मांसाहारापासून दूर राहतात नीता अंबानी ! रोज पितात या फळाचा ज्यूस, जाणून घ्या नीता अंबानी यांचा फिटनेस रुटीन !

जगप्रसिद्ध बिझनेस मॅन व भारतातले आघाडीचे बिझनेस मॅन मुकेश अंबानी यांची पत्नी असलेल्या नीता अंबानी यांना कोण ओळखत नाही? नीता अंबानी या त्यांच्या फिटनेस व लुक्समुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या लुक्स सोबतच स्लिम बॉडी मेंटेन ठेवत त्यांनी आपला फिटनेस देखील खूप चांगला जपला आहे. नीता अंबानी त्यांच्या सौंदर्यामुळे व फिटनेस मुळे अनेक महिलांचे इन्स्पिरेशन झाले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आजही 57 वर्षाच्या नीता अंबानी अगदी टवटवीत गुलाबासारख्या दिसतात.

बिझनेसमेन मुकेश अंबानी यांची व पत्नी धीरूभाई अंबानी यांची मोठी सून याव्यतिरिक्त नीता अंबानी यांनी आपला स्वतःचा एक ठसाच समाजामध्ये उमटवला आहे. लग्नानंतरही त्यांनी आपले शिक्षण क्षेत्रातील शिक्षक म्हणून असलेले योगदान बंद न करता आपले काम चालू ठेवले होते. तसेच त्यांनी एक सोशल वर्कर अॅक्टीव्हिस्ट म्हणून देखील आपली छबी समाजामध्ये तयार केली आहे. त्यांच्या धीरुभाई अंबानी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे त्या नेहमीच मोठमोठ्या कामांसाठी सामाजिक योगदान देताना नेहमीच अग्रेसर असलेले आपण पाहिले आहेच!

आज आम्ही आपल्याला नीता अंबानी यांचा रोजचा हेल्थ रुटीन आपल्याशी शेअर करणार आहोत. चला तर जाणून घेऊया नीता अंबानी यांचा दिनक्रम काय आहे?

नीता अंबानी या शाकाहारी जेवणाच्या पुरस्कर्त्या आहेत.आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त शाकाहारी पदार्थ घेण्याकडे त्यांचा कल आहे. सकाळी लवकर उठून व्यायाम व योगा करत नीता अंबानी आपल्या दिवसाची सुरुवात अगदी फिटनेस ठेवण्यापासून करतात.

नीता अंबानी यांचे खानपान

3 15

सकाळच्या नाश्त्यामध्ये सर्वप्रथम ड्रायफ्रुट्सचा समावेश करतात – सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट त्या दुधासोबत खातात. त्यानंतर नाश्त्यात अंड्याचा पांढरा भाग असलेल्या पदार्थाचे ऑम्लेट खाणे पसंत करतात. नाश्त्यात फळांचा ज्युस, फ्रुट सलाड घेणे पसंत करतात. दुपारचा जेवणामध्ये साधे भारतीय शाकाहारी जेवन घेणे त्या पसंत करतात. दुपारच्या जेवनासोबतच नीता अंबानी शक्यतो विविध भाज्यांचे सूप घेणे पसंत करतात. संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स किंवा अल्पोपहार म्हणून देखील त्या अगदी हेल्दी फुड व भाज्या असे पदार्थ सेवन करतात.

रात्रीच्या जीवनाच्या वेळी त्यांच्या डिनरमध्ये कायम हिरव्या पाल्य‍भाज्य‍ा खाण्याचा त्यांच‍ कटाक्ष असतो. यासोबतच प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये मुख्यत्वे कडधान्य, कर्बोदके नसलेले पदार्थ ऊसळी यांचा समावेश त्या आहारात करतात.

रोज पितात डिटॉक्स वॉटर

4 14

हेल्थ ड्रिंक म्हणून दिवसातून पाच वेळा वेगवेगळ्या पाच प्रकारचे हेल्थ ड्रिंक नीता अंबानी आपल्या आहारामध्ये समाविष्ट करतात. ज्यात मुख्य ज्यूस म्हणजे बीट ज्यूस होय. असे म्हटले जाते की, बीट ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न व फॉलिक ऍसिड असते ज्यामुळे त्वचा चिर:तरुण राहते व सुरकुत्या देखील येत नाहीत तसेच महिलांसाठी हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी बीट ज्यूस पिणे अगदी आरोग्यदायी मानले जाते. नीता अंबानी आपल्या रोजच्या आहारामध्ये बीट ज्यूस आवर्जून घेतात तसेच इतर महिलांना देखील रोज आहारात बीट ज्यूस घेण्याचे फायदे सांगतात.

असे म्हटले जाते की, नीता अंबानी यांचे त्यांच्या लग्नाच्या वेळी वजन फक्त 47 किलो होते. मात्र त्यांच्या तीन बाळंतपणानंतर त्यांच्या वजनामध्ये प्रचंड वाढ झाली. मुले झाल्य‍‌ानंतर त्यांचे जवळजवळ चाळीस ते पन्नास किलो वजन वाढले होते. त्यामुळे त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होवु लागल्या होत्‍या. वाढलेले वजन कमी करुन फिटनेस जपण्याकरता त्यांनी वेगवेगळे उपाय शोधुन काढले व खास स्वत:चा रुटीन टाईम टेबल ठरवून घेतला आहे.

नियमित व्यायाम आणि डान्स क्लास

5 15

नीता अंबानी या कथ्थक डान्सर आहेत त्यामुळे आपल्या छंदाला देखील त्यांनी मागे न सोडता विरंगुळा म्हणून कथ्थक डान्स देखील करतात. व्यायाम करना करता त्या योगासने, डान्स , स्विमिंगला आवर्जून महत्व देतात. आकाश, ईशा आणि अनंत ह्या तीन मुलांची आई असलेल्या नीता अंबानी अगदी एखाद्या तरुण मुली सारख्या सुंदर व तेजस्वी दिसतात. त्यांच्या हेल्दी रुटीनमुळे आज त्या प्रकृती ठणठणीत ठेवत आपल्या कार्यपद्धती व कामकाजात हवे ते साध्य करू शकल्या आहेत.

जर आपल्याला ही चांगले फिटनेस असलेले जीवन जगायचे असेल नीता अंबानी यांचा हेल्थ रुटीन आजमावायला काही हरकत नाही.
आपल्याला आमचा हा लेख आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories