गोजी बेरी फळ गुणकारी भारी ! हे अदभुत फळ त्वचेला तरुण ठेवण्यापासून ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी जगप्रसिद्ध होत आहे. जाणून घ्या काय आहे?

गोजी बेरी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ह्या लेखातून गोजी बेरीच्या काही आश्चर्यकारक फायद्यांबद्दल आपण पाहणार आहोत.

गोजी बेरी हे लहान फळ आहे पण त्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. गोजी बेरीमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हे अतिशय नैसर्गिकरित्या उगवलेले फळ आहे, जे लडाखच्या बाजूला मिळतं. आणि आपल्याकडे फळ बाजारात विकत मिळत नाहीतर ऑनलाईन देखील मिळेल.

ह्या अतिशय औषधी फळाच्या अनेक फायद्यांमुळे देश जगाच्या नकाशावर आला आहे. ह्या फळाला अत्यंत थंड हवामानाची आवश्यकता असते आणि ते हिमालयीन प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते. हेच फळ लायसियम बार्बरा म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या वाळलेल्या स्वरूपात गोजी बेरी 2,000 वर्षांहून अधिक काळ चिनी औषधांच्या रूपात सतत वापरात आहे. गोजी बेरी, ज्याला वुल्फबेरी, फ्रक्टस लिझी आणि गोजी असेही म्हणतात.

गोजी बेरी एवढी पौष्टीक का आहे?

3 2

गोजी बेरी चवीला गोड आहे. ही कच्ची खाल्ली जात असताना, त्याचा संपूर्ण आरोग्यासाठी एक उत्कृष्ट हर्बल टी देखील बनवता येतो. ह्याचा अर्क, पावडर आणि गोळ्या देखील अनेक आरोग्य समस्यांवर औषध म्हणून घेतल्या जातात.

ब्लूबेरी प्रमाणे, गोजी बेरी देखील अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, ज्या शरीराला हानिकारक पदार्थांपासून वाचवतात.  यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. गोजी बेरीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, लोह, जस्त आणि अँटिऑक्सिडंट असतात. तसच आवश्यक अमीनो ऍसिड आणि प्रोटीन सुध्दा असतात. आम्ही तुम्हाला गोजी बेरीच्या इतर फायद्यांबद्दल येथे सांगत आहोत. (Benefits of Goji Berry)

गोजी बेरीचे फायदे (Benefits of Goji Berry)

4 1

गोजी बेरीने अलिकडच्या वर्षांत लोकप्रियता मिळवली आहे, ज्यांना अनेकदा “सुपरफूड” म्हणून ओळखलं जातं. गोजी बेरी हे एक फळ आहे जे मधुमेह, हृदयविकार आणि कॅन्सर  यांसारख्या गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण करते.

हे फळ अकाली वृद्धत्व टाळते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. याव्यतिरिक्त, त्यात कॅरोटीनोइड्स, लाइकोपीन, ल्युटीन आणि पॉलिसेकेराइड्स सारख्या शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. लिंबू आणि संत्र्यापेक्षा गोजी बेरीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आहे. प्रोटीन आणि फायबर व्यतिरिक्त, त्यात तांबे, लोह, सेलेनियम आणि जस्त सारखी खनिजे देखील असतात, जी शरीराच्या विविध भागांसाठी आवश्यक असतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर

5 1

एका संशोधनानुसार, गोजी बेरीमध्ये वाढत्या वयानुसार होणारे डोळ्यांचे आजार आणि दृष्टी कमी होण्यापासून बचाव करण्यासाठी औषधी गुणधर्म आहेत. झेक्सॅन्थिनचे प्रमाण जास्त असल्याने हे अँटिऑक्सिडंट डोळ्यांना होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यास मदत करते.  अतिनील प्रकाश, ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि फ्री रॅडिकल्सपासून डोळ्याचे संरक्षण करते.

गोजी बेरी खा कॅन्सरचा धोका कमी करा

6 1

जर्नल ड्रग डिझाइन, डेव्हलपमेंट अँड थेरपीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, गोजी बेरी ट्यूमरच्या वाढीला रोखते आणि उपचार प्रक्रियेला मदत करते. त्यामुळे कॅन्सरचा रुग्णांना आहारात गोजी बेरीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा

14 2

गोजी बेरी मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे. जरी ती नैसर्गिकरित्या गोड असली तरी ती तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करते. हे एक सुपरफुड आहे, जे टाइप-2 डायबिटिसअसलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. ह्याविषयी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा.

उच्च रक्तदाब/ हाय बीपी नियंत्रित करायला मदत करते

7 1

एका अभ्यासानुसार, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी बेरी किंवा गोजी बेरीचा रस पिऊन रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो.  हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांनी 1 किंवा 2 ग्लास बेरीचा रस दररोज बराच काळ प्यायल्यास त्यांचा रक्तदाब कमी व्हायला मदत होते.

यकृत/लिव्हरचं नुकसान टाळण्यासाठी

8 1

गोजी बेरीचा उपयोग चिनी औषधांचा एक भाग म्हणून यकृत रोग आणि नुकसानांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हे फळ अल्कोहोल-प्रेरित फॅटी लिव्हरची प्रोग्रेस कमी करायला मदत करते.

त्वचेसाठी गोजी बेरी

9

गोजी बेरीमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते.  हा एक अत्यावश्यक घटक आहे जे निरोगी त्वचेला प्रोत्साहन देतो आणि तुम्हाला तरुण आणि चमकदार त्वचा द्यायला मदत करते.

गोजी बेरी त्वचा निरोगी ठेवते

10

गोजी बेरी त्वचेची जळजळ आणि त्वचेचे नुकसान कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करते. हे फळ रोज खाल्ल्यास  वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि तुम्ही तरूण दिसता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories