थायरॉईड, डायबिटिस आणि हाय ब्लड प्रेशर हे तिन्ही एकत्र आले तर किती धोकादायक आहे? तिघांमधील सहसंबंध जाणून घ्या.

हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम हा थायरॉईड ग्रंथीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे होतो. थायरॉईडमुळे डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशर देखील होण्याची शक्यता असते.

थायरॉईड हा जीवनशैलीचा आजार ज्याला लाईफस्टाईल डीसिज म्हटलं जातं. हा आजार अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी आणि तणावपूर्ण जीवन जगण्यामुळे होतो. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत – हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम.

जेव्हा थायरॉईड अकार्यक्षम असतो, त्याला हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism) म्हणतात. जेव्हा थायरॉईड जास्त काम करतो तेव्हा त्याला हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism) म्हणतात.

थायरॉईड असेल तर

4 50

थायरॉईडमध्ये वजन वाढण्याबरोबर हार्मोन्स देखील विस्कळीत होतात. बहुतेक स्त्रिया थायरॉईडच्या आजाराने त्रस्त आहेत. हा आजार थायरॉईड ग्रंथीच्या वाढीमुळे होतो, ज्याचे आकार फुलपाखरासारखा आहे.

ही ग्रंथी अत्यावश्यक क्रिया नियंत्रित करते. काही लोकांना थायरॉईड, डायबिटिस आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास एकत्र असतो. काही लोकांना थायरॉईड आणि डायबिटीस चा त्रास होतो, तर काही लोकांना एकत्र थायरॉईड आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास असतो.

थायरॉईड असेल तर ही लक्षणे दिसतात

  • सुस्ती
  • थकवा
  • बद्धकोष्ठता
  • त्वचेचा कोरडेपणा
  • स्नायू दुखणे
  • हिवाळ्यात अंग दुखणे
  • ही सर्व थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

थायरॉईड आणि हाय ब्लड प्रेशर एकत्र असेल तर

5 49

हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम दोन्हीमुळे हाय बीपीचा त्रास होऊ शकतो म्हणूनच थायरॉईड चाचणी करणे आवश्यक आहे.

हायपरथायरॉईडीझममध्ये, हृदयाची गती खूप वेगवान होते, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. हायपोथायरॉईडीझममध्ये, हृदयाचे स्नायू कमकुवत होतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो.

डॉक्टर म्हणतात की 3 टक्के लोकांमध्ये थायरॉईडमुळे हाय बीपी 3 टक्के लोकांना झाला आहे. तर फक्त 3 टक्के थायरॉईड रुग्णांना हायपोथायरॉईडीझम आहे. पण 20-30 टक्के लोकांमध्ये थायरॉईड मुळे डायस्टोलिक रक्तदाब म्हणजेच बीपीचा खालचा भाग जास्त होतो.

थायरॉईडच्या उपचाराने हा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो. हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझम असल्यास, योग्य उपचार केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. महत्वाचं म्हणजे जर तुमचे वजन जास्त असेल तर तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.

थायरॉईड आणि डायबिटीस एकत्र असेल तर

6 46

बऱ्याच लोकांना थायरॉईड आणि डायबिटीस एकत्र असतो. ज्या लोकांना थायरॉईड आहे त्यांना डायबिटिस होण्याची शक्यता जास्त असते. तर ज्या लोकांना डायबिटिस आहे त्यांनाच थायरॉईड होण्याचा धोका जास्त असतो.

जर तुम्हाला टाईप 1 डायबिटिस असेल तर लगेच थायरॉईड चाचणी करणे आवश्यक आहे, कारण हे दोन रोग अनेक प्रकरणांमध्ये एकत्र होतात.

भारतीय आणि अमेरिकन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्हाला टाइप 1 डायबिटिस असेल तर तुम्ही सुरवातीला थायरॉईडची तपासणी करून घ्यावी. जरी टाइप 1 डायबिटिसनंतर थायरॉईड परत आला, तरीही आपल्याला दरवर्षी त्याची टेस्ट करणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला टाइप 2 डायबिटिस असेल तर तुम्हाला थायरॉईड होण्याची शक्यता जास्त असते. टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटिस असलेल्या लोकांमध्ये थायरॉईड होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे तुम्ही वेळोवेळी थायरॉईड तपासत राहा.

यासह, जर तुम्हाला आधी थायरॉईड असेल आणि तुम्ही थायरॉईड नियंत्रणात ठेवाल तर डायबिटिस आणि हाय ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहील. थायरॉईड हार्मोन्सच्या कमी कामामुळे रक्तातील साखरेची पातळीही बदलत राहते.

हे महत्वाचं आहे

7 43

हायपरथायरॉईडीझमचा उपचार देखील खूप महत्वाचा आहे, कारण यामुळे डायबिटिस होण्याची शक्यता वाढते.थायरॉईड डायबिटिस आणि ब्लड प्रेशर ह्यांचा घनिष्ट परस्पसंबंध आहे, ज्यामध्ये त्यातल्या त्यात थायरॉईडचा उपचार सर्वात सोपा आहे. म्हणून जर तुम्हाला थायरॉईड आणि डायबिटिस असेल तर आजच तुमची थायरॉईड टेस्ट करा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories