एका महिन्यांत काही किलो वजन कमी करणं वेडेपणा का आहे? तुमच्या हितासाठी जाणून घ्या ह्या लेखातून!

जर तुम्हाला एका महिन्यात वजन कमी करायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर अनेक त्रास सुरु होऊ शकतात.

बर्‍याच लोकांना एका महिन्यात त्यांचे वजन कमी करायचं असतं आणि यासाठी ते खूप प्रयत्न करतात. स्वतःला उपाशी ठेवण्यापासून ते अनेक प्रकारचे डाएटिंग लोक करतात आणि त्यात त्यांना यशही मिळतं. आणि  ते काही किलो वजनही कमी करतात. 

एका महीन्यात किती किलो वजन कमी करणं योग्य आहे?

जर तुम्ही एका महिन्यात 2 ते 4 किलो वजन कमी केले तर ते सुरक्षित आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. पण जर तुम्हाला यापेक्षा जास्त वजन कमी करायचं असेल आणि त्यामुळे तुम्ही काटेकोर डाएट फॉलो करत असाल तर ते तुमच्यासाठी योग्य नाही.

मित्रांनो, खरं तर, एका महिन्यात तुमचं वजन तुम्हाला हवं तितकं कमी होईल. पण हे वजन काही दिवसांसाठीच कमी होईल. तुम्ही संपूर्ण जेवायला सुरुवात करताच तुमचं वजन अधिक वाढेल.

म्हणूनच निरोगी दिनचर्येचं पालन करूनच वजन कमी केलं पाहिजे. यामध्ये तुमचं वजन कमी व्हायला थोडा वेळ लागेल, परंतु ते वजन कायमचं कमी होईल आणि परत वाढण्याची शक्यता कमी असेल.

त्यामुळे एका महिन्यात तुम्ही किती वजन कमी करू शकता हे तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. योग्य खाणं आणि व्यायाम महत्वाचा आहे. त्यामुळे सकस आहार घ्या. खाणे पिणे एकदम बंद करू नका.

आपण डाएटपासून का दूर राहावं?

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएटिंगवर अवलंबून असाल तर तुम्ही चूक करत आहात.  कारण डाएटिंगमुळे कमी झालेलं वजन जास्त काळ टिकत नाही. जोपर्यंत तुम्ही डाएटचं पालन कराल तोपर्यंतच हे वजन कमी राहील. तुम्ही नेहमीप्रमाणे खाणे-पिणे सुरू करताच तुमचे वजन पुन्हा वाढू लागतं. म्हणून, डाएट दीर्घकालीन वजन कमी करण्यासाठी कोणताही फायदा देत नाही.

निरोगी मार्गाने एका महिन्यात किती वजन कमी केले जाऊ शकतं?

तुमचं वजन किती कमी होईल हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं. जसे तुमचं वय, तुमचं लिंग, तुमचे हार्मोन्स आणि तुमची जीवनशैली. 

असं असूनही, प्रत्येक बाबतीत असं दिसून येतं की जेव्हा आपण निरोगी मार्गाने वजन कमी करण्यास सुरवात करतो, तेव्हा पहिल्या काही आठवड्यांमध्ये वेगाने वजन कमी होतं. सुरुवातीला, आपण एका महिन्यात 5 किलो पर्यंत कमी करू शकता. त्यानंतर तुमचे वजन अतिशय संथ गतीने कमी होऊ लागते.  पण जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर एक दिवस तुम्हाला हवे ते फळ मिळेल आणि ते परिणाम कायम राहतील.

1. सतत प्रयत्न करा. थांबू नका.

सुरुवातीला चांगले परिणाम दिसून येतील. पण अशी परिस्थिती येईल जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही प्रयत्न करूनही तुमचे वजन कमी होत नाही. यावेळी तुम्हाला प्रेरणेची आणि उत्साहाची कमतरता असू शकते. तुमच्या मनाला हे सर्व सोडाववसं वाटेल पण हे लक्षात ठेवा की तुम्ही मध्येच सोडलं तर तुम्हाला मिळालेले रिझल्टसुध्दा नष्ट होतील.  त्यामुळे सतत प्रयत्न करत राहा.

2. पोषक आहाराकडे अधिक लक्ष द्या

शरीरासाठी अधिकाधिक पौष्टिक पदार्थ खावेत. स्वतःला उपाशी ठेवण्याऐवजी, भाज्या, प्रथिनयुक्त पदार्थ जसं की दूध, दूधाचे पदार्थ, अंडी ह्या गोष्टींसारख्या आपल्या शरीराला पुरेसे पोषण देऊ शकतील अशा गोष्टी खा. एका वेळी जास्त खाऊ नका आणि जंक फूड देखील टाळा.

3. जेवण भागात विभाजित करायला शिका

आपण एका वेळी काहीही खात नाही आणि एका वेळी खूप खात आहात असे समजू नका. जर तुम्हाला चांगलं जेवण खावसं वाटत असेल तर एकदम खाण्याऐवजी तुम्ही जेवण काही भागात वाटून चार पाच वेळा खा. जेणेकरून तुमच्या शरीराला ते पचायला पूर्ण वेळ मिळेल.

वजन कमी करण्‍यासाठी, तुम्‍हाला दोन महिन्‍यांमध्‍ये किंवा एका महिन्‍यात इतकं वजन कमी असं वेळेचं बंधन ठेवण्‍याची गरज नाही. वजन कमी करण्याची प्रक्रिया ही काही महिन्यांची आहे.  स्वतःला गुंतवून घ्या आणि अशी निरोगी जीवनशैली तयार करा जी तुम्ही तुमच्यासोबत आयुष्यभर घेऊन जाऊ शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories