बीपी पेशंट करता वेगळं असं मीठ मिळतं का? लो सोडियम, सोडियम फ्री आणि अनसॉल्टेड मीठ यात काय फरक आहे, जाणून घ्या कोणतं मीठ खावं?

बीपी पेशंट करता वेगळं असं मीठ मिळतं का? लो सोडियम, सोडियम फ्री आणि अनसॉल्टेड मीठ यात काय फरक आहे, जाणून घ्या कोणतं मीठ खावं?

मीठ किती महत्वाचं?

3 6

आजच्या काळातील सर्वात धोकादायक आजारांपैकी एक म्हणजे रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर. लोकांमध्ये ब्लड प्रेशरची समस्या वाढण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे मीठ जास्त असलेले पदार्थ खाणे. मीठामध्ये सोडियम असतं ज्यामुळे रक्तदाब वाढतो. हे लक्षात घेऊन बाजारात अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ दिसू लागले आहेत, ज्यांच्या पॅकेटवर लो सोडियम, सोडियम फ्री आणि अनसाल्टेड असं लिहिलेलं असतं.

अशी फूड पॅकेट्स पाहून रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ते आरोग्यदायी ठरतील, असा विचार लोक करतात. पण खरंच असं आहे का? चला जाणून घेऊ.

बीपी पेशंट करता वेगळं असं मीठ मिळतं का?

4 4

खरं तर, भारतात वाढत्या हाय बीपी च्या त्रासामुळे, आजकाल बरेच लोक मीठ किंवा कमी सोडियमयुक्त पदार्थांच्या आरोग्यदायी ऑप्शन्सना अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. सोडियम फ्री, कमी सोडियम आणि अनसाल्टेड मीठ कंपन्या लोकांना विविध फायदे सांगून विकत मीठ आहेत.

सोडियम मुक्त मीठ, कमी सोडियम, मीठ न घातलेले आणि टेबल सॉल्ट पदार्थ यांच्यातील फरक जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे जेणेकरून, आपण आपल्या हेल्थ नुसार योग्य मीठ वापरू शकता.

जर आपण प्रथम सामान्य रोजचं मीठ किंवा टेबल सॉल्टबद्दल बोललो तर मीठाचे रासायनिक नाव सोडियम क्लोराईड आहे.  याचा अर्थ सामान्य मीठ सोडियम आणि क्लोराईडच्या मिश्रणापासून बनवलं जातं. सोडियम आणि क्लोराईडशिवाय मीठ तयार होऊ शकत नाही.

जर कंपन्या तुम्हाला सोडियम किंवा सोडियम रहित मीठ विकत असतील तर याचा अर्थ असा होतो की एकतर ते मीठ नाही किंवा त्यात सोडियमची माहिती लपवली गेली आहे. आता बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या मीठांबद्दल आणि त्यामध्ये असलेले सोडियमचे प्रमाण याबद्दल तपशीलवार बोलूया.

 1. सोडियम फ्री

 सोडियम फ्री मीठ म्हणजे, ज्यामध्ये सोडियमचे प्रमाण अजिबात नसते. यामध्ये सोडियम ऐवजी पोटॅशियम क्लोराईड वापरण्यात येत आहे, पण आपण आधीच वाचलं की सोडियम आणि क्लोरीनशिवाय मीठ तयार होऊ शकत नाही, तर सोडियम फ्री मीठ असं काहीही असू शकत नाही. मग तो एक वेगळ्या प्रकारचा घटक बनतो, ज्यामध्ये क्षारता असू शकते, परंतु त्याला मीठ म्हणणार नाही. वास्तविक पोटॅशियम ग्रॅन्युल देखील सोडियमसारखे दिसतात आणि पोटॅशियमला ​​स्वतःचा वास नसतो.

फायदे आणि तोटे

जर सोडियमच्या जागी पोटॅशियम वापर केला असेल तर ते जास्त प्रमाणात खाणं देखील योग्य नाही कारण सोडियमप्रमाणेच पोटॅशियमचे प्रमाणही हाय बीपीच्या रुग्णांसाठी चांगलं नाही. याचं एक कारण असं आहे की यामुळे एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब अचानक सामान्यपेक्षा कमी होऊ शकतो, ही दुसरी गंभीर स्थिती आहे. याशिवाय तुम्हाला अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय सोडियम फ्री मीठ खाणे टाळा.

 2. लो सोडियम मीठ

5 4

लो सोडियम मीठ किंवा कमी सोडियमयुक्त पदार्थात सोडियम कमी वापरतात. सामान्यतः बाजारात उपलब्ध असलेल्या लो-सोडियम क्षारांमध्ये रोजच्या मीठापेक्षा 15% कमी सोडियम असतं.

फायदे आणि तोटे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांचं बीपी काही प्रमाणात स्थिर आहे, ते नियमित चेकअप करून लो सोडियम मीठ खाऊ शकतात, परंतु यामध्येही तुम्हाला खूप काळजी घेणे आवश्यक आहे.  दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमचं बीपी तपासा. जर तुमचं बीपी वाढलं असेल तर तुम्ही लो सोडियम मीठ खाणे सुध्दा टाळा किंवा तुमच्या डॉक्टरांना विचारा.

3. अनसॉल्टेड/ मीठ न घातलेले पदार्थ

7 4

आतापर्यंत आपण काही प्रकारच्या मीठाबद्दल बोलत होतो. पण आजकाल असे काही खाद्यपदार्थही बाजारात आले आहेत, ज्यात खारटपणा आहे, पण ते अनसॉल्टेड आहेत, म्हणजेच त्यात मीठ वापरलेलं नाही, असा दावा असतो.

हाय बीपी चे रुग्ण अनेकदा पौष्टीक असे पदार्थ खाऊ लागतात. पण सत्य हे आहे की सोडियम केवळ मीठातच नाही तर इतर काही घटकांमध्येही काही प्रमाणात असू शकतं.  त्यामुळे जर एखादी व्यक्ती क्षारविरहित पदार्थ खात असेल तर त्यातून सोडियम मिळणार नाही अस गृहीत धरलं तर ते चुकीचं असण्याची शक्यता आहे. असे अनसॉल्टेड पदार्थ खाल्ले तरी धोका आहेच.

फायदे आणि तोटे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही अनसॉल्टेड पदार्थ खाऊ शकता. आपल्याला फक्त त्याच्या प्रमाणाची काळजी घ्यावी लागेल.  वापरल्यानंतर तुम्हाला काही समस्या असल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

कोणतं मीठ खाण्यासाठी योग्य आहे?

8 2

खरं तर, डॉक्टरांच्या मते, उच्च रक्तदाब/ हाय बीपी असलेल्या लोकांसाठी जास्त प्रमाणात मीठ धोकादायक आहे.  याशिवाय मीठाचे जास्त सेवन केल्याने शरीरात पाणी साठते, ज्यामुळे वजनही वाढू शकते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही सामान्य मीठ किंवा इतर कोणत्याही मीठाच्या तुलनेत रॉक सॉल्ट किंवा गुलाबी मीठ वापरू शकता.

खड्याच्या मीठात आयोडीन नसतं, त्यामुळे तुम्ही ते सेवन करत असाल, तर तुम्ही इतर काही पदार्थ खा किंवा तुमच्या डॉक्टरांशी बोलून आयोडीनची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लिमेंट घ्या. उच्च रक्तदाबाचे रुग्ण 4-5 ग्रॅम रॉक सॉल्ट दिवसभरात खाऊ शकतात. याशिवाय जर तुमचा बीपी खूप जास्त वाढला असेल तर तुम्ही दररोज 2-3 ग्रॅम खाऊ शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories