ॲलर्जीने हैराण झाला आहात! ह्या सोप्या उपायांनी ॲलर्जीतून कायमचे बरे व्हा.

आपण धूळ टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती आपल्या आजूबाजूला असतेच मग आपण हमखास धुळीच्या संपर्कात येतो आणि यामुळे आपण ॲलर्जीला बळी पडतो. धुळीची ॲलर्जी टाळण सोपं नाही. कारण तिची ॲलर्जी आपल्या शरीरात अनेक प्रकारे प्रवेश करू शकते.

म्हणूनच तुम्हालाही ही ॲलर्जीची लक्षणं चला वाचूया, एखाद्या व्यक्तीला धुळीच्या ॲलर्जीमुळे कोणती लक्षणे दिसतात. ह्या ॲलर्जीची कारणे आणि उपायांबद्दल देखील जाणून घ्या.

ॲलर्जी असेल तर ही लक्षणं दिसतात

3 23
  • व्यक्तीचे कान बंद होतात.
  • संक्रमित व्यक्तीला शिंका येतात.
  • नेहमी वाहणारं नाक.
  • डोळ्यात सूज येते
  • संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यात खाज येते.
  • थकल्यासारखे वाटणे.
  • खोकला येतो.
  • घशात खाज सुटणे.
  • व्यक्तीचे डोळे लाल दिसतात.
  • ॲलर्जी असलेल्या व्यक्तीला दम्याची लक्षणे जाणवतात.
  • बंद कान आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे.
  • अशा व्यक्तीचा घसा खवखवणे.
  • चिडचिड वाटणे.
  • डोकं दुखतं
  • ॲलर्जी असलेल्या व्यक्तीच्या त्वचेवर लाल पुरळ येतो.

ॲलर्जीची कारणे

4 23

धूळ, फुलांचे परागकण,प्राण्यांच्या केसांची ॲलर्जी, झुरळे, बुरशी अशा कारणांनी ॲलर्जी येते. धूळ आणि इतर गोष्टींनी येणारी ॲलर्जी टाळण्यासाठी काही टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ह्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

  • जेव्हा तुम्ही घर स्वच्छ करता तेव्हा मास्क वापरा.
  • घरात कोणत्याही प्रकारची गळती त्वरित दुरुस्त करा.
  • धूळ झाडण्याऐवजी ते काढण्यासाठी ओला मॉप वापरा.
  • आपला परिसर स्वच्छ ठेवा.
  • कोणत्याही पाळीव प्राण्याच्या संपर्कात येण्यापूर्वी मास्क घाला.
  • बाहेर जाण्यापूर्वी मास्क घाला.
  • जर घरात कार्पेट असेल तर रोज स्वच्छ करा.
  • घरातील चादरी, उशा इत्यादी गरम पाण्याने धुवा.
  • ॲलर्जी नसली तरी काळी मिरी पावडर सकाळी आणि संध्याकाळी तुपासोबत घ्यावी.

ह्या उपायाने धुळीची ॲलर्जी टाळता येते.

धूळ आणि इतर ॲलर्जीवर घरगुती उपचार

5 23

ॲलर्जी कमी करण्यासाठी मधाचा वापर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. मध थोड्या पाण्यात चांगला विरघळून तो चमचाभर घ्या. मधात सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म आढळतात, जे ॲलर्जीची लक्षणे कमी तुमच्यासाठी औषध ठरतात.

हळदीच्या वापराने धूळ आणि इतर गोष्टींची ॲलर्जी दूर केली जाऊ शकते. एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद मिसळून हे दूध प्या. किंवा कोमट पाण्यात हळद घालून हे पाणी प्या. असं केल्याने ॲलर्जीचा त्रास कमी होऊ शकतो.

पुदीना चहाच्या प्यायल्यामुळे ॲलर्जीचा त्रास दूर होऊ शकतो. पुदीन्याची पाने गरम पाण्यात उकळा आणि गाळून घ्या. ॲलर्जी वर उपाय म्हणून हा पुदिन्याचा चहा प्या.आपण या चहामध्ये मध देखील घालू शकता. पुदीन्याच्या पानांत जंतूनाशक गुणधर्म आहेत, जे ॲलर्जी टाळण्यासाठी प्रभावी आहेत.

ग्रीन टीचे प्यायल्याने सुध्दा धूळ आणि इतर गोष्टींची ॲलर्जी दूर होऊ शकते. एक कप कोमट पाण्यात ग्रीन टी उकळून मध मिसळा आणि तो गाळून प्या. तुम्ही ग्रीन टी च्या उपायाने आपण धूळ आणि इतर ॲलर्जीपासून बरे व्हाल.

धूळ आणि इतर गोष्टींची ॲलर्जी असल्यास तूप आणि गूळ एकत्र मिसळून खाल्ल्याने ॲलर्जी दूर होऊ शकते. एक चमचा तुपात गूळ मिसळा आणि खा. ह्या घरगुती उपायाने धुळीची ॲलर्जी दूर होईल.

तर हे काही काही घरगुती उपाय तुमच्यासाठी धूळ आणि इतर गोष्टींची ॲलर्जी दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. पण त्याआधी ॲlलर्जीची कारणं काय आहेत आणि ॲलर्जीची लक्षणं काय आहेत हे आता आपल्याला माहीत आहेच. आता आपण स्वतःला धूळ ॲलर्जीपासून वाचवू शकता. पण जर उपरोक्त लक्षणे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories