हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर ह्यामध्ये काय फरक आहे? लगेच जाणून घ्या.

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि हृदय बंद पडणे (हार्ट फेल्युअर) दोन्ही परिस्थिती एखादया व्यक्तीसाठी खूप धोकादायक असतात, ह्या दोन्ही परिस्थितींमध्ये ती व्यक्ती मरू शकते. हार्ट अटॅक आणि हार्ट फेल होण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमची चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी. ज्या तुम्हाला ह्या धोकादायक रोगांचे बळी बनवतात आणि दोन्ही रोग हृदयाशी संबंधित आहेत आणि अर्थात ह्रदय बळकट असल्याशिवाय जगणं अशक्य आहे.

पण हार्ट अटॅक आणि हार्ट फेल होणे ह्यामध्ये काय फरक आहे? बऱ्याच लोकांना यामधला फरक कळत नाही आणि लोक फसू शकतात.
म्हणूनच आपण मराठी हेल्थ ब्लॉग च्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि हृदय बंद पडणे (Heart Failure) यामधला फरक बघूया.

हार्ट अटॅक आणि हार्ट फेल होणे ह्यामधला फरक

हार्ट फेल्युअर

बऱ्याच लोकांना माहित आहे की, हृदयविकाराचा झटका अचानक कोणालाही येतो. हृदयविकाराच्या झटक्यात हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा आल्यामुळे म्हणजेच हार्ट ब्लॉकेज झाल्याने अचानक रक्त प्रवाह थांबतो, याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) म्हणतात.

हृदय बंद कसं पडतं म्हणजेच हार्ट फेल कसं होतं तर ह्यामध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. हृदय बंद तेव्हा पडतं जेव्हा आपलं हृदय प्रभावीपणे रक्त पंप करण्यास असमर्थ असतं. ह्या कारणामुळे रक्त संपूर्ण शरीरापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आणि ह्या स्थितीला हृदय बंद पडणे किंवा हार्ट फेल्युअर म्हणतात. यामुळे रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि हृदयाचे ठोके थांबतात.

हृदय बंद पडत असताना ही लक्षणे दिसतील. (Symptoms of Heart Failure)

हार्ट फेल्युअर

ही लक्षणे हृदयरोग असल्याची सूचना देतात जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढतो. पण काही सामान्य गोष्टी समजून घेऊन आणि दररोज काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही हा आजार सहज टाळू शकता.

हार्ट फेल होण्याची लक्षणे

  • खोकला
  • हृदयाचा ठोका कमी जास्त होतो
  • खूप कमी भूक लागते
  • पाय सुजतात
  • जास्त लघवी होते

थोडेसे शारीरिक श्रम केल्यावर तुम्हाला खूप थकवा किंवा दम लागत असेल तर मग ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. बऱ्याचदा काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो, श्वास अडकतो किंवा सामान्य लोकांपेक्षा वेगाने चालायला जमत नाही. नेहमी खोकल्याची तक्रार असते. ही सगळी लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. काही लोक सामान्य सर्दी खोकला आहे, म्हणून दुर्लक्ष करतात.

आता पाहूया हार्ट अटॅकची लक्षणे (Symptoms of Heart Attack)

हार्ट फेल्युअर
  • श्वास घेण्यात अडचण येते.
  • पाय सुजतात
  • छातीत दुखतं
  • जास्त थकवा येतो
  • अशक्तपणा जाणवतो
  • चक्कर येते
  • अस्वस्थ वाटतं

जेव्हा तुमच्या हृदयावर दबाव येतो तेव्हा ही सर्व लक्षणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात ज्यामुळे हृदय शरीराला रक्त पोहोचवू शकत नाही. अशा परिस्थितीत शरीरात ऑक्सिजन आणि पोषक घटकांची कमतरता असते आणि शरीरात हानिकारक घटक वाढू लागतात. ज्यामुळे अशा समस्या उद्भवतात.

तर मग हृदयविकाराचा झटका येऊ नये आणि हृदय बंद पडू नये ह्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

ह्या दोन्ही परिस्थिती कोणत्याही व्यक्तीचा जीव घेऊ शकतात. जर तुम्ही त्यांना टाळू इच्छित असाल तर तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

पौष्टिक अन्न

हार्ट फेल्युअर

तुमचा आहार म्हणजे तुमची जीवनशैली चांगली ठेवते, जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात प्रथिने आणि खनिज असलेलं जेवण घ्याल तेव्हा तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे निरोगी ठेवू शकाल. हृदयविकारात आपला आहार अतिशय संतुलित प्रमाणात ठेवावा लागतो.

व्यायाम

हार्ट फेल्युअर

शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाला खूप महत्त्व आहे, यामुळे तुमचे शरीर पूर्णपणे निरोगी राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासूनही सुरक्षित राहता. जर तुम्ही तुमची जीवनशैली सुधारली तर तुम्ही स्वतःला सहज निरोगी ठेवू शकाल.

धूम्रपान आणि अल्कोहोल

हार्ट फेल्युअर

या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीराचे खूप नुकसान करतात. जर तुम्हाला तुमचे शरीर पूर्णपणे निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवले पाहिजे.

हे लक्षात ठेवा

हार्ट फेल्युअर

हृदयरोगामुळे त्या व्यक्तीच्या मनावरही वाईट परिणाम होतो. तो त्याच्या आजाराबद्दल विचार करत राहतो. अशा स्थितीत त्या व्यक्तिला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागते, त्यांचा थोडाही निष्काळजीपणा त्यांचा जीव घेऊ शकतो.

त्यामुळे हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आणि वर सांगितलेली लक्षणें असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ती लगेच सोडवली जाईल. आणि उपचार सुरू होतील.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories