डेंग्यू-मलेरिया झाला तर? आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्या ह्या 5 सोप्या टिप्स फॉलो करा आणि डेंग्यू-मलेरियातून लवकरात लवकर रिकव्हर व्हा.

पावसाळा आला की आनंद आणि आजार हातात हात घालून वळचणीला येतात. त्यात डेंग्यू-मलेरिया झाला की पुन्हा पूर्वीसारखं म्हणजेच पूर्ण रीकव्हर व्हायला वेळ लागतो. कारण डेंग्यू-मलेरिया झाल्यानंतर शरीरात खूपच अशक्तपणा आणि सुस्ती येते. अशा परिस्थितीत, रुजूता दिवेकर ह्यांनी सर्वांच्या हितासाठी दिलेल्या या टिप्स वापरुन तुम्ही लवकर बरे होऊ शकता.

डेंग्यू आणि मलेरिया होण्यामागची कारणं

THUMBNAIL
मादी एनोफिलीस

डेंग्यू आणि मलेरिया हे गंभीर आजार आहेत जे पावसाळ्यात होतात. खरं तर, पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला सांडपाणी जमा होतं. मग त्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांच्या अळ्या वाढतात. मलेरिया प्लाझमोडियममुळे होतो. हा एक प्रकारचा परजीवी आहे जो मादी एनोफिलीस डासांच्या चाव्याने पसरतो.

3 11
एडीस डास

सामान्यतः डास चावल्यानंतर 8-25 दिवसांनी तुम्ही मलेरियाची लक्षणे पाहू शकता. दुसरीकडे डेंग्यू हा एडीस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यू विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला चावल्यानंतर हे डास इतरांना चावून रोग पसरवतात. आजकाल सर्वत्र डेंग्यू आणि मलेरिया ग्रस्त लोकांची संख्या वाढली आहे.

डेंग्यू आणि मलेरिया पासून लवकरात लवकर बरं होण्यासाठी रुजुता दिवेकर काय म्हणतात?

4 11

अलीकडेच, सेलिब्रिटी पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांनी ह्या आजारातून लवकर रीकव्हर होण्यासाठी, अशा रुग्णांसाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. ह्या टिप्सची खास गोष्ट अशी आहे की त्या खूप सोप्या आहेत आणि यापैकी बऱ्याच गोष्टी तर तुमच्या घरातच मिळतील. तर, हे आहेत डेंग्यू मलेरियापासून लवकर पूर्वीसारखं ठणठणीत होण्यासाठी काही उपाय

डेंग्यू आणि मलेरियापासून लवकर रीकव्हर होण्यासाठी रुजुता दिवेकर ह्यांच्या टीप्स

सकाळी 1 चमचा गुलकंद घ्या

5 11

डेंग्यू आणि मलेरिया झाला असेल तर पोटाशी संबंधित अनेक त्रासही सुरु होतात. जसं की आंबटपणा येतो आणि मळमळ वाटते. अशा स्थितीत पोटासाठी गुलकंद खाण्याचे अनेक फायदे आहेत. चमचाभर गुलकंद पोट थंड करतो. त्याने मळमळ थांबते आणि मूड रीफ्रेश होतो. ताप आणि औषधांमुळे वाढणारं तापमान कमी करण्यात देखील मदत करतो.

गुलकंद घेण्याचा एक फायदा असा आहे की यामुळे सुस्ती, खाज सुटणे, शरीर दुखणे, थकवा तसेच तळवे आणि तळव्यांतली जळजळ कमी होते. डेंग्यू आणि मलेरियापासून लवकर बरं होण्यासाठी आजारी व्यक्तिने सकाळी किंवा जेवणा दरम्यान 1 चमचा गुलकंद घ्या.

हळद, केशर आणि जायफळ घालून दूध प्या.

6 11

दूध प्रतिकारशक्ती वाढवणारं पूर्णान्न आहे. डेंग्यू आणि मलेरियापासून लवकर बरं होण्यासाठी दूध गरजेचं आहे. सर्वप्रथम, दूध आपल्या शरीरातील प्लेटलेट वाढवायला मदत करतं. आजारी व्यक्तीला शरीरात ताकद देण्याचे काम दूध करते. पण डेंग्यू आणि मलेरियामध्ये तुम्हाला खास दूध पिण्याची गरज आहे. त्यासाठी,

  • 1 ग्लास दुधात 1 ग्लास पाणी मिसळा.
  • नंतर त्यात एक चिमूटभर हळद घाला.
  • आता 2-3 केशर कांड्या घाला.
  • ह्यात थोडं जायफळ क्रश करून मिक्स करा.
  • दूध अर्धे होईपर्यंत उकळवा आणि गॅस बंद करा.

आता चवीनुसार साखर घाला आणि थोडे थंड झाल्यावर हे दूध प्या. हे दूध शरीरातील जळजळ कमी करेल आणि डेंग्यू आणि मलेरियामुळे होणाऱ्या शरीरातील तीव्र वेदनांपासून आराम देईल.

राईस कांजी किंवा राईस सूप

7 10

तांदळाच्या सूपला दक्षिण भारतात तांदळाची कांजी म्हणतात. वास्तविक, ते त्या आजारी लोकांना दिलं जातं ज्या लोकांच्या शरीरात पाण्याची कमतरता असते. असे घडते की डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांमध्ये पाण्याची कमतरता असते किंवा शरीरात इलेक्ट्रोलाइट्स असतात. तसच तुम्हाला भूक लागत नाही. अशा सर्व परिस्थितीत तांदळाचंसूप खूप फायदेशीर आहे. हे डीहायद्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्सचे नुकसान टाळते आणि भूक सुधारते.

असं तांदळाचं सूप किंवा पेज बनवण्यासाठी: तांदूळ पाण्यात थोडे जास्त उकळवा. जणू ते पाण्यात विरघळल्यासारखे होतील. नंतर त्यात काळं मीठ किंवा रॉक सॉल्ट, चिमूटभर हिंग आणि तूप घालून मिक्स करा. आता दर काही तासांनी हे सूप किंवा पेज पीत रहा.

पाणी पीत रहा

8 9

डेंग्यू आणि मलेरियामध्ये शरीरात पाण्याची कमतरता इतकी वाढते की त्यांच्या लघवीचा रंग पिवळा होतो. अशा परिस्थितीत तुम्ही सतत पाणी पिणं चालू ठेवा. पाणी प्यायल्याने पिवळी लघवी होणार नाही आणि त्याचवेळी तुम्हाला लघवीमध्ये जळजळ होणार नाही. यासाठी दिवसभर पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि हळू हळू पाणी प्या.

सुप्त बद्धकोनासन करा

9 6

सुप्त बद्धकोनासन हे योगासन केल्याचा फायदा असा आहे की यामुळे शरीरातील वेदना कमी होतात. तसच, ते पाठ, मान आणि मणक्यासह संपूर्ण शरीराला ताण देते. जर तुम्ही डेंग्यू आणि मलेरियापासून बरे झाल्यानंतरही नियमितपणे सुप्त बद्धकोनासन करत राहिलात, तर तुम्हाला रोगानंतर येणारी शरीरातील अशक्तपणा किंवा कमजोरी, थकवा पळून जाईल.

अशाप्रकारे, या 5 टिप्स फॉलो करून तुम्ही डेंग्यू आणि मलेरियापासून लवकर बरे होऊ शकता. आणि लक्षात ठेवा की ह्यासोबत तुमची औषधं, फळं इ. घेत रहा. डेंग्यू-मलेरिया झाल्यानंतर शरीरात येणारा अशक्तपणा आणि सुस्ती कमी करण्यासाठी हे उपाय कायम तुम्हाला मदत करतील.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories