लचक, चमक, शिर गुंतणे ह्यावर घरगुती उपाय करा.  जुने आणि खात्रीशीर आराम देतात.

मित्रांनो, कधीकधी दुखापत झाली की लचक किंवा चमक भरते ह्यालाच नसांवर आलेला ताण म्हणतात. शिरा किंवा आपल्या नसा का ताणल्या जातात? नसा दुखतात. त्या हलक्या कशा करायच्या हे समजून घ्या.

नसा दुखत असतील आणि नसांवर ताण येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे कधीकधी खूप वेदनादायक असू शकतं. नसांचा ताण अनेक कारणांमुळे येऊ शकतो. अनेक वेळा खेळादरम्यान दुखापत झाल्यामुळे किंवा नसांवर जास्त दबाव आल्याने खूप वेदना होतात. ह्यालाच शिर गुंतणे असंही म्हणतात. 

लोक ह्याकडे नॉर्मल आहे म्हणून दुर्लक्ष करतात. पण प्रत्येक वेळी नसामध्ये आलेला ताण आणि वेदनांकडे दुर्लक्ष करू नये. नसाचा ताण आणि वेदनांमागे अनेक कारणे जबाबदार असू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये, शरीरात विशिष्ट जीवनसत्त्वे किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, नसाचा ताण येऊन दुखायला सुरू होते. नसांच्या ताणाची कारणे आणि हा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपाय ह्या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.

नसां ताणल्यामुळे काय होतं?

नसा वेदना आणि ताण ही समस्या अनेक कारणांमुळे असू शकते. काही लोकांमध्ये ही समस्या रक्ताभिसरण नीट न होण्यामुळेही होते. याशिवाय इतरही अनेक कारणे नसांमध्ये वेदना आणि ताण ही कारणीभूत मानली जातात. नसांवर ताण येण्याचं कारण तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि बी 12 ची कमतरता हे असू शकतं. याशिवाय सायटिका, कॅन्सर, स्ट्रोक अशा अनेक समस्यांमुळे नसा दुखणे आणि नसांवर ताण येणे अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं.

नसांवर ताण येण्याची किंवा शिर गुंतण्याची काही कारणं ही आहेत

  • शरीराला योग्य रक्तपुरवठा होत नसणे
  • खेळ किंवा दुखापतीमुळे
  • शिरांमध्ये अडथळा झाल्यामुळे
  • शरीरात व्हिटॅमिन बी 12 आणि बी कॉम्प्लेक्सची कमतरता
  • स्ट्रोक किंवा हृदयाच्या समस्येमुळे
  • नसांना योग्य रक्तपुरवठा होत नसल्यामुळे
  • मल्टीपल स्क्लेरोसिसच्या समस्येमुळे
  • रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे
  • जास्त ड्रिंक केल्यामुळे

नसांचा ताण किंवा शिर गुंतणे ह्यावर काय उपाय?

दुखापतीमुळे अनेक लोकांमध्ये शिर गुंतण्याने हा त्रास होत असटी.  अशा वेळी नसा आणि स्नायूंना सूज असू शकते. अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णाला शांत करून आवश्यक उपचार घ्यावेत.

याशिवाय शिरांमध्ये ताण येण्याची कारणं वेगवेगळी आहेत. ह्या कारणांनुसार डॉक्टरही रुग्णांवर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करतात. नसांमध्ये ताण येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता.

नसांमध्ये ताण येण्याच्या किंवा शिर गुंतण्याच्या त्रासामध्ये हळदीचा वापर खूप फायदेशीर आहे. जेवणात हळद वापरावी आणि त्याशिवाय हळद तेलात गरम करून दुखणाऱ्या भागावर बांधावी.

नसांना आलेला ताण आणि वेदनांपासून मुक्त होण्यासाठी निलगिरीच्या तेलाचा वापर खूप फायदेशीर आहे. निलगिरी तेलाने मसाज केल्याने होणाऱ्या वेदना आणि ताणापासून आराम मिळतो. याशिवाय आलं आणि लॅव्हेंडर तेल मिसळून दुखणाऱ्या भागावर मसाज केल्याने वेदना आणि सूज यापासून आराम मिळतो.

काही लोकांमध्ये व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही शिरांना सूज येते. म्हणून, ताण आणि वेदनापासून मुक्त होण्यासाठी आहारात व्हिटॅमिन बी 12 समृद्ध पदार्थांचा समावेश करावा. याशिवाय शिर गुंतली असेल आणि हा त्रास दीर्घकाळ राहिला तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories