केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय : दाट आणि सुंदर केसांसाठी वापरा हे सोप्पे घरगुती उपाय !

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय – सुंदर केस हे पारंपारिक रित्या आपल्या भारतामध्ये सौंदर्याचा एक भाग मानला जातो. महिला व पुरुष दोघांचीही केस चांगले व निरोगी असावे, तसेच केस काळेभोर, घनदाट (Thick Hairs) असावे आसे प्रत्येकाला वाटते. ज्यामुळे त्यांचे चेहऱ्याचे सौंदर्य खुलून उठते. महिलांचे केस लांब सडक असणे तसेच ते निरोगी व चमकदार असणे ही महिलांच्या सौंदर्याची निशाणी मानली जाते.

काळेभोर, चमकदार, लांबसडक, घनदाट व सुंदर केस (Beautiful Hairs) हे कोणत्याही फंक्शनमध्ये कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लांब केस असणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते, याकरता अनेक मुली महिला व पुरुष देखील आपल्या केसांची विशेष काळजी (Hair Care) घेतात.

Beautiful Hairs

बालपणापासून आपल्या केसांची व केसांच्या आतील त्वचेची म्हणजेच टाळु किंवा स्कॅल्पची काळजी आपली आई तेल मालिश करून घेत असते. मात्र जसजसे मुले व मुली मोठे होऊ लागतात, तसतसे आपल्या केसांचा ताबा आपण स्वतःकडे घेतो. ज्यामुळे केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व केसांमध्ये कोंडा होणे, केसांचे दुभंगणे, केस गळती होणे अशा समस्या निर्माण होतात.

कॉलेजमध्ये गेल्यावर मुले व मुली केसांना तेलही लावत नाहीत त्याचे दुष्परिणाम म्हणुन केस रुक्ष, कोरडे पडतात व केस गळतीत भर पडते.

आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला केस घनदाट होण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

प्रत्येकाची केस हे सुरुवातीला घनदाट असतात. मात्र काही काळानंतर केसांचे आरोग्य खालावत जाते व केस पातळ व कमकुवत होऊन तुटून गळू लागतात.

Beautiful Hairs

पूर्वी घनदाट केस असलेल्या स्त्री-पुरुषांचे केस कालांतराने अगदी कमी होतात व काही लोकांना तर टक्कल पडते असे देखील आपण पाहिले असेल. एलोपेशिया म्हणजेच केसांच्या काही भागांमध्ये जागोजागी बाल्ड पॅचेस पडतात. या बाल्ड पॅचेसच्या जागी परत कधीही केस उगवत नाहीत.

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

केस चांगले होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलयुक्त शाम्पू बाजारामध्ये उपलब्ध आहेत. टीव्हीवरील जाहिराती पाहून किंवा मित्र-मैत्रिणींनी रेकमेंड केले म्हणून आपण वेगळे प्रॉडक्ट (Hair Care Products) आपल्या केसांवरती अप्लाय करत असतो. यामुळे केसांचे आरोग्य खालावते व केसांची मुळे ढिल्ली पडतात. नैसर्गिक रित्या केसांना निरोगी ठेवता येते. बाजारात मिळणारे कुठलेही केमिकलयुक्त प्रोडक्ट्स अजिबातच उपयोगी नसतात.

चला तर जाणून घेऊया केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

कोरफडीचा ज्यूस/जेल (Aloe Vera Gel) :

Aloevera Gel

कोरफड (Aloe Vera) ही सौंदर्यवर्धक वनस्पती आहे. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक कोरफड मानला जातो. ताजा कोरफडीचा गर रोज सकाळी उपाशीपोटी सेवन करणे आयुर्वेदात लाभदायक सांगितले आहे. कोरफडीच्या सेवनामुळे आपल्या पोटाच्या समस्या दूर होतात व त्यामुळे केसांचे आरोग्य देखील आतुन सुधारते. बर्‍याचशा स्त्री-पुरुषांना तिखट, चटकदार, मसालेदार व चटपटीत पदार्थ खाण्याची सवय असते. अशांचे केस लवकर खराब होतात.

आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये कोरफडीचा ज्यूस पिऊ शकता. तसेच केसांवर देखील बाह्य उपचार म्हणुन कोरफड वापरू शकता. आठवड्यातून एकदा कोरफडीचे पान तोडून त्यामधील गर व्यवस्थित काढून घ्यावा व त्यानंतर तो मिक्सरला बारीक दळुन घ्यावा. आपल्या धुतलेल्या कोरड्या केसांवर हे जेल व्यवस्थित हेअर मास्कसारखे लावून घ्यावे. अर्धा तास ते एक तास तसेच केसांवर हा मास्क लावून ठेवावे.

त्यानंतर साध्या पाण्याने किंवा हर्बल शाम्पूने (Herbal Shampoo) केस धुऊन टाकावे. हा उपाय सलग दोन ते तीन महिने केल्यास आपले केस मजबुत होतील, नवे केस उगवतील, केस गळणे पूर्णपणे थांबेल. केसांच्या सर्व समस्या बंद होतील. तसेच केस दुभंगणे, फाटे फुटण्याची समस्यादेखील नष्ट होते.

केसांच्या मुळापासून केसांच्या टोकापर्यंत संपुर्ण केसांच्या भागांमध्ये कोरफड जेल लावल्यामुळे केसांना जीवदान मिळते. केस चमकू लागतात व केसांमध्ये भक्कमपना व मजबुती येते. कोरफडीमुळे आपल्या केसांची रंध्रे Activate होतात व नवीन केस उगवण्यासाठी प्रारंभ होतो.

कांद्याचा रस (Onion Oil For Hairs):

Homemade Onion Oil

पारंपारिकरित्या कांद्याचा रस (Onion Oil) किंवा कांद्याच्या रसापासून बनवलेले तेल केस गळतीसाठी व केस घनदाट बनवण्यासाठी वापरले जाते. आपल्या केसांच्या लांबी व घनदाट असण्याच्या क्षमतेनुसार एक किंवा दोन कांदे बारीक कापून मिक्सरला बारीक ग्राईंड करुन घ्यावे व त्याचा रस गाळणीद्वारे काढून घ्यावा. कांद्याचा रस कापसाच्या बोळ्याने आपल्या धुतलेल्या स्वच्छ केसांच्या मुळांशी लावावा. त्यानंतर ५ मिनिटे हाताच्या बोटाने मसाज करावा. एक तास हा रस असाच केसांवर ठेवावा व त्यानंतर साध्या पाण्याने केस धुऊन टाकावे.

केसांच्या मुळाशी कांद्याचा रस लावल्यामुळे केसांना पोषण मिळते व केसांमधील सल्फर देखील वाढते, ज्यामुळे केस भक्कम होतात व केसांची मुळेही मजबूत होतात. कांद्याचा रस लावल्याने अगदी बाल्ड पॅचेस पडलेल्या ठिकाणीदेखील केस उगवतात हे शास्त्रीय दृष्ट्यादेखील सिद्ध झाले आहे.

मेथीचे दाणे (Methi Seeds) :

Methi Seeds

केसांचे आरोग्य चांगले राहण्यास करता मेथीचा वापर करणे अतिशय फायद्याचे असते. दोन चमचे मेथीचे दाणे (Methi Seeds) रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी मेथी दाणे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे व त्यामध्ये दोन चमचे दही, २ चमचे मध, २ चमचे कोरफडीचा गर व थोडेसे खोबरेल तेल मिक्स करून एक चांगला हेअर पॅक बनवावा.

आता हा पॅक केसांना अप्लाय करावा. केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत संपूर्ण भागात हा पॅक व्यवस्थित अप्लाय करावा. यामुळे केस भक्कम होतात व तुटुन पडत नाहीत. मेथीदाणे हे अगदी प्राचीन काळापासून केसांसाठी वापरले जातात यामुळे केसांना वेगळीच चमक येते तसेच केस सिल्की आणि शायनी होतात.

मेहंदी पॅक (Mehndi Pack) :

Heena Mehendi Home

बरेच लोक केसांना रंग लावण्याकरता प्राकृतिक रंग व नैसर्गिक रंग म्हणून मेंदीचा वापर करतात. मात्र मेहंदीमुळे केसांचे आरोग्य देखील चांगले राहते बरेचदा केस गळती वर मेहंदी लावण्याचे लोक टाळतात. मात्र हे चुकीचे आहे मेहंदी मुळे आपल्या केसांचीमुळे भक्कम होतात व केस दाट व मजबूत होण्यास देखील मदत मिळते.

लोखंडी भांड्यामध्ये मेहंदी भिजवताना त्यामध्ये कॉफी पावडर, भृंगराज पावडर, जास्वंदाच्या फुलांची पावडर, आवळा पावडर, अर्धा लिंबू व तेल एकत्र करून चहापत्तीच्या उकळलेला पाण्यामध्ये मेहंदी भिजत ठेवावी. मेहंदी भिजवल्यानंतर सात-आठ तास जाऊ द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी केसांवर आपले केस स्वच्छा धुवुन कोरडे करावे. केसांमध्ये थोडा ओलावा असताना मेहंदी लावण्यास सुरवात करावे. हा हिना पॅक केसांना दोन ते तीन तास लावून ठेवावा व त्यानंतर साध्या पाण्याने केस धुऊन टाकावे व दुसऱ्या दिवशी साध्या शाम्पूने केस धुवावे.

यामुळे केसांचा रंग देखील चांगला होतो व केसांचे आरोग्य सुधारण्यास सोबतच आपल्या केसांखालील त्वचा देखील चांगली व निरोगी राहते. मेहंदी पॅक नियमित वापरल्यास केसांची मुळे भक्कम होतात व केस गळती देखील थांबते. आपण आपल्या केसांमध्ये नक्कीच चांगला सकारात्मक बदल होताना पाहू शकाल. महिन्यातून एकदा मेहंदी पॅक केसांना नक्की लावला पाहिजे, त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.

हॉट ऑईल मसाज (Hot Hair Oil Massage Benefits) :

Hair Oil Massage

आपण ज्या भागात राहतो तिथे आपण केस दाट होण्यासाठी तेल केसांना वापरत असतो जसे उत्तर भारतामध्ये मोहरीचे तेल देखील केसांकरता वापरले जाते. मात्र आपल्या भागामध्ये खोबरेल तेल शक्यतो केसांवर वापरले जाते. कोणतेही तेल केसांकरता वापरायचे असेल तर ते तेल थोडेसे कोमट- गरम करून घ्यावे.

त्यामुळे त्यातील पोषण मूल्य वाढतात व त्याचा फायदा मसाज केल्यानंतर केसांच्या मुळांना होऊन आपल्या केसांचे व टाळू चे आरोग्य चांगले राहते व केस वाढीसाठी देखील त्याचा फायदा होतो. खूप जास्त प्रमाणात तेल चोपडून केसांचे आरोग्य चांगले राहत नाहीत तर त्यामुळे जास्त प्रमाणात गळती होते याकरता योग्य प्रमाणामध्ये दोन ते तीन चमचे तेल फक्त केसांना मालीश करण्याकरता वापरले पाहिजे.

आवळा पॅक (Amla Powder Pack) :

amla powder

आवळा पावडर केसांच्या आरोग्यास चांगले करण्यासाठी वापरली जाते. आयुर्वेदामध्ये आवळा पावडरचा उपाय सांगितला गेला आहे. गरम पाण्यामध्ये आवळा पावडर भिजवून एक ते दोन तासानंतर केसांना लावावे व त्यानंतर अर्धा एक तास तो पॅक केसांवर तसाच ठेवावा व नंतर साध्या पाण्याने केस धुवावेत. बरेच लोक आवळा पावडर व लिंबू यांचे एकत्र मिश्रण करून केसांना त्याचा कलपासारखा लेप लावून केस काळे करण्याचा उपाय देखील सांगतात. मात्र हा उपाय प्रत्येकाला सूट होईल असे नाही.

जास्वंदाचा हेअर पॅक (Jaswand Flower) :

Jaswand Flower

जास्वंदाची फुले ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. जास्वंदाची चार-पाच फुले व पाच-सहा पाने घ्यावीत. त्यामध्ये एक चमचा एरंडेल तेल, दोन चमचे खोबरेल तेल, दोन चमचे एलोवेरा जेल एकत्र करावे व चांगले दळून घ्यावे. मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर हा लेप केसांना लावावा या हेअरपॅकमुळे केस चांगले व निरोगी राहतात. तीस मिनिटे ते एक तास हा पॅक केसांना लावून ठेवावा. त्यानंतर साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने केस धुऊन टाकावा. केस धुण्यासाठी कोणताही शैंम्पू वापरू नये.

कडीपत्ता ऑईल (Curry Leaves Oil):

Curry Leaves

कढीपत्ता देखील आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त मानला गेला आहे. कढीपत्त्याची पाने घेऊन ती तव्यावर चांगली कडक भाजून घ्यावी. त्यासोबतच त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे भाजून घ्यावे व हे दोन्ही मिश्रण (Curry Leaves Oil) मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. कढीपत्ता व मेथी दाण्याची पावडर तयार होईल ही पावडर पाव किलो खोबरेल तेलामध्ये मंद आचेवर अर्धा तासापर्यंत शिजवून घ्यावी.

हळू हळू तेलाचा रंग हिरवा होऊ लागतो त्यानंतर गॅस बंद करावा व हे तेल थंड झाल्यानंतर काचेच्या बाटलीत भरून ठेवावे यातील तेलाने आठवड्यातुन एकदा केसांना मालिश केल्यास केसांचे आरोग्य चांगले राहते. केस गळती थांबते व केस वाढवण्यासाठी देखील फायदा होतो.

हे हि वाचा :

वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता

मखाना इन मराठी

जेष्ठमधाचे फायदे

गुळवेलचे फायदे

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories