स्मार्ट मंत्र! जर तुम्हाला तुमची काम करण्याची क्षमता वाढवायची असेल तर ह्या 6 गोष्टी रोज करा, राहाल सगळ्यांत यशस्वी.

जर तुम्हाला तुमची काम करण्याची क्षमता वाढवायची असेल आणि कामाच्या ठिकाणी, घरात, कॉलेज मध्ये बेस्ट द्यायचं असेल तर तुम्ही मेंदूसाठी काही खास ट्रिक्स करणं महत्त्वाचं आहे. ज्याने तुम्ही बरोबरच्या लोकांपेक्षा वेगाने पुढे जाल.

नेमकं काय होतं?

3 37

तुमच्या लक्षात यायला लागलंय का की ऑफीसमध्ये आणि घरातही काही लोक इतर लोकांपेक्षा नेहमीच आनंदी असतात आणि त्यांची सर्व कामे वेळेपूर्वी करतात आणि त्यांची काम करण्याची पध्दत आणि प्रोडक्टीव्हीटी इतरांपेक्षा चांगली असते? ह्यामागे काय कारण आहे माहीत आहे का तुम्हाला?

तर ह्याच उत्तर म्हणजे त्यांची मानसिक क्षमता, जी त्यांना इतरांपेक्षा चांगली बनवते. आपण सर्वजण स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार आणि व्यायामाकडे लक्ष देतो. पण मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण त्याकडेही लक्ष देतो का?

लक्षात ठेवा की निरोगी शरीरासोबत निरोगी मन असणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा मिळेल आणि आपली उत्पादकता वाढेल.

ब्रेन प्लास्टिसिटी ही काय गंमत आहे बरं?

4 35

मेंदूची उत्पादकता कालांतराने बदलू शकते, ज्याला वैद्यकीय भाषेत आपण मेंदूची लवचिकता किंवा ब्रेन प्लास्टिसिटी असेही म्हणतो. वयोमानानुसार तुमची बुध्दी तीक्ष्ण ठेवण्यासाठी मेंदूला रोजच्या व्यायामाची गरज असते. तरच माईंड प्रोडक्टीव्ह बनेल. म्हणजेच मेंदूचे व्यायाम केल्याने तुमचा मेंदू अधिक तीक्ष्ण होतो.

चला तर मग जाणून घेऊया तुमची मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता आणि सगळ्या लोकांच्या पुढे राहू शकता. अशी वाढवा तुमची ब्रेन पॉवर

मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी दुपारी एक डुलकी घ्या

5 35

जर तुमची झोप चांगली असेल तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते. पण अनेकदा कामाचा ताण आणि डेड लाईनमुळे दिवसाच्या अर्ध्या दिवसातच तुम्हाला थकवा जाणवू लागतो. त्यामुळे अर्ध्या दिवसानंतर थोडी झोप घेणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

जर तुम्हाला तुमचं मन एका कामावर केंद्रित करायचं असेल आणि तुमची एकाग्रता वाढवायची असेल तर दिवसातून एकदा झोप घ्या. यामुळे तुमच्या मनाला विश्रांती मिळते. जेव्हा तुम्ही ते काम पुन्हा करत राहता तेव्हा तुमचा मेंदू अधिक चांगले काम करू लागतो. ही अर्ध्या तासाची झोप तुमचं कुठलीही समस्या सोडवण्याचं कौशल्य देखील वाढवेल.

संगीत ऐकल्यानेही बुध्दी वेगाने काम करेल

6 34

तुम्ही संगीत ऐकल्यास, ते तुमच्या कामाची प्रोडक्टीव्हीटी सुधारते आणि तुमच्या मेंदूचे कार्य पूर्वीपेक्षा चांगले करते. संगीत तुमचे मन शांत करू शकेल. तुम्हाला एखादं काम पूर्ण करायचं असेल पण तुम्हाला करावसं वाटत नसेल, तर तुम्ही काही पॉवर गाणी ऐकू शकता, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा मिळते. याशिवाय, जर तुम्ही एखाद्या कामात पुन्हा-पुन्हा अयशस्वी होत असाल, तर मोटिव्हेशनल एनर्जीटिक गाणी ऐकून तुम्ही स्वतःला चांगले अनुभवू शकता.

ध्यान केल्याने मेंदूची क्षमता वाढते

7 33

ध्यान ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मनावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकता. जर तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवायला शिकलात तर तुम्हाला हवे ते आणि हवे तेव्हा तुम्ही करू शकाल. तुम्ही दररोज 10 मिनिटे ध्यान करा. यासोबतच तुम्ही तुमच्या श्वासोच्छवासाची काळजी घ्या आणि दीर्घ श्वास घेण्यासारखे व्यायाम दररोज करत राहा.

ब्रेन गेम खेळल्याने मेंदूची प्रोडक्टीव्हीटी वाढते

8 24

कोडी आणि इतर काही प्रकारचे मेंदूचे खेळ खेळल्यानेही तुमचा मेंदू तीक्ष्ण होतो. जर तुम्ही हे एकदा कोडं सोडवाल तर तुमचा मेंदू पूर्वीपेक्षा जास्त अडचणी सोडवण्यास सक्षम होईल आणि पूर्वीपेक्षा अधिक वेगाने काम करेल. प्रत्येक वेळी तुम्ही अशा खेळांचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या क्षमतेत सुधारणा दिसेल.

नवीन सवयी लावा आणि मेंदूची क्षमता वाढवा

9 16

जर तुम्हाला फक्त काही गोष्टी आवडत असतील तर तुम्ही नेहमी त्यात अडकून राहाल. काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तुम्हाला स्वतःहून काहीतरी नवीन शोधण्याची गरज आहे. एखादी नवीन सवय शिकली तर ती शिकण्याचीही इच्छा होईल आणि नवीन कला असेल तर नवीन छंद तुमच्यात जन्माला येईल. मग त्या कौशल्यातून तुम्ही कोणतेही नवीन काम करू शकता.

काही शारीरिक व्यायाम सुध्दा करा

10 8

जर तुम्हाला तुमची बुध्दी आणि मन अधिक तीक्ष्ण बनवायची असेल, तर तुम्ही फक्त मेंदूचे व्यायाम करू नका तर शारीरिक व्यायाम देखील करा. यामध्ये तुम्ही धावणे, एरोबिक्स, डान्स आणि सायकलिंग इत्यादी करू शकता.

हे सर्व व्यायाम केल्याने तुमची लक्ष केंद्रित करण्याची आणि गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता वाढू शकते. आणि एक महिनाभर करून बघा तुम्ही सगळ्या लोकांच्या पेक्षा जास्त पुढे जाल. मग ते ऑफिस असो अथवा घर.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories