तुमचा जोडीदार सुद्धा घरगुती हिंसाचार करतो का? त्यातून बाहेर कसं पडायचं ते शिका.

लग्नानंतर आपल्यासोबत घरगुती हिंसाचार करणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही ही पावले त्वरित उचलू शकता.

तुमचा जोडीदार देखील घरगुती हिंसाचार करतो का? त्यातून बाहेर पडायचं?

3 18

आज सर्वजण सुशिक्षित आहेत. सर्व नियम आणि कायदे असतानाही घरांमधील घरगुती हिंसाचार पूर्णपणे नष्ट झालेला नाही. लग्नासारख्या नात्याबद्दल बोलताना पती-पत्नीचे नाते सुदृढ आणि निकोप असलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या जोडीदाराला आदर देणे खूप महत्वाचे आहे. परस्पर समंजसपणा आणि प्रेमाच्या आधारावर नात्याचा पाया रचला जातो.

जर कोणत्याही कारणास्तव हिंसक वर्तन होत असेल तर, आपण शक्य तितक्या लवकर अशा संबंधातून बाहेर पडणे चांगले आहे. कौटुंबिक हिंसाचाराला फक्त महिलाच बळी पडतात, असं नाही.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पत्नी पतीसोबत घरगुती हिंसाचार करताना दिसत आहे. घरगुती हिंसाचार कुणावरही होऊ शकतो. तुम्हीही अशा अनुभवातून जात असाल तर या लेखात सांगितलेल्या गोष्टींचा विचार करा.

संवाद आवश्यक आहे

4 18

जर तुम्ही घरगुती हिंसाचाराला बळी पडला असाल तर तुम्हाला दुसऱ्या संधीची वाट पाहण्याची गरज नाही. अलीकडे आलेल्या अभिनेत्री तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ चित्रपटात असं दाखवण्यात आलं होतं की, घरगुती हिंसाचार हा एकदा किंवा अनेक वेळा झाला, तो चुकीचा आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं गैरवर्तन सहन करण्याची गरज नाही. नातेसंबंध ताबडतोब संपवू नका त्याआधी संवादातून समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या.

कायदेशीर मदत मिळवा

5 14

तुम्हाला कायदेशीर मदत हवी असल्यास सरकारशी संपर्क साधा. कायदेशीर मदत घ्या. आजच्या काळात आपत्कालीन खटले फास्ट ट्रॅक कोर्टात सोडवले जातात. यामध्ये पीडितेला तातडीने न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक हिंसक घटना घडली असेल तर मदत घ्या.

जोडीदाराचं हिंसक वर्तन ओळखा

6 10

सुरूवातीच्या काही दिवसात कुठल्याही कारणाने तुमच्या जोडीदाराला जास्त राग येणे, मारणे किंवा तुमचा अपमान करणे यासारख्या सवयी नाहीत ना ? अनेक वेळा महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये गप्प राहून सर्व काही सहन करतात.

हे चुकीचं आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला पहिल्या हिंसाचारालाच जबरदस्त उत्तर दिलंत तर कदाचित पुन्हा असं कधीच होणार नाही. बेरोजगारी आणि अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे अनेक जोडीदार घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. हे थांबवण्याची गरज आहे.

घरगुती हिंसाचार कसा टाळायचा?

7 8

घरगुती हिंसाचारामुळे व्यक्तीच्या मनःस्थिती, आरोग्य, झोप, रोजचं जगणं सगळ्यावर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी जाणून घ्या टिप्स

  • जोडीदाराच्या कोणत्याही वाईट सवयी सहन करू नका.
  • सुरुवातीला प्रेमाकडे पाहून दुर्लक्ष करू नका. खरं प्रेम हे एकमेकांबद्दलच्या आदरानेच सुरु होतं.
  • पती-पत्नी प्रेमळ नाहीतर साध्या संवादातून नातं टिकवून ठेवू शकतात.
  • एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम ठेवा.
  • महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुधारा.

कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना पाहिल्या तर त्यात महिला, मुले आणि वृद्ध अधिक बळी पडतात. कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी त्यासंबंधीचे कायदे आणि जनजागृती होणे आवश्यक आहे.

जर तुम्ही एक महिला असाल आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत कायदेशीर मदत हवी असेल, तर तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) सुरु केलेल्या नॅशनल हेल्पलाइन नंबर 0721-7735372 वर कॉल किंवा व्हॉट्सअॅप मेसेज करू शकता. याशिवाय, तुम्ही केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या पोलीस हेल्पलाइन क्रमांक 1091 वर कॉल करू शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories