छातीत दुखतंय! हार्टचा त्रास नाही तर गॅसमुळे दुखत असेल. जाणून घ्या नेमकी लक्षणं आणि उपाय.

खूप अस्वस्थ वाटतंय? काय खावं तर त्रास वाढतोय. पोटात आणि छातीत गॅस किंवा आम्लपित्त झालंय? छातीत होणाऱ्या गॅसची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या. आजकालच्या अस्वस्थ खाण्याच्या सवयी आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे पोट आणि छातीत गॅस तयार होणे सामान्य झाले आहे. गॅसमुळे अनेक वेळा पोटात आणि छातीत दुखते. आज आपण छातीत गॅस झाला तर दिसणाऱ्या लक्षणांबद्दल पाहणार आहोत.

कारण जेव्हा गॅस शरीरातून बाहेर पडू शकत नाही, तेव्हा पोटात किंवा शरीराच्या इतर भागात वेदना सुरू होतात. ही वेदना छातीपर्यंतही पोहोचते, त्यामुळे छातीत वेदना जाणवते. जडपणा आणि अस्वस्थता जाणवते. एवढच नाही तर छातीत गॅस झाल्यामुळे जळजळ होते.

छातीतील गॅसची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या.

छाती गॅस होण्याची लक्षणे : तुमच्या छातीत दुखत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम आहे. कधीकधी गॅसमुळेही छातीत दुखते.

1. भूक न लागणे

छातीत गॅस तयार झाल्यावर वेदना जाणवते, त्यासोबत भूक न लागण्याची भावना देखील असू शकते. गॅस तयार झाल्यामुळे काही खावेसे वाटत नाही, त्यामुळे भूक कमी होऊ लागते.

2. आंबट ढेकर येणे

वारंवार आंबट ढेकर येणे हे देखील गॅसचे लक्षण आहे. छातीत गॅस तयार झाल्यामुळे, लोकांना अनेकदा आंबट ढेकर येण्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणजेच छातीत गॅस तयार झाल्यामुळे आंबट ढेकरही येऊ शकतात.

3. पोट फुगल्यासारखे वाटणे

जेव्हा आपल्या शरीरात गॅस तयार होतो तेव्हा आपल्याला पोट फुगल्यासारखे वाटू शकते. अशा स्थितीत पोट फुगीच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करता कामा नये.

4. मळमळ आणि उलट्या

कधीकधी छातीत वायू तयार झाल्यामुळे लोकांना मळमळ आणि उलट्या झाल्यासारखे वाटते. गॅस तयार झाल्यामुळे मळमळ सुरू होते. यादरम्यान अस्वस्थताही जाणवू लागते.

5. चक्कर येणे

काही लोकांना वायू तयार झाल्यामुळे अशक्तपणा, चक्कर आल्यासारखे वाटू शकते. पण डिहायड्रेशन आणि लो बीपीमुळेही चक्कर येऊ शकते.

6. गॅस ने छातीत दुखणे

शरीराच्या ज्या भागात गॅस तयार होतो त्या भागात वेदना होणे नॉर्मल आहे. छातीत वायू तयार झाला की छातीत वेदनाही होतात. खाल्ल्यानंतर छातीत दुखणे हे गॅसचे लक्षण आहे.

7. श्वास घेण्यातही त्रास होतो

श्वास घेण्यास त्रास होणे हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण आहे. पण फक्त गॅसमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. शरीरात गॅस अधिक पसरला की वेदना वाढतात आणि श्वास घ्यायला त्रास होतो.

छातीत गॅस होण्याचं कारण

छातीतला वायू पोटाशी संबंधित परिस्थितींमुळे होऊ शकतो जसे की रिफ्लक्स रोग, हायपर ॲसिडिटी, जठराची सूज किंवा अंतर्निहित पेप्टिक अल्सर रोग. इतकेच नाही तर तणाव, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा आणि निद्रानाश यामुळेही छातीत गॅस होतो.

छातीत गॅस झाल्यास उपाय

जर तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच, उलट्या किंवा चक्कर येणे यासारख्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. गॅसच्यास उपचारासाठी आपण गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टला भेट द्यावी. 

गॅस होऊ नये ह्यासाठी उपाय

  • बाहेरचे खाणे टाळा.
  • मसालेदार आणि तेलकट अन्न टाळा.
  • वेळेवर अन्न खा. अन्न चांगलं चावून खा.
  • वेळेवर झोपा आणि जागे व्हा. दिवसातून 7-8 तास झोप घ्या.
  • जेवणानंतर 45 मिनिटांनी पाणी प्या.
  • अन्न खाल्ल्यानंतर चालत जा.
  • नियमित व्यायाम, योगा आणि जॉगिंग करा.

तुमच्याही छातीत दुखत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. कारण छातीत तयार होणारा वायू काही वेळा गंभीर असू शकतो.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories