एक चमचा हे मिश्रण देईल पोटाच्या गॅसपासून मुक्ती…

मानवी जीवनातील माणुस हा सद्या पैशाच्या मागे इतका लागला आहे की, त्याने स्वतः च्या आरोग्यकडे लक्ष राहिले नाही. बदलत्या काळानुसार माणसाचे जीवनशैली बदलली आहे. त्यामध्ये झोप पूर्ण न होणे , अवेळी जेवण, व्यायामाची कमतरता, फास्ट फूडच्या जास्त प्रमाणात आहारी जाणे या कारणामुळे माणसाला पोटाचे विकार होत आहेत.

त्यामुळे त्याला गॅस तयार होणे, सतत अपचनचा त्रास यासारखे आजारना बळी पडत आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही हे घरगुती काही वस्तू वापरून एक मिश्रण तयार करून घ्यावे  त्याने तुम्हाला या आजारावर नियंत्रण ठेवता येईल.

आजकाल पोटात गॅस होणे एक सामान्य गोष्टी झाली आहे आणि हे कोणत्याही वयाचा माणसाला होऊ शकते. पण यावर वेळीच उपचार केले नाही तर हे मोठे नुकसान करू शकते.

याचे कारणे सहसा अवेळी जेवण, करपे ढेकर , तिखट आणि मसालेदार पदार्थ अति प्रमाणात सेवन, अवेळी झोपणे, पाणी कमी पिणे, डाळ, बटाटे, कोबी, भात याचे अधिक प्रमाणात सेवन करणे या गोष्टीमुळे पोटातील गॅस निर्माण होण्याची शक्यता असते.

तसेच पोटाचे विकार म्हणजे गॅस निर्माण झाल्यावर काही लक्षणे दिसतात ते म्हणजे पोटात आणि पाठीत सतत दुखणे, पोट साफ न होणे, नीट झोप न होणे, सारखे आळस किंवा थकवा येणे, कमी भुका लागणे, छातीत दुखणे, छातीत धडधड होणे, छातीत कायम दुःखेने, हातची नाडी कमकुवत होणे, चक्कर येणे हे लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

सर्वात आधी तुम्ही 3 ते 4 चमचा जेवणघरातील ओवा घ्यावा आणि तेवढ्याच मात्रेच काळे मीठ घ्या आणि या दोन्हीची पावडर करून एकत्र मिश्रण एकजीव करून घ्या आणि ते रोज अर्धा चमचा गरम पाणी किंवा मध बरोबर घ्यावे. यामुळे याचे रोज  सेवन दिवसातून दोनदा करावे.

या पावडरीला बंद डबीत ठेवा आणि रोज जेवण झाल्यावर हे मिश्रण घ्या  आणि बरे वाटल्यावर हे घेणे बंद करावे. पण हे रोज मिश्रण घेत असताना काही सावधगिरी पाळणे गरजेचे असते. ओवाचा अति सेवन केल्यास जीभ खवखवते , डोकेदुखी, उलटी किंवा ऍलर्जी होऊ शकते . 

तसेच दुसरा उपाय म्हणजे पोटाच्या गॅसला कमी करण्यासाठी लवंग खुप उपयुक्त ठरते. या लवंग मध बरोबर रोज घेतल्याने हे समस्या दूर होते. कारण आयुर्वेदिक औषध म्हणून याची ओळख आहे.

तसेच लिंबूचा रस आणि मुळा ही पालेभाजी खाल्याने गॅस कमी होण्यास मदत होते तसेच खाल्लेले अन्न पचन होण्यास मदत होते. रोज सकाळी गरम पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास अपचन आणि गॅस ची समस्या दूर होते. पोटाचे विकार हे पाण्याच्या अभावाने होत असतात.

हे सर्व उपाय घरगुती वापरातील काही वस्तू वापरून करायचा आहे त्यामुळे याने काही साईड इफेक्ट होणार नाही.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories