अँड्रोजेनिक एलोपेशिया : पुरुषांमध्ये केस गळती व टक्कल होण्याचे मुख्य कारण ! पाहा उपाय !

काळेभोर, घनदाट व सुंदर केस हे प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व खुलवत असतात. स्त्री असो अथवा पुरुष सुंदर केस प्रत्येकालाच आकर्षित करतात. मात्र केस गळती ही स्त्रियांबरोबरच पुरुषांना देखील भेडसावणारी मोठी समस्या मानली जाते. एलोपेशिया म्हणजेच केसांमध्ये चाई पडणे किंवा ठराविक भागावर टक्कल (bladness) पडणे तिथले केस पूर्णपणे निघून जाणे (male pattern balding) ही समस्या आजकाल मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आपल्याला पाहतांना मिळत आहे.

केस विरळ होणे किंवा टक्कल पडणे (balding men) हे आपल्या सौंदर्याला बाधा लागल्यासारखे आहे. सुंदर, चमकदार , काळेभोर, घनदाट, मजबूत केस हे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. वाढते प्रदूषण, खाण्या- पिण्याच्या चुकीच्या सवयी, केसांची योग्य निगा व्यवस्थित न ठेवल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण आजकाल वाढत चालले आहे. आपल्या दैनंदिन आहारातून देखील केसांना योग्य पोषण मिळत असते. मात्र चांगल्या प्रकारे आहार न घेतल्याने त्यातुन आवश्यक पोषण प्राप्त न झाल्यामुळे केस गळती देखील वाढू लागते.

केस गळती

रोज केस विंचरताना काही केस तुटणे किंवा गळणे हे सामान्य मानले जाते. मात्र दिवसाला आपल्या डोक्यातील केस विंचरताना 100 पेक्षा जास्त केस जर तुटून किंवा गळून पडत असतील तर हे अतिशय गंभीर आजाराचे लक्षण आहे. अँड्रोजेनिक एलोपेशिया या नावाची ही मुख्यत्वे पुरुषांमध्ये पाहिली जाणारी समस्या आहे. ज्यामध्ये टकलेपणा वाढू लागतो.

स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये (men hair loss) जास्त प्रमाणामध्ये ही समस्या पाहायला मिळते. जर आपल्याला देखील मोठ्या प्रमाणात केस गळती होत असेल तर आपण चांगल्या ट्रायकोलॉजिस्टकडे म्हणजेच केसांच्या तक्रारी तपासणार्‍या डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेतला पाहिजे. तसेच केसांचे आरोग्य चांगले ठेवणाऱ्या आहारातील पदार्थांचा आपल्या रोजच्या दिनचर्येत समावेश केला पाहिजे. (how to grow back hair from male pattern baldness).

केसांच्या आरोग्यासाठी चांगला डायट प्लॅन बनवला पाहिजे. आम्ही या लेखाद्वारे आपल्याला अशा काही पाच खाद्य पदार्थांची माहिती (hair loss treatment for men)सांगणार आहोत ज्यामुळे अँड्रोजेनिक एलोपेशियाला नियंत्रणात ठेवता येते व केस गळणे व एलोपेशिया म्हणजेच टक्कल पडणे देखील कमी होते.

केस गळती

पुरुषांमध्ये केस गळती किंवा टक्कल पडण्याची समस्या थांबवणारे खाद्यपदार्थ :

आपले शरीर निरोगी रहावे याकरता आपण सकस व पोषक आहार घेतला पाहिजे, कारण आपण जे खातो त्यावरच आपल्या शरीराची बॉडी बिल्डिंग बनत असते व उभी राहते. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते महत्त्वाचे पदार्थ

  • अंडी:
केस गळती

अंडी हा प्रोटीन आणि बायोटीन चा एक विस्तृत स्रोत मानला जातो. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असते ज्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहते. अंड्यांमध्ये आढळणारे प्रोटीन हे केसांसाठी अतिशय आवश्यक असून ते केसांच्या मुळांना मजबूत करतात व केस गळती थांबण्यासाठी मदत करतात. तसेच बायोटिन देखील अंड्यामधून मिळते. अंड्यामधील हे बायोटीन केसांसाठी आवश्यक असलेल्या कॅरोटिनची निर्मिती करते. त्यामुळे केसांची वाढ होते. केस मजबूत राहण्यासाठी सलून व पार्लरमध्ये कॅरोटिन ट्रीटमेंट दिली जाते. मात्र आपण जर आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश केला तर आपल्याला शरीराच्या आतून कॅरोटीन निर्मिती करण्यासाठी मदत होते. त्याकरता रोज एक किंवा दोन अंडी खाल्ली पाहिजे.

  • सॅल्मन फिश :
6 3

सॅल्मन फिश हा चरबीयुक्त माशाचा प्रकार आहे. प्रोटीन, व्हिटॅमिन डी सोबतच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणामध्ये सॅल्मन फिशमध्ये आढळते. सर्व प्रकारच्या केसांच्या आरोग्यासाठी पोषक तत्व हे सॅल्मन फिश मधून मिळते. सॅल्मन फिश खाल्ल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते तसेच केसांची वाढ व विकास चांगली होते. जर आपण शाकाहारी असाल तर हे पदार्थ आपल्याला इतर गोष्टीतून शोधावे लागतील.

  • गाजर :
7 2

गाजर हे विटामिन ‘अ’ युक्त आहे, ज्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली राहते व आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील सुधारते, एवढेच नव्हे तर गाजर खाल्ल्यामुळे केसांचे आरोग्य देखील चांगले राहते. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते जे केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. केसांची मुळे मजबूत करून केस गळती थांबवता येते. गाजरामध्ये विटामीन अ, विटामीन क, विटामीन ई, विटामीन बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम ,फॉस्फरस आणि फायबर देखील मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीरांमध्ये आतून मजबुती येते व याचा परिणाम आपल्या केसांचे आरोग्य सुधारण्यावर देखील होतो.

  • पालक :
8 1

हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात हे आपल्याला माहीतच आहे. मात्र हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या केसांचे आरोग्य देखील सुधारते. पालक हे आपल्या आरोग्यासाठी सुपरफुड म्हणून मानले गेले आहे कारण पालकामधील पोषणमूल्ये होय! पालकात विटामिन बी ,विटामिन सी ,विटामिन ए, कॅल्शियम, पोटॅशियम ,मॅग्नेशियम आणि आयर्न मोठ्या प्रमाणात आढळते. आपण पालक सलाडच्या स्वरूपात किंवा सूपच्या पद्धतीने खाऊ शकतात किंवा पालक पनीर सारखे चांगले व्यंजन बनवून आपण आपल्या आहारात पालकाचा समावेश करू शकता.

  • सुके मेवे आणि बिया :
9

आपण केसांच्या समस्येने त्रस्त झाला असाल तर आपल्याला हे माहीत असायला हवे आपल्या आहारामध्ये सुकामेवा किंवा बिया खाल्ल्यामुळे देखील अँड्रोजेनिक एलोपेशियापासून आपण मुक्ती मिळवू शकता. सुके मेवे जसे बदाम, काजू ,मनुके, अक्रोड, पिस्ते तसेच बियांमध्ये सूर्यफुलाच्या बिया, अळशीच्या बिया, तीळ, टरबुजाच्या बिया, खरबुजाच्या बिया देखील आवश्यक पोषण तत्व आपल्या केसांसाठी पुरवतात.

या बिया आपल्या नित्य आहारात घेतल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते व एलोपेशिया या समस्येपासून संरक्षण होवुन एलोपेशियामध्ये आपल्याला चांगले परिणाम लवकर पाहायला मिळतात. या फळांच्या बियांमध्ये ओमेगा 6 ,ओमेगा 3 हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. आपणही या समस्येला सामोरे जात असाल तर हे पाच सुपरफुड्स खावे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories