तुपाने येईल रूप. झोपण्यापूर्वी फक्त 5 थेंब तूप असं वापरा.

जर तुम्हाला तुमचा चेहरा नेहमी चमकदार हवा असेल तर नक्कीच ही रेसिपी रोजच्या अनेक समस्या सोडवू शकते. काही स्त्रियांचा चेहरा खूप सुंदर दिसतो. त्यामुळे इतरही स्त्रिया फक्त आपल्या ड्रेसिंग सेन्सबाबत जागरुक नसून चेहऱ्याची अधिक काळजी घेतात आणि बाजारातून विविध प्रकारची प्रॉडक्ट्स खरेदी करतात. मात्र, आज बाजारात सर्व प्रकारची सौंदर्य उत्पादने आहेत, जी तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. पण काही स्त्रिया अशा आहेत ज्या केमिकल असलेली प्रॉडक्ट्स वापरणे टाळतात कारण ती सतत वापरल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.

अशा वेळी तुम्ही घरी बनवलेलं तूप वापरु शकता. आपल्याकडे असं म्हणतात तूप खाऊन रूप येतं पण तूप लावूनही रूप येतं. हे खरं आहे कारण भारतात चेहर्‍याला तजेलदार बनवण्यासाठी आणि चांगली झोप आणण्यासाठी तूप फायदेशीर मानलं जातं. तुम्ही तूपाचा अनेक प्रकारे वापर करू शकता, परंतु आम्ही तुम्हाला सर्वात सोपा मार्ग सांगत आहोत.

झोपण्यापूर्वी तूप कसं वापरायचं?

तूप वापरण्यासाठी तुम्हाला इतर घटकांची गरज भासणार नाही कारण तूप वृद्धत्व विरोधी आहे. चेहरा तरुण बनवण्यासाठी तुम्हाला फक्त घरगुती तूप वापरायचं आहे आणि ह्या दिलेल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

  • ५ थेंब- तूप ह्यासाठी फक्त तुम्हाला लागेल. तूप फ्रीजमधून बाहेर ठेवा म्हणजे ते चांगलं वितळेल.
  • आता तुमचे दोन्ही हात चांगले धुवून स्वच्छ करा.हात सुकल्यानंतर 5 थेंब तुप घेऊन चेहऱ्याला लावा.
  • तूप लावल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करून झोपी जा.
  • सकाळी चेहरा धुवा. तुमचा चेहरा लाल झालेला दिसेल. चेहऱ्यावर नवी लाली येईल..

चेहऱ्यावर चमक येते

जर तुम्हाला तुमचा चेहरा गुळगुळीत आणि चमकदार बनवायचा असेल तर तुम्हाला एक्सफोलिएशन असलेली उत्पादनं वापरावी लागतील आणि एक्सफोलिएशनमध्ये तूप मुबलक प्रमाणात असतच. जर तुम्ही फक्त चेहऱ्याला तूप लावलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मात्र, तुम्ही इतर नैसर्गिक गोष्टींसोबत तुपाचा मास्क, तूप वापरू शकता.

चेहरा तरूण राहील

तूपाचा नियमित वापर केल्यास चेहरा तरूण राहील. तसच तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकर दिसणार नाहीत.  चेहऱ्यावर तूप न लावता पायालाही लावा.  तुम्ही तुपानेही मसाज करू शकता आणि त्याचा वापर तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

पुरळ आणि मुरूम येणार नाही

जर तुम्हाला पुरळ आणि मुरुम येऊन त्रास होत असेल किंवा तुमची त्वचा कोरडी असेल तर तूप  तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही 1 चमचे तुपात 1 चमचे दही मिसळा आणि नियमितपणे चेहऱ्याला लावा. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डाग हलके होऊ लागतील.

तुमच्या दैनंदिन आहारात तूप खाण्याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्याच्या उपयांमध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. तर तूप खाऊन रूप येतं आणि तूप लावूनसुद्धा रूप येतं हे तुम्हाला पटलं असेल. असे आणखी लेख वाचण्यासाठी कृपया आम्हाला कमेंट करून सांगा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories