डायबिटीस मुळे लिव्हर खराब होण्याचा धोका वाढतो डायबिटीस असेल तर लिव्हरची अशी काळजी घ्यावी.

डायबिटिस च्या रुग्णांना यकृताचे/ लिव्हरचे आजार होण्याची शक्यता असते, डायबिटीसमुळे तुमचं लिव्हर निकामी होऊ शकतं. प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या. असंतुलित आहार आणि खराब जीवनशैलीमुळे लोकांमध्ये मधुमेह होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मधुमेह म्हणजेच डायबिटिस ही एक स्थिती आहे जी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवते, परंतु ती केवळ एवढ्यापुरती मर्यादित नाही. डायबिटिसमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

डायबिटिस असलेल्या रुग्णांना हृदयाशी संबंधित आजार तसेच यकृताशी संबंधित गंभीर समस्यांचा धोका असतो. आहार, जीवनशैली याशिवाय शरीराच्या आरोग्याशी निगडीत परिस्थितीही डायबिटिस च्या आजाराला कारणीभूत आहे. अनेक संशोधन आणि अभ्यासांनी देखील पुष्टी केली आहे की मधुमेही रुग्णांना यकृताचे नुकसान होऊन लिव्हर सिरोसिस आणि लिव्हरच्या इतर गंभीर समस्यांचा धोका असतो. 

टाइप 2 डायबिटीस असलेल्या लोकांना लिव्हर रोगाचा धोका जास्त असतो. त्यामुळे डायबिटिस च्या रुग्णांनी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काही महत्त्वाची खबरदारी घ्यावी. ही खबरदारी आहार आणि जीवनशैलीशी संबंधित असू शकते.

डायबिटीस आणि लिव्हरचे आजार

3 127

टाइप 2 डायबिटीस असलेल्या रुग्णांना लिव्हरच्या अनेक गंभीर आजारांचा धोका असतो. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा धोकाही वाढतो. हा आजार मद्यपान न करणाऱ्या लोकांनाही होऊ शकतो. 

ही समस्या टाइप 1 आणि टाईप 2 या दोन्ही रुग्णांमध्ये दिसून येते. याशिवाय शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेही रुग्णांमध्ये नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (NASH) आजाराचा धोका वाढतो, त्यामुळे भविष्यात यकृताचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. डायबिटिस च्या रुग्णांनी योग्य आहार आणि चांगली दिनचर्या पाळली नाही तर त्यांना यकृताचा लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर खराब होण्याचा धोकाही असतो.

डायबिटिस च्या रुग्णांमध्ये लिव्हर डॅमेजची लक्षणे

4 127

डायबिटिस च्या रुग्णांमध्ये, यकृताशी संबंधित समस्या असताना सुरुवातीच्या काळात काही लक्षणे दिसून येतात. यकृत निकामी होण्याची लक्षणे योग्य वेळी ओळखली गेली तर पुढील गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस यासारख्या समस्या मधुमेही रुग्णांमध्ये आढळतात. जर तुम्हाला डायबिटिस च्या समस्येमध्ये लिव्हर संबंधित समस्या असतील तर तुम्हाला ही लक्षणे दिसू शकतात.

  • पचनाचा त्रास होतो
  • ओटीपोटात आणि लिव्हर मध्ये तीव्र वेदना.
  • टाइप 2 डायबिटिसचा धोका.
  • त्वचा आणि डोळे पिवळसर होणे.
  • सतत थकवा जाणवतो.
  • अचानक वजन कमी होणे

डायबिटिस मध्ये लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी हे उपाय करा

5 126

डायबिटिस च्या आजारात आहार आणि जीवनशैलीचा सर्वाधिक परिणाम होतो. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घ्यावी. डायबिटीजमध्ये खाण्याशी संबंधित निष्काळजीपणामुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे या आजारात डॉक्टरांचा सल्ला नेहमी पाळावा. कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवल्याने तुम्हाला या समस्येत फायदा होतो. डायबिटिस च्या आजारात लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

लिव्हर चे आजार टाळण्यासाठी डायबिटिस च्या रुग्णांनी वेळोवेळी रक्तातील साखर तपासली पाहिजे.

  • मद्यपानावर नियंत्रण ठेवा.
  • शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवा.
  • वजन वाढू देऊ नका.
  • उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
  • धुम्रपान टाळा.

तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यास मधुमेही रुग्णांना यकृताशी संबंधित समस्या टाळता येतात. डायबिटिस च्या रुग्णांना लिव्हर चे गंभीर आजार होण्याचा धोका असतो, वेळीच लक्ष न दिल्याने तुम्हाला लिव्हर खराब होणे किंवा लिव्हर निकामी होण्याच्या भयंकर आजारांना आमंत्रण मिळेल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories