जिरे, बडीशेप आणि ओवा हे मिश्रण दूर करेल या 5 समस्या, जाणून घ्या फायदे आणि वापरण्याची पद्धत.

जिरे, बडीशेप आणि ओवा वापरण्याचे अनेक फायदे आहेत. तिन्ही पदार्थ सहज घरात उपलब्ध असतात. खरंतर आपल्या घरीच कित्येक औषधं उपलब्ध असतात. फक्त आपल्याला त्यांचा वापर माहित असावा लागतो. यासाठी आम्ही मराठी हेल्थ ब्लॉग च्या माध्यमातून आपल्याला अशी आरोग्यवर्धक माहिती देत असतो.

जिरे, ओवा आणि बडीशेप यांच्या मिश्रणात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन्स, फायबर, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम त्यांच्या मिश्रणात आढळतात. याशिवाय त्यात मॅंगनीज, झिंक, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि ई आढळतात. जिरे, ओवा आणि बडीशेप यांचं मिश्रण पचन आणि वजन कमी करण्यास मदत करते. यासोबतच ह्या औषधी मिश्रणाच्या वापराने सर्दी आणि घसादुखीपासून आराम मिळतो.
ह्याचे फायदे आणि उपयोग याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

कमी करा तुमचं कोलेस्ट्रॉल

3 34

जिरे, बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे आयुर्वेदीक मिश्रण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. याशिवाय यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी आहे.

डायबिटीस संतुलित ठेवा

4 34

जिरे, ओवा आणि बडीशेप खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहील. याव्यतिरिक्त, ह्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुध्दा कमी आहे. हे मिश्रण नियमित घ्याल तर सांधेदुखीतही खूप आराम मिळतो.

पोटाच्या समस्यांवर गुणकारी

5 35

बडीशेप, ओवा आणि जिरे हे तीनही पदार्थ पोटाच्या समस्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्याच्या मदतीने ते पचनसंस्था मजबूत करतात. यासोबत ओवा आणि जिऱ्याच्या सेवनाने अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटातील गॅसच्या समस्या दूर होतात. तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा हे मिश्रण घेऊ शकता.

रोग प्रतिकारशक्ती वाढवा

6 34

हिवाळ्यात लोकांना खोकला, सर्दी, घसा खवखवणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता. जिरे, ओवा आणि बडीशेप हे तिन्ही सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी प्रभावी आहेत. यासोबतच जिरे आणि ओव्याचा प्रभाव गरम असतो, जो तुमचा खवखवणारा घसा बरा करण्यासाठी खूप आवश्यक आहे.

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा

7 31

उच्च रक्तदाबामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. ह्यावर बडीशेप आणि जिरे यांचे मिश्रण खूप आरोग्यदायी आहे. ह्या मिश्रणात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. तुमचा बीपी नियंत्रणात राहतो. त्याच वेळी, ते कोलेस्ट्रॉल देखील वाढू देत नाही, कोलेस्ट्रॉल कमी असणं उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी खूप महत्वाचं आहे.

जिरे, ओवा आणि बडीशेप यांचा वापर असा करा.

8 24
  1. जिरे, ओवा आणि बडीशेप भाजून पावडर बनवा. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर ही पावडर चमचाभर खाऊ शकता.
  2. सकाळी रिकाम्या पोटी जिरे, ओवा आणि बडीशेप यांचे पाणी प्या. यामुळे तुम्हाला अपचन आणि गॅसची समस्या होत नाही. हा उत्तम उपाय आहे.
  3. तुम्ही डाळी आणि भाज्यांमध्ये जिरे, ओवा आणि बडीशेप घालू शकता. त्यामुळे प्रोटीन्सचं पचन सहज होतं आणि जेवणाला चवही येते.
  4. तुम्ही माउथ फ्रेशनर म्हणून जिरे, ओवा आणि बडीशेप मिश्रण वापरू शकता.
  5. तुम्ही पाण्यात जिरे, ओवा आणि बडीशेप उकळून पाणी पिऊ शकता.

जिरे, ओवा आणि बडीशेप यांचे मिश्रण खाण्यात काहीही नुकसान नसलं तरी त्याचा संतुलित प्रमाणात वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या होऊ शकते. तसेच, तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories