काकडी आणि कोथिंबिर मिसळून बनवा ही पौष्टिक बॉडी डिटॉक्स स्मूदी, तुमचं वजन वेगाने कमी होईल.

काकडी आणि कोथिंबिरीपासून तयार केलेली स्मूदी आरोग्यासाठी खूप चांगली आहे. नियमित खाऊन आपलं वजन कमी होऊ शकतं. पण कशी बनवायची ही काकडी आणि कोथिंबिर स्मूदी

वजन कमी करण्यासाठी काकडी-कोथिंबीर स्मूदी

3 77

वजन कमी करायचं असेल, तर नियमित व्यायामासोबतच आरोग्यदायी आहार निवडणेही महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी हेल्दी स्मूदीज हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. विशेषत: काकडी आणि कोथिंबीर घालून तयार केलेली स्मूदी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

ह्यामुळे तुमचं पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. यामुळे तुम्ही जास्त खाणे आपोआपच टाळता ज्यामुळे शरीराचं वजन कमी होऊ लागतं.

काकडी आणि कोथिंबीर स्मूदी आहे एवढी पौष्टीक

4 78

ही स्मूदी दोन मुख्य घटक काकडी आणि कोथिंबीर मिसळून तयार केली जाते. उन्हाळ्यात काकडी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्याचवेळी पोट थंड ठेवण्यासाठी कोथिंबीर सुध्दा उपयुक्त आहे. काकडी नियमित खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते.

याशिवाय इतर अनेक प्रकारची पोषकतत्त्वे जसे- व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, फोलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, झिंक ह्यातून मिळतात. याशिवाय कोथिंबीरीत फायबर आणि इतर अनेक पोषक तत्व ह्यात असतात.

ह्या स्मूदीमध्ये कॅलरी आणि फॅटचे प्रमाण खूपच कमी असते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होते तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. जर तुम्ही उन्हाळ्यात वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर काकडी आणि कोथिंबीर घालून तयार केलेली ही आरोग्यवर्धक स्मूदीचे नियमित प्या.

काकडी आणि कोथिंबीरची स्मूदी कशी बनवायची

5 78

आवश्यक साहित्य

  • 2 मध्यम आकाराची काकडी
  • 1 कप कोथिंबीर पाने
  • चवीनुसार रॉक मीठ
  • 1 चिमूटभर काळी मिरी

काकडी आणि कोथिंबीर स्मूदी रेसिपी

6 72

काकडी आणि कोथिंबीर स्मूदी तयार करण्यासाठी, प्रथम काकडी धुवा आणि बारीक कापून घ्या. आता मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यात कोथिंबीर आणि काकडी टाका. त्यानंतर ते चांगले बारीक करून घ्या. आता एका ग्लास ज्यूसमध्ये भरा. यानंतर चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. तुमची स्वादिष्ट स्मूदी तयार आहे. आता नियमित प्या. यामुळे वजन वेगाने कमी होऊ शकतं.

काकडी आणि कोथिंबीर स्मूदी वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर आहे?

7 58
  • काकडीमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेलं राहतंन. अशा प्रकारे तुम्ही जास्त खाणे टाळू शकता.
  • काकडी आणि कोथिंबीरीत कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यात ते प्रभावी ठरते.
  • काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांनी तयार केलेली स्मूदी शरीराला दीर्घकाळ हायड्रेट ठेवते.
  • ही पौष्टीक स्मूदी खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते.
  • काकडी आणि कोथिंबीर यांचं मिश्रण कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यासाठी प्रभावी आहे.
  • कोथिंबिरीच्या पानांमुळे थायरॉईडच्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते.
  • काकडी आणि कोथिंबीर घालून तयार केलेले स्मूदी वापरुन डायबिटिस नियंत्रणात ठेवू शकता.
  • हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही ही स्मूदी खूप फायदेशीर ठरू शकते.

काकडी आणि कोथिंबीर स्मूदी वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. तुम्ही या हेल्दी स्मूदीचा नियमित स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टमध्ये समावेश करू शकता. पण लक्षात ठेवा की तुम्हाला काकडीची कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्मूदी प्या.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories