हे एक तेल 6 फायदे देईल. केस निरोगी, काळेभोर आणि लांबसडक होतील.

तुम्ही केसांसाठी बरीच तेलं वापरली असतील, पण तुम्ही एकदा दालचिनी तेल वापरून बघा. हे वापरण्यासाठी सोपं आहे आणि फायदेही बरेच आहेत.

ज्याप्रकारे दालचिनी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तिचं तेलसुध्दा आरोग्यासाठी अनेक औषधी गुणांनी भरलेलं आहे. दालचिनी तेलामध्ये प्रोसायनिडिन असतात ज्यात दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.

ह्या गुणधर्मांमुळे, दालचिनी फक्त शरीराला अनेक रोगांपासून संरक्षण देत नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. दालचिनी तेल तुमच्या केसांच्या अनेक समस्या दूर करू शकते. ती तुमची टाळू स्वच्छ करते.

बुरशीजन्य संसर्ग कमी करते, टक्कल पडण्याची समस्या टाळण्यासाठी देखील दालचिनी तेल उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे केसांसाठी दालचिनी तेलाचे अनेक फायदे आहेत. आपण ह्या लेखातून केसांसाठी दालचिनी तेल कसे वापरावे हे शिकूया.

अशाप्रकारे दालचिनी तेल केसांसाठी फायदेशीर आहे. वाचा.

खवले आणि पापुद्रे असलेला कोंडा असेल तर

दालचिनीचे तेल खवले आणि पापडी थर असलेला कोंडा झाला तर खूप फायदेशीर आहे. कारण दालचिनीच्या तेलात अँटीफंगल आणि बॅक्टेरियाची वाढ रोखणारे गुणधर्म आहेत जे टाळूच्या इन्फेवशनविरूद्ध लढतात.

दालचीनी तेल तयार करण्यासाठी, दालचिनी आणि खोबरेल तेल एकत्र थोडे गरम करा. त्यात लिंबाचे 2 थेंब घाला. आता संपूर्ण टाळूवर मसाज करत 20 मिनिटे लावून ठेवा. लावल्यानंतर 10 मिनिटे ठेवा. आता हर्बल शॅम्पू लावून केस धुवा.

केस गळत असतील तर

वास्तविक, दालचिनीचे तेल टाळूला उत्तेजित करते आणि ब्लड सर्क्यूलेशन वाढवते. हे केसांच्या मुळांना पोषण देते, ज्याने केसांची मुळे बळकट होतात आणि केस गळणे कमी होत जाते. शिवाय, दालचिनी टक्कल पडण्यावर उपचार करण्यासाठी आणि केसांच्या वाढीला उत्तेजन देण्यासाठी फार पूर्वीपासून ओळखली जाते.

तर, ह्या सर्व फायद्यांसाठी, तुम्ही अशा प्रकारे दालचिनीचा वापर करू शकता. जसं की आपल्याला 2 चमचे शुद्ध ऑलिव्ह ऑईल थोडं गरम कराववं लागेल. नंतर त्यात 1 चमचा बारीक दालचिनी पावडर घालून हेअर मास्क तयार करा. ह्याने काही वेळ तुमच्या टाळूची मसाज करा आणि पुढच्या अर्ध्या तासासाठी तसंच राहू द्या. नंतर, सौम्य शैम्पूने धुवा. केस वाढायला लागतील.

टाळूची जळजळ कमी करण्यासाठी लावा दालचिनीचे तेल

दालचिनीचे तेल अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असते जे फ्री रॅडिकल्सपासून बचाव करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि अतिनील हानी टाळण्यास मदत करते. दालचिनीचे हे सर्व गुणधर्म निरोगी केस आणि निरोगी टाळू देतात.

दालचिनीचे पॉलीफेनॉल नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात जे केसांना मुळांपासून पोषण देतात. टाळूची
जळजळ होत असेल तर, खोबरेल तेल गरम करा. त्यात दालचिनी घालून मिक्स करा. मग हे तेल तुमच्या टाळूवर आणि केसांच्या मुळांवर लावा.

अर्ध्या तासासाठी हलक्या हाताने मालिश करत रहा. त्यानंतर रात्रभर केसांमध्ये दालचीनी तेल राहू द्या. सकाळी आपले केस शॅम्पू लावून धुवा. अशाप्रकारे, नियमित आठवड्यातून 2 वेळा केल्यावर टाळूची सूज पूर्णपणे दूर होईल.

केस लांब वाढवण्यासाठी

केस लांब वाढण्यासाठी हा हेअर मास्क बनवा : तुम्हाला फक्त एक अंडं फेटायचं आहे आणि ते गरम केलेल्या ऑलिव्ह ऑइलमध्ये घालायचं आहे.नंतर त्यात दालचिनी पावडर घालून मिक्स करा. पूर्णपणे मिक्स करून थोडा जाडसर लेप बनवा.

यानंतर, तुम्हाला हा लेप तुमच्या ओल्या केसांमध्ये लावावा लागेल आणि कंगवा फिरवावा लागेल जेणेकरून तुमच्या केसात ढेकूळ राहणार नाही आणि लेप चांगला लागेल. 15 ते 20 मिनिटे केस असेच राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
आठवड्यातून एकदा ह्याचा वापर केल्याने तुमच्या केसांची वाढ चांगली होईल.

कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी

दालचिनी तेल कोरड्या आणि निर्जीव केसांना नव जीवन देऊ शकते. दालचिनीच्या तेलात एक चमचा मध मिसळा.
हवं असल्यास, तुम्ही त्यात अंडी देखील घालू शकता. ह्यानंतर हा पॅक आपल्या केसांना लावा आणि नंतर 15 मिनिटे ठेवा. आणि शॅम्पूने धुवा.

केसांचा रंग सुधारण्यासाठी

केस काळेभोर करण्यासाठी, 1 चमचा बारीक दालचिनी पावडर घ्या आणि ती तुमच्या आवडत्या हेअर कंडिशनरमध्ये मिसळा आणि हे सर्व केसांवर लावा आणि रात्रभर ठेवा. सकाळी कमीतकमी दोनदा माईल्ड शॅम्पूने केस धुवा.

यासोबत केसांमध्ये दालचिनी बारीक करून आणि कोरफड घालूनही लावू शकता. हे मिश्रण केसांना आतून पोषण देईल, केस निरोगी ठेवेल आणि केसांच्या वाढीला मदत करेल. तर, ह्या मार्गांनी तुम्ही केसांसाठी दालचिनीचे तेल वापरू शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories