हिवाळ्यातील आजारांपासून दूर राहा रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे ज्यूस प्या.

मंडळी,  हिवाळा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप गरजेचं आहे. कारण यावेळी हंगामी आजारांचा धोका खूप वाढतो. अशा परिस्थितीत, आजारांचा सामना करण्यासाठी, आपण आहारात काही औषधी ज्युस प्यायला हवेत. हे खूप आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासोबतच हे ज्यूस शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासही मदत करतात. ज्याने रोग होण्याआधी आपण स्वतःला मजबूत ठेवतो.

हे ज्युस शरीर निरोगी ठेवतात आणि कोणताही रोग होऊ देत नाहीत. हे सर्व ज्युस शरीराला व्हायरल फ्लूपासून वाचवतात. चला ह्या औषधी ज्युसबद्दल जाणून घेऊया.

संत्रा आणि तुळशीचा ज्यूस

संत्रा आणि तुळशीचा ज्यूस अनेक आजरांवर मात करायला मदत करतो. हा संत्रा तुळस ज्यूस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून मौसमी आजारांपासून शरीराचं रक्षण करतो.. तुळशीच्या ज्यूस प्यायल्याने शरीरात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. संत्र्याचा ज्यूस त्वचेला तजेलदार बनवण्यासही मदत करतो. तुम्ही सकाळी नाश्त्यासोबत संत्रा आणि तुळशीचा ज्यूस सहज पिऊ शकता.

काकडी आणि पालक ज्यूस

काकडी आणि पालकाचा ज्यूस  शरीराला मजबूत बनवतो आणि शरीराला दीर्घकाळ हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. अनेक वेळा हिवाळ्यात तहान कमी लागते. अशा वेळी काकडीचा ज्यूस  प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि त्वचाही चमकदार होते. तर दुसरीकडे काकडीचा ज्यूस प्यायल्याने पचनालाही मदत होते. दुसरीकडे, पालकाचा ज्यूस  प्यायल्याने बीपी नियंत्रित राहण्यात मदत होते आणि स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते. हे दोन ज्यूस पिऊन केल्याने शरीर निरोगी राहतं.

गाजर आणि बीटचा ज्यूस

गाजर आणि बीटचा ज्यूस  आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरातील कमकुवतपणा दूर करून रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. गाजर आणि बीटच्या ज्यूसमध्ये भरपूर फायबर असतं जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. गाजर आणि बीटचा ज्यूस  प्यायल्याने हिमोग्लोबिनही वाढतं. जर तुमच्या पोटात बद्धकोष्ठता होत असेल तर गाजर आणि बीटचा ज्यूस  नियमित प्या. यामुळे बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत होईल.

हे सर्व ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हिवाळा सुरू होण्यापूर्वी प्यायला सुरूवात करा. बघा अखंड हिवाळा तुम्ही ठणठणीत राहाल. परंतु तुम्हाला कोणताही आजार असल्यास डॉक्टरांना सांगूनच प्यायला सुरूवात करा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories