हाडांतून कट कट असा आवाज येत असेल सावध व्हा. हे पदार्थ तुम्ही खाताय ना?

वाढत्या वयाबरोबर हाडं कमकुवत होतातच, पण त्यामध्ये स्नेहकांची म्हणजेच वंगणाची कमतरताही जाणवते. आणि हाडातून कट कट असे आवाज येतात.म्हणूनच हाडांमधील स्नेहन वाढवू शकणार्‍या पदार्थांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवं.

बदलत्या ऋतूंसोबत अनेकदा सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. उठताना आणि हालचाल करताना हात-पाय आवाज करतात. सांधेदुखी आणि सांधे कडक झाले की समुजन हे सूचित करते की तुमच्या हाडांमध्ये वंगणाची कमतरता आहे आणि ते कमकुवत होत आहेत. जेव्हा तुमच्या सांध्यामध्ये स्नेहन कमी होते, तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणूनच हाडांमध्ये स्नेहन वाढवणाऱ्या पदार्थांबद्दल जाणून घेणं महत्त्वाच आहे.

शरीरात वंगण का आवश्यक आहे?

सोप्या शब्दात सांगायचं तर, वंगण हे एक द्रव्य आहे जे संयुक्त वंगण घालते आणि आपली हाडं एकत्र घासत नाहीत.  हाडांच्या सांध्यामध्ये आढळणाऱ्या या द्रवाला सायनोव्हियम आणि संस्कृत मध्ये उपास्थि असही म्हणतात.

कॅल्शियम देखील आपल्या हाडांचं आरोग्य चागलं ठेवतंन. आजच्या काळात खराब जीवनशैली, जास्त वेळ बसणे किंवा उभे राहणे, जंक फूड अतिसेवन यामुळे अनेक आजार होतात. या कारणांमुळेही सांधेदुखीचा त्रास होतो. पूर्वीच्या काळी वयोवृद्ध लोकांमध्ये अशा तक्रारी नोंदवल्या जात होत्या, पण आजच्या काळात तरुण पिढीलाही याचा त्रास होतो. चला तर मग जाणून घेऊया आपल्या आहारात काही भाज्यांचा समावेश करून ह्या सगळ्या त्रासापासून कसा आराम मिळेल.

कॅल्शियम डाळीमध्ये भरपूर आहे

सांधे, हाडं दुखत असतील तर डाळी शिजवून रोज खायला हव्यात. डाळीमध्ये आवश्यक खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. जी निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाची आहेत. डाळीमध्ये असणाऱ्या फ्लेव्होनॉइड्समध्ये अँटी इन्फ्लमेशनरी आणि अँटीऑक्सिडंट-सदृश गुणधर्म असतात. जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात. त्यात कॅल्शियम देखील असते, जे हाडे मजबूत करते. याशिवाय डाळीत असलेले व्हिटॅमिन ए, के आणि सिलिकॉन देखील हाडांसाठी फायदेशीर आहेत. 

लाल शिमला मिरची

लाल शिमला मिरची ही जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे. कॅप्सिकममध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि व्हिटॅमिन के असतं. यामध्ये असणारं व्हिटॅमिन ए त्वचा, हाडे आणि दात निरोगी ठेवते. शिमला मिरचीमध्ये असणारं व्हिटॅमिन के हाडांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

हे सांध्यामध्ये लवचिकता आणि ताकद आणण्याचं काम करतं.  सिमला मिरची सॅलडमध्ये, भाज्यांमध्ये घालता येते. यामुळे जेवणाची चव वाढेल आणि ते तुमच्या हाडांसाठीही फायदेशीर आहे. लाल रंगाची ही भाजी तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवून अनेक गंभीर आजारांपासूनही तुमचं रक्षण करते.

आलं पाहिजेच

बदलत्या ऋतूमध्ये आलं किंवा सुंठ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात ते सर्व गुण असतात, जे तुम्हाला ठणठणीत ठेवू शकतात. आल्यामध्ये असणारे अँटी इन्फ्लमेशनरी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म तुमच्या हाडे आणि सांध्यासाठी फायदेशीर आहेत. भाजी आणि चहामध्ये तुम्ही आलं वापरुन सांधे दुखतात सुजतात त्यावर उपाय करु शकता.

कांदा लसूण

कांदा आणि लसूणमध्ये सल्फर असतं. लसूण आणि कांदा कोणत्याही पदार्थाची चव वाढवतात. परंतु एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) च्या संशोधनानुसार, लसूण आणि कांद्यामध्ये भरपूर सल्फर कंपाऊंड असतात, जी सूज आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. कांदा लसूण थोड्या प्रमाणात रोज जेवणात कच्चे खायला हरकत नाही. तर मित्रांनो, आपल्या हाडांचं आरोग्य महत्त्वाचं आहे त्यांना जपा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories