कोणत्याही प्रकारचे व्यसन सोडवण्यासाठी करा हा घरगुती उपाय, 100% आयुर्वेदिक…

आजकाल वाढत्या ताण-तणावामुळे लहान मुलांपासून ते मोठया माणसांपर्यंत सर्व लोक आपल्याला व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत.मात्र दारू, तंबाखू, अथवा सिगारेट याचे सेवन आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक परिणाम करीत असते. या  मादक पदार्थाच्या सेवनाने आपल्याला कॅन्सर सारखे वेगवेगळ्या भयंकर आजार होण्याची शक्यता असते.

याशिवाय दारू किंवा व्यसनाला आहारी गेलेल्या व्यक्तीची कुटुंब या व्यसनामुळे उध्वस्त होत असतात.सर्वात मोठी समस्या म्हणजे या व्यसनाच्या आहारी सर्वात जास्त आपल्या देशातील तरुण पिढी जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यावर वेळीच हालचाल आणि ठोस पाऊले टाकली पाहिजेत. कारण अगदी शाळेला जाणरा लहान मुलेही तंबाखू आणि बिडी, गुटख्याचे सेवन करीत आहेत.

त्यामुळे देशाचे भवितव्य पाहता,व्यसन हा कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न नसून आत्ता सामाजिक प्रश्न बनला आहे. दारूमुळे अनेक जणांची आयुष्य बरबाद होते.म्हणून व्यसन मुक्ती ही मोठी समस्या असल्यामुळे, आपला देश हा व्यसन मुक्त होणे अत्यंत गरजेचे आहे.

ऑफिस कल्चर कामाचा ताण तसेच कसलेही टेंशन असल्यास, आताची तरुण पिढी  हा तणाव कमी करण्यासाठी व्यसनांच्या अधीन होत आहे. पण यावर काही साधे उपाय केल्यास, आपल्याला व्यसनांपासून मुक्तता मिळण्यास मदत होईल.

उपाय पुढीलप्रमाणे:

यातील पहिला उपाय म्हणजे, एका रिसर्चनुसार असे सांगितले जाते की, जर रोज सफरचंद खाण्याने आरोग्य चांगले राहते, तसेच आपली दारू पिण्याची सवय कमी करण्यासाठी ही या सफरचंडाचा वापर होत असतो. यासाठी हे सफरचंद उकडून त्यामध्ये लिंबाचा रस टाकून दारू पिणाऱ्या व्यक्तीला दिवसातून दोन वेळा दिल्यास, त्याची दारू पिण्याची इच्छा कमी होते.

तसेच दुसरा उपाय म्हणजे जर दारू पिणारा व्यक्तीला रोज ताज्या गाजरचा रस दिल्यास,तर त्याची दारू पिण्याची सवय कमी होण्यास सुरुवात होते.याशिवाय गाजराचा रस पिल्यामुळे आपल्या डोळ्यांना फायदा होतो तसेच पचन तंत्र सुधारण्यास मदत होते.

याशिवाय सर्वात चांगला आणि परिणामकारक उपाय म्हणजे, आपण 7 लिटर पाण्यात 500 GM ओवा 2 दिवस भिजत ठेवून, मग त्यानंतर मंद गॅसवर पाणी २ लिटर पेक्षा कमी राहील एवढया प्रमाणात शिजवून आणि पाणी थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्यावे.मग दारूची तळप लागल्यावर हे पाणी 5 चमचे पिल्यास,दारूची सवय कमी होण्यास मदत होईल.

याशिवाय खजूर बारीक करून,पाण्यात ठेवावे आणि हे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळा  सेवन केल्यास, यामुळे आपली दा रू पिण्याची सवय कमी होईल. त्याचप्रमाणे कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू सवय सुटू शकते.

तसेच रोज सकाळी डोळे झाकून एका नाकपुडी द्वारे श्वास घेऊन, दुसऱ्या नाकपुडी मार्फत सोडावे, हा श्वसनाचा विकार दूर होतात,तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते.

जर तुम्हाला प्रत्येक काम करताना गुटखा आणि सिगारेट पिण्याची सवय असल्या, यासाठी खिशात एक च्युइंगगम ठेवा. जेव्हा सिगारेट किंवा गुटखा खावा वाटेल,तेव्हा च्युइंग गमच खावा.यामुळे आपले व्यसन कमी होण्यास सुरुवात होईल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories