पावसाळयात काय खावं आणि कसं खावं जेणेकरुन पावसाळ्यात पोटाचा त्रास कमी होईल.

पावसाळा जवळ आला की, लोक प्रवास आणि ट्रेकिंगला जाण्याचे बेत आखू लागतात. यासोबतच लोक भजी, पाणीपुरी आणि भेळसारख्या मसालेदार आणि खमंग स्नॅक्सचाही आस्वाद घेतात. मात्र, पावसाळ्यात खाण्याच्या सवयी आणि तापमानात होणारे बदल लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम करतात.

पावसाळ्यात पोटाचा त्रास वाढू शकतो आणि त्यामुळे जठराची समस्या, पोट फुगणे आणि पोटात पेटके येऊ शकतात. हे सगळे पावसाळी त्रास टाळण्यासाठी पावसाळ्यात खाण्या पिण्याच्या संबंधित काही खबरदारी घ्यायलाच हवी.

पावसाळ्यात खाण्यापिण्याशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरुन पावसाळ्यात पोटाचा त्रास कमी होईल.

हायड्रेटेड रहा

3 59

दिवसभरात 8-10 ग्लास पाणी पिऊन, तुम्ही शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर काढू शकता, जे तुमच्या आतडे, पचनसंस्था आणि इतर कार्यांमध्ये मदत करते. म्हणूनच, दररोज 2-3 लिटर पाणी प्या आणि त्यासोबत हर्बल चहा, नारळ पाणी आणि घरगुती लिंबू सरबत देखील पिऊ शकता.

हलकं सुपाच्य जेवण घ्या

4 59

पावसाळ्याच्या दिवसात लोकांची भूक वाढू शकते आणि वारंवार ओलेपणामुळे, लोक चहा पिण्याची आणि गरम नाश्ता खाण्याची इच्छा करतात. पण, समोसे, भजी आणि चहा-कॉफीमुळे पचनक्रिया मंदावते आणि अन्न सहजासहजी पचत नाही. यामुळे पोट फुगणे, पोटात गॅस होणे, आम्लपित्त आणि अपचन असे पोटाचे त्रास होऊ शकतात.

आतड्यांची काळजी घ्या

5 53

निरोगी आतड्यांसह संपूर्ण शरीर निरोगी ठेवणे सोपं आहे आणि पावसाळ्यात आतड्याला अधिक काम करावे लागतं. म्हणूनच, अशा गोष्टी खा जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

दही, ताक आणि लोणी यासारख्या पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स आढळतात आणि ते खाल्ल्या प्यायल्याने आतड्याला फायदा होतो. रोजच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा.

पावसाळयात ह्या गोष्टी टाळा

6 44

पावसाळ्यात अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत ज्या पचनसंस्थेसाठी अपायकारक ठरू शकतात. याशिवाय पावसाळ्यात दूषित पाणी किंवा दूषित अन्न खाल्ल्याने कॉलरा, डायरियासारखे आजारही वाढतात. म्हणूनच पावसाळ्यात साखर, सीफूड आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा कारण ते पचनसंस्थेला नुकसान पोहोचवू शकतात.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories