झोपायच्या किती तास आधी फळं खावीत जेणेकरुन रात्रीची झोप उडून जाणार नाही. जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ.

झोपायच्या किती तास आधी फळं खायची हे बऱ्याच लोकांना कळत नाही. फळं योग्य वेळी खावीत नाहीतर रात्रीची झोप उडून जाईल! म्हणूनच पोषणतज्ञांकडून जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ! पोषणतज्ञ फळं खाण्याची योग्य वेळ सांगतात जेणेकरुन तुम्हाला फळांमधून मिळणाऱ्या पोषक तत्वांचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल.

आपल्या सर्वांना माहित आहे की फळं खूप पौष्टीक असतात सर्वांगीण आहाराचा एक अतिशय महत्वाचा भाग आहेत. पण कधी खावीत त्याच्या योग्य वेळेबद्दल लोकांमध्ये अनेक समज आहेत, ज्यामुळे लोक ते विनाकारण फळं खायला घाबरतात.

लोकांमध्ये असा समज आहे की आपण रात्री फळे खाणे टाळावे, तर काहींच्या मते सकाळी रिकाम्या पोटी फळं अजिबात खाऊ नयेत. म्हणूनच हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की कोणत्या वेळी फळं खाल्ल्याने तुम्हाला सर्वात जास्त फायदा होईल.

काही लोक म्हणतात की आपण दुपारी 2 नंतर आंबे खाऊ नयेत, तर काही लोक म्हणतात की आपण दुपारी 4 नंतर खाऊ नये. प्रत्येकाची स्वतःची धारणा असते. काहींचं म्हणणं आहे की फळं चुकीच्या वेळी खाल्ल्याने वजन वाढू शकतं.

तर काही लोक म्हणतात की फळं खाल्ल्याने अपचन होऊ शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं आणि डायबिटिस होऊ शकतं हे सांगायलाही लोक चुकत नाहीत. पण यापैकी कोणताही दावा पूर्णपणे सत्य नाही. फायबरचा समृद्ध स्रोत असल्याने, आंब्यामध्ये पोटॅशियम, आहारातील फायबर, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासह अनेक पोषक घटक असतात.

फळं खाण्याची योग्य वेळ कोणती?

3 123

आंबा आणि इतर फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे याबद्दल अनेक समज आहेत, परंतु काही वैज्ञानिक पुरावे आहेत, जे त्याला समर्थन देतात. रात्री फळं खाल्ल्याने त्यातील कॅलरीजचं प्रमाण वाढत नाही आणि ती विषारी स्वरूप धारण करू शकत नाही. त्यामुळे रात्री फळं खाण्याची भीती मनातून काढून टाका.

सर्वच फळं आपल्या शरीराला अनेक फायदेशीर पोषक आणि फायबर पुरवण्याचं काम करतात. म्हणून आहाराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग फळच आहेत.

म्हणूनच दिवसाच्या कोणत्याही वेळी फळ खाणे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. पण तुम्ही झोपण्याच्या 3 तास आधी कोणतही फळं खा जेणेकरून तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories