केसांमध्ये कोंडा आणि खाज येण्याने त्रस्त असल्यास करा हे घरगुती उपाय…!

कोंडा हे नाव ऐकताच डोक्यात खाज सुटते. अनेक वेळा आपण आपले डोके आणि केस स्वच्छ ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी केसांमध्ये कोंडा हा होतोच. जर ही समस्या गंभीर प्रमाणात असेल तर त्वचारोग तज्ज्ञांना भेटणे अत्यंत आवश्यक आहे. असे असले तरीही काही घरगुती उपायांमुळे ही समस्या दूर होऊ शकते.

केसांशी संबंधित अनेक समस्या आहेत ज्यामध्ये कोंडा ही सर्वात सामान्य समस्या आहे. डोक्यातील कोंडा ही टाळूची एक सामान्य स्थिती आहे ज्यामध्ये टाळूतून कोरड्या पांढऱ्या त्वचेचे लहान लहान तुकडे पडतात.

तुमचे केस काळे असल्‍यास किंवा काळे कपडे घातल्‍यास, तुमच्‍या केसांमध्‍ये किंवा खांद्यावर पांढरे, स्निव्‍फ्लक्‍ससारखे फ्लेक्स दिसू शकतात. टाळूवर खाज येण्याव्यतिरिक्त, कोंडामुळे मुरुम, डोळ्यांची जळजळ इत्यादी इतर अनेक समस्या देखील यामुळे उद्भवू शकतात. या लेखात, आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे केसांमधील कोंडा दूर होण्यासाठी मदत होईल.

लिंबाचा रस :

यामधे तुम्ही एका मोठ्या लिंबाचा रस काढून टाळूवर मसाज करा. हवे असल्यास, खोबरेल तेलाचे काही थेंब देखील त्यात घालू शकता. हे तुम्ही 15-20 मिनिटे आपल्या टाळूवर ठेवा आणि नंतर केस स्वच्छ धुवा. लिंबाच्या रसामध्ये नैसर्गिक एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात जे टाळूतील कोंडा काढून टाकण्यास प्रभावी असतात.

मेथीचे दाणे:

अर्धी वाटी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी ते दाणे फुगले की अतिरिक्त पाणी काढून बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये लिंबाचे काही थेंब टाका आणि तुमच्या टाळूवर लावा. 30-40 मिनिटे राहू द्या आणि नंतर केस चांगले धुवा. मेथीच्या बियांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे कोंड्याशी लढण्यास मदत करतात.

ऍपल सायडर व्हिनेगर:

ऍपल सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि आपल्या टाळूला लावा आणि हलके मालिश करा. 15 मिनिटे राहू द्या, आणि नंतर केस धुवून टाका. हे टाळूचा pH संतुलित करण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करते.

टी ट्री ऑइल:

कधीकधी केसांमध्ये फंगल इन्फेक्शन झाल्याने कोंडा होतो. ती ट्री ऑईल मधे अँटीफंगल गुणधर्म असतात जे यासोबत लढण्यास मदत करतात. ऑलिव्ह ऑइलमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा आणि ते तुमच्या टाळूला लावा. हे मिश्रण साधारण 30 मिनिटे केसांवर असेच राहुद्या आणि त्यांनतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories