तुम्हाला गॅस आणि इतर पोटाची समस्या आहे का ? तर मग जेवणानंतर हे प्या !

आजकाल दिवसेंदिवस पोटाची समस्या मध्ये वाढ होताना दिसत आहे. पोटाचे विकार होण्यामागची कारणे विविध असू शकतात. आपली बदलेली जीवनशैली, वाढते प्रदूषण, खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यसन, घाण, अस्वच्छता, कमी झोप आणि मानसिक अस्वास्थ यामुळे तुमच्या पोटाचे स्वास्थ बिघडण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच शांत झोप येण्याचे उपाय वेळीच करा.

या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या पचनक्रियेवर जलद गतीने परिणाम होऊ लागतो. पचनक्रिया बिघडल्यास विविध आजारपणं पाठी लागतात. म्हणून नेहमी पोट नैसर्गिक रीतीने व्यवस्थित करायला पाहिजे. आजच्या या धावपळीच्या युगात आणि हायब्रीड पदार्थांचे सेवन अनियमित जेवण आणि आपण सतत काम करण्यामध्ये आणि पैसे कमावण्यामध्ये व्यस्त आहे. आणि यामुळेच आपण आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष्य देऊ शकत नाही. यामुळे आपल्याया बरेच छोटे-मोठे आजार होतात.

पोटाची समस्या

आजार छोटा आहे तोपर्यंतच जर त्यावरती योग्य उपचार नाही केला तर तो आजार भविष्यात गंभीर होते आणि मग आपल्याला आर्थिक आणि मानसिक हानी होते. त्यामुळे आजाराला अगोदर बरे करणे हेच योग्य आहे. म्हणजेच कि पैश्यांसाठी आरोग्यावरती दुर्लक्ष्य करायचे आणि तोच कमावलेला पैसे नंतर मोठे आजार बरे करण्यासाठी वापरायचा. त्यासाठी अगोदरच आपल्या आरोग्याची काळजी घेणे हेच कधीही चांगले.

गॅस तसेच पोटाची समस्या :

पोटाची समस्या

तुम्हाला माहित आहे का ? सर्व आजारांचे मूळ कारण हे पोटापासूनच सुरु होते. जर आपणास पोटाचे कोणतेही विकार असतील तर ताबडतोब लक्ष्य देऊन योग्य तो उपचार करणे गरजेचे असते नाहीतर तेच पोटाचे विकार कॅन्सर, किडनी खराब होणे किंवा हृदय विकार सारख्या मोठ्या आजारामध्ये बदलू शकतात. आणि त्यानंतर उपचार करणे जास्तच खर्चिक असते आणि आजार बरे होण्याची हमी सुद्धा कमी असते.

आज आम्ही तुम्हाला अशा एका घरगुती उपचाराबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्याचा उपयोग करून तुम्ही गॅस, अपचन, पोटदुखी आणि पोट साफ न होणे यांसारख्या समस्यांवर त्वरित आराम मिळवू शकता तेही अगदी मोफत.

आम्ही जे पेय तुम्हाला सांगणार आहोत ते बनवण्यासाठी स्वयंपाक घरातील काही मोजक्या गोष्टी लागतात आणि प्रेत्येक घरामध्ये या गोष्टी असतातच. चला तर मग आणखी वेळ वाया न घालवता आपल्या महत्वाच्या विषयाला सुरुवात करूया ! पोटाचे सर्व आजार हे अपचनामुळे होत असतात. तर मग जाणून घेऊया अपचन का आणि कसे होते व त्यावरील उपाय पुढे !

अपचन म्हणजे काय ?

पोटाची समस्या

खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट न झाल्यामुळे तुम्हाला जो त्रास होते त्यास अपचन म्हणतात. यामुळे पोट फुगते आणि पोटाच्या खालच्या भागातून दुखण्यास सुरुवात होते. जर का अन्नाचे पचन नीट झाले नाही तर ते आतड्यांमधून पुढे सरकण्यास त्रासदायक ठरते.

त्यामुळे आतड्यांमध्ये हवा पकडली जाते आणि पोट हवेमुळे फुगते. या प्रक्रियेत हवा आल्यामुळे पोटात अडकले अन्न कुजू लागते. आणि कुजलेल्या अन्नामुळे पोटात गॅस किवा हवा निर्माण होतो. ज्यामुळे पोटात दुखू लागते. यासाठीच पोट फुगीचे उपाय करणं गरजेचं आहे.

पोटाची समस्या

अपचनाची लक्षणे :

  • पोट फुगणे
  • पोटात गॅस होणे
  • पोटदुखी
  • मलावरोध

अपचन कारणे

  • चुकीची जीववशैली
  • अयोग्य आहार
  • अवेळी जेवणे
  • अती खाणे
  • रात्री उशीरा जेवण
  • रात्रीची अपुरी झोप
  • वेदनाशामक औषधे

अपचन घरगुती उपाय

पोटाची समस्या
  • एक चमचा ओवा तव्यावर भाजून तो चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. आणि सकाळी पोट पटकन साफ होईल.
  • आल्याच्या रसामध्ये सैंधव मीठ म्हणजेच दगडी मीठ आणि हिंग टाकून ते दहा ते पंधरा मिनिटे चाटत राहावे.
  • आल्याचे बारके तुकडे करा त्यावर मीठ टाकून ते पूर्ण चावून खावे. आल हे थोड तिखट असते पण तेच ते आपल्या योग्य पचनास फायदेशीर ठरते. आल्याच्यातुमच्या पोटातील गॅस बाहेर पडतो आणि पोटदुखी कमी होते. आणि तुम्हाला पोट हलक झाल्याचे जाणवते.
  • जेवण करण्याअगोदर एक चमचा जिरे, सुंठ आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून प्या.सुंठ आणि जिऱ्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल.
  • पाण्यात हिंग टाकून ते पाणी प्या आणि तेच थोडेसे पोटावर लावा. हिंगाच्या येणाऱ्या वासामुळे न पचन झाल्यामुळे होणारा त्रास कमी होईल. त्यामुळे गॅस कमी झाल्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
  • दररोज सकाळी एक पिकलेले केळे खावे.
  • आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. या सर्व गोष्टींचे तुम्ही जर योग्य पद्धतीने पालन केले तर तुम्हाला पोटाच्या आजारापासून कायमची सुटका मिळेल आणि तुमचे आरोग्य एकदम चांगले राहण्यास मदत मिळेल.

गुणकारी ओव्याचे जाणून घ्या हे फायदे

पोटाचे आजार टाळण्यासाठी हे करू नये

पोटाची समस्या

सर्व काही पोटमुळेच होत असत जर तुमचे पोटच स्वच्छ नसेल तर तुम्हाला बरेच आजार होऊ शकतात. पोट साफ ठेवण्यासाठी आतड्यांची क्रिया निटनिटकेपणे गरजेचे असते. आयुर्वेदात आणि पुराणामध्ये पोटाच्या विकारांवर बरेच उपाय सांगितले आहेत. तुम्ही जर हे उपचार केले तर तुम्हाला पोटाचे कोणतेच आजार होणार नाहीत. तरी पण तुम्हाला काही सवयी आजपासून बदलल्या पाहिजेत.पोटाचे आजार दुर करण्यासाठी अवेळी जेवण किंवा नाष्टा करू नये.

संध्याकाळचे जेवण झोपण्यापूर्वी कमीत कमी तीनतास आगोदर करावे. शिळे, मैद्याचे अथवा तेलाचे पदार्थ खाऊ नयेत. आणि महत्वाचे म्हणजे जेवण करण्या अगोदर चहा आणि कॉफी किंवा जेवण झाल्यानंतर घेऊ नये यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होत नाही. योग्य झोप नाही तरीसुद्धा पोटाचे विकार होतात. प्रत्येक वेळी नेहमी एका ठरवलेल्या वेळीच जेवण केले पाहिजे.

पोटाची समस्या

जास्त भुक लागल्यावरच जेवण करावे. तुम्हाला जर भुक लागली नसेल तर उगीच काही खाऊ नये किंवा जेवण करू नका. जेवण करण्या अगोदर किंवा जेवण केल्यानंतर जास्त पाणी पिऊ नये जास्त पाणी पिणे अपचनास सहकार्य करते. आणि जेवणानंतर लगेच झोपू नये. थोडा वेळ चालावे म्हणजे जेवण व्यवस्थित पचन होते.

मानवी पचन तंत्र

काढा (पेय) बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

  • जिरे
  • वेलची
  • लिंबू रस
  • १ ग्लास पाणी
  • पातेलं इ.

असा तयार करा काढा

एक पातेलं घ्या, त्यामध्ये एक ग्लास पाणी घ्या, एक चमचा जिरे टाका त्यानंतर २ वेलची चांगल्या प्रकारे फोडून त्यामध्ये टाका. हे सर्व मिश्रण गॅसवरती ठेवा आणि १० ते १५ मिनिटे चांगल्या प्रकारे उकळवून घ्या. नंतर गॅस बंद करून तो काढा एका ग्लासमध्ये गाळून घ्या. अशा प्रकारे आपला काढा तयार झालेला आहे. त्यानंतर त्या काढ्यामध्ये १ चमचा लिंबू रस टाका आणि चमच्याने योग्य मिसळून घ्या. आणि हा काढा पिण्यासाठी तयार झाला आह.

काढा कधी प्यावा?

पोटाची समस्या

रोज रात्री जेवणानंतर हा काढा पिणे योग्य असते कारण रात्रभर हा काढा पोटामध्ये जाऊन पोटातील हानिकारक जंतूंना मारून अडकतो आणि पोट स्वच्छ करण्याचे काम करतो.
(टीप): काढा दिवसा कधीही घेऊ नये याचे परिणाम दिवसा दिसत नाहीत.

हा काढा पूर्णपणे एक घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार असल्याने याचे शरीरावरती कोणतेच दुष्परिणाम होत नाहीत. जुन्या आयुर्वेदिक पुराण कथांमध्ये या काढ्याचा उल्लेख केला आहे. आणि आपण जर हा काढा रोज रात्री पिला तर गॅस, अपचन, पोट साफ न होणे आणि आपले पोटाचे सर्व विकार कायमचे नष्ट होतील आणि आपणास एक चांगले आरोग्य भेटेल.

अशा प्रकारे तुम्ही घरगुती पद्धतीने अगदी सहज आणि कोणत्याही इतर खर्च न करता तेही एकदम नैसर्गिक रित्या या पोटाच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवू शकता. आणि आयुष्यभरासाठी पोटाचे आजार तुमच्या पासून दूर राहतील.

तुम्ही स्वतः अगोदर हे उपाय करून बघा आणि जर तुम्हाला याचा चांगला परिणम दिसला कीव तुमच्या समस्या दूर झाल्या तर ही पोस्ट तुमच्या मित्रांना आणि नातेवाइकांना पण शेयर करा त्यामुळे त्यांनाही याचा फायदा होईल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories