, सतत उन्हात फिरणे, हार्मोनल बदल, वाढते वय, प्रदूषण ही कारणे असू शकतात, असे अनेक तज्ज्ञांनी अभ्यासातून सिद्ध केले आहे. तसेच आपल्या शरीरामध्ये काही असे घटक असतात त्यानें आपल्या शरीराचा रंग चमकदार बनते. परंतु हा घटक कमी पडल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तेज कमी होत असतं.

त्यामुळे सर्वात आधी आपल्याला हा घरगुती उपाय करण्यासाठी एक पेस्ट तयार करायची आहे. त्यासाठी टोमॅटो कापून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. मग त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून घायची आहे. मग त्यामध्ये थोडे बेसन पीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे.

कारण हे हळद ,बेसन पीठ आणि टोमॅटो या तीनही पदार्थांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे पोषक द्रव्ये असतात त्यामुळे आपली त्वचाला ही पोषक द्रव्ये मिळून तिला चमकदार बनवतात. मग त्यांनंतर या मिश्रणात चिमूटभर मीठ टाकायचे आहे. तर मिठामध्ये सुद्धा अशा काही प्रॉपर्टीज असतात ज्या आहेत त्या शरीराला मदत करत असतात. 

मग हे मिश्रण एकजीव करून त्यामध्ये कोरफडीचे जेल टाकायचे आहे. कारण त्या कोरफडला आयुर्वेदात औषधी वनस्पती मानले जाते. जे गुणधर्म आपल्या चेहऱ्यासाठी खुप उपयुक्त असतात. मग हे मिश्रण तयार करून आपल्या शरीरावर आपल्या चेहऱ्यावर येथील हलक्या हाताने मालिश करून केल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावे.

हा उपाय आपल्याला अखंड 1 महिना कारायचा आहे. आपल्याला ही पेस्ट आठवड्यामध्ये ही एक वेळेस लावायचे आहे. तसेच यामधील हळद ही शरीरासाठी खुप उपयोगी ठरते. तसेच कोरफडीचा आपली त्वचा चमकण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरते. दुसरा उपाय म्हणजे प्रत्येकाच्या घरी गव्हाचे पीठ असतेच ते घेऊन तुम्हाला हा फेसपॅक तयार करायचा आहे.

हा फेसपॅक करण्यासाठी 4 चमचे गव्हाचं पीठ घ्या, खरपूस कलर येईतोवर मंद गॅसवर्ती भाजावे. ते थोडे थंड होऊ द्या आणि नंतर मेडिकल स्टोर मधून गुलाबजल आणावे व तिसरी वस्तू म्हणजे दूध, न उकळलेल दूध घ्या व त्यानंतर तुम्हाला हे तीन वस्तू अशा रीतीने मिक्स करा की चेहऱ्यावर लावता येईल.

मग त्यावेळी तुम्ही 10 ते 15 मिनिटे चेहरा आधी स्वच्छ धुवून पुसून मगच फेसपॅक लावा. सुकल्यावर थोडं मालिश केल्यासारखं तो काढा म्हणजे चेहऱ्यावर असणारे सर्व डाग, वांग निघून जाईल शुद्ध पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा साबण वापरू नका.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories