एकटं राहण्यापेक्षा सर्वांसोबत असणं चांगलं. मानसिक आरोग्यासाठी कसं राहावं? समजून घ्या.

तुम्ही एकटे असता तेव्हा अनेक चांगल्या कल्पना सुचतात हे खरं आहे. शांतता आणि विश्रांती मिळण्यासाठी एकांत हवाच. आपलं ध्येय साध्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ असेलही. पण मन अजून बळकट करण्यासाठी कुटुंब आणि समाजाची साथ मिळणे आवश्यक आहे.

एकटं का राहू नये

मित्रांनो, एकीचं बळ ही गोष्ट तुम्ही ऐकली असेलच.  भारतात, बऱ्याच काळापासून असं मानलं जातं की जेव्हा कुटुंब आणि समाज एकत्र येतात तेव्हा मन नकारात्मक भावनांपासून दूर राहतं. एकत्र कुटुंबात लोक निर्धास्त असतात. तर एकटेपणा तुम्हाला मानसिक आजारी बनवू शकतो. मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय गरजेचं आहे तर एकटेपणा आधी सोडणे. चला ह्याविषयी सविस्तर वाचूया.

प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्या जवळच्या लोकांचा पाठिंबा आवश्यक असतो. यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. अनेक संशोधनेही या मुद्द्यावर सहमत आहेत. पण महानगरांमध्ये विभक्त कुटुंबाचा ट्रेंड आहे. धकाधकीच्या जीवनात एकमेकांसाठी वेळ काढण्याइतका वेळही लोकांना मिळत नाही. मग त्यांचं मानसिक आरोग्य कसं सुधारेल?

जगभर एकटेपणा, तणाव आणि आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आत्महत्या प्रकरणे आणि इतर मानसिक समस्यांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना मानसिकदृष्ट्या निरोगी बनवण्याचा प्रयत्न करणे हाच त्यामागचा हेतू आहे.

जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.

मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या वाढत आहेत कारण लोक एकमेकांशी जुळवून घेत नाहीत. घर-ऑफिसच्या कामातून जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा नातेवाईक, ओळखीच्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा. सुटीत घर साफ करण्याऐवजी लोकांना भेटा. जेव्हा तुम्ही लोकांना भेटता तेव्हा तुमच्या अनेक समस्या संभाषणातून सुटतील. लोकांशी बोलताना टीव्ही-मोबाइल बंद ठेवा. दूरवर राहणाऱ्या लोकांशी बोलण्यासाठी तुम्ही व्हॉट्सॲप, इतर गोष्टी वापरा.

अक्टीव्ह व्हा

मित्रांनो, जेव्हा तुम्ही कामात खूप व्यस्त असता तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होत नाही. सक्रिय राहिल्याने केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारतं. जे लोक आयुष्यभर ॲक्टीव्ह राहिले त्यांना अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी होता. तुम्ही पोहणे, सायकलिंग, नृत्य यासारख्या मजेदार ॲक्टीवीटी करु शकता.

नवीन कामे आणि आवडीची कौशल्ये शिका

तुमच्या आवडीचं काम शिकण्यासाठी वेळ काढा.  जे तुम्हाला व्यस्ततेमुळे शिकता आलं नाही. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार नवीन कौशल्ये आणि नवीन कार्ये शिकल्याने मानसिक आरोग्य सुधारतं. नवीन कौशल्ये आणि नवीन काम शिकत राहा, मानसिक आरोग्य सुधारेल.

समाजाला मदत करा

भारतातील ही जुनी परंपरा आहे की लोक मोठे झाल्यावर दान आणि दानधर्मात अधिक गुंतून जातात. लोकांना मदत केल्याने मन मजबूत व्हावं हे त्यामागचं तत्वज्ञान असावं. गरज असेल तेव्हा मदत केल्याने इतरांसाठी तर चांगलच असतं, पण तुमच्या मनालाही चांगलं वाटतं.

वर्तमानात जगा

  • उद्याची चिंता करण्यापेक्षा आजच्या वेळेचा आनंद घ्या. उद्या काय होईल याचा जास्त विचार करू नका.
  • तुम्ही ज्या क्षणात जगत आहात त्याचा आनंद घ्या.
  • याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणे जीवन जाणीवपूर्वक जगा. याला माइंडफुलनेस असंही म्हणता येईल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories