केस गळत आहेत पण विविध उपाय करून गेलेले केस परत येतात का? केस गळती थांबवण्याच्या उपायांमध्ये कितपत तथ्य आहे.

जेव्हा केस गळू लागतात, केस गळताना पाहिल्यावर आपल्या मनात पहिला प्रश्न येतो, माझे केस गळत आहेत तर गेलेले केस परत येतात का? ह्यासाठी आधी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की केस का गळत आहेत? कारण अनेक कारणांमुळे केस गळणे जसे की एखादा रोग, केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, आनुवंशिकता, आहार इत्यादी कारणांनी केस गळतात.

म्हणूनच आपण ह्या लेखातून जाणून घेऊया की केस गळत आहेत तर गेलेले केस परत येतात का? केस निरोगी ठेवण्यासाठी, त्यांची काळजी आणि निगा खूप महत्वाची आहे. थोडासा निष्काळजीपणा केसांसाठी हानिकारक ठरू शकतो.

योग्य आहार घेऊन गेलेले केस परत येतात का?

गेलेले केस परत येतात का

केसांसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण वेळेच्या अभावामुळे आजकाल लोक फास्ट फूड, तेलकट अन्न, मसालेदार अन्न जास्त खातात. ज्याचा थेट परिणाम केसांवर होतो. पौष्टिकतेची कमतरता, केसांची रचना आणि केसांची वाढ ह्या दोन्हीवर परिणाम करते. ह्याशिवाय, प्रत्येकजण वजन कमी करण्यासाठी धावत असतो, ह्यासाठी, डॉक्टरांचा सल्ला न घेता, लोक स्वतःचा आहार स्वतःच ठरवतात, ज्यामुळे केसांना त्रास सहन करावा लागतो.

तसेच, प्रोटीन्स च्या अभावामुळे टेलोजेन इफ्लुव्हियम होऊ शकते, जे केस गळण्याचे मूळ कारण आहे. त्याचप्रमाणे, नियासिनच्या कमतरतेमुळे देखील ॲलोपेशिया होऊ शकतो. कारण आहारात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, सेलेनियम, लोह, जस्त, नियासिन, फॅटी ॲसिडस्, बायोटिन, अँटिऑक्सिडंट्स इत्यादींचा अभाव ही केस गळण्याची मुख्य कारणं आहेत.

केसांना पोषण देण्यासाठी हरभरा, राजमा, अंडी, मांस, फळे, भाज्या, मसूर, अक्रोड, बदाम, ओट्स, ब्रोकोली, गाजर इत्यादी आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत. म्हणजेच, जर डॉक्टरांनी आहारात पोषण नसणे हे केस गळण्याचे कारण सांगितले असेल तर ह्या सर्वांचा आहारात समावेश केल्याने केस गळणे कमी होते आणि केसांची स्थिती सुधारते. पण ह्याचा अर्थ असा नाही की संतुलित आहार घेतल्याने पातळ केस दाट किंवा जाड होतील. फक्त केसांचं आरोग्य सुधारेल.

सुंदर बनण्यासाठी केशरचना अर्थात वेगवेगळ्या हेअर स्टाइल करत असाल तर..

गेलेले केस परत येतात का

आजकाल केसांना नवा लूक देण्याची स्पर्धा नेहमीच असते. केसांना वेगवेगळे रंग लावणे, हेअर ट्रेसिंग, हेअर स्ट्रेटनिंग, हेअर सेटिंग यासारख्या गोष्टी वापरणे, मग ह्या सोबतच केस गळणेही सुरू होते. अगदी काही लोक जाहिराती पाहून दररोज नवीन शॅम्पू वापरतात, हे केसांच्या मुळांना
नुकसानकारक ठरते. कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की हेअर ड्रायरचा रोजचा वापर केसांना नुकसानकारक आहे आणि तो केसांच्या आरोग्यासाठी चांगला नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींपासून जितके जास्त दूर राहाल तितके केसांचे कमी नुकसान होईल. केस गळणे कमी करण्यासाठी तुम्ही सीरम किंवा कंडिशनर वापरू शकता.

पण जर त्यांच्या वापरामुळे केसांची अंतर्गत रचना खराब झाली, तर केस पुन्हा जुन्या पूर्वीच्या स्थितीत येऊ शकत नाहीत किंवा नवीन केस पुन्हा वाढणार नाहीत.

बराच वेळ उन्हात बसत असाल तर

गेलेले केस परत येतात का

कदाचित तुम्हाला माहित नसेल की सूर्याच्या किरणांतील अतिनील किरणांमुळे केसांचे खूप नुकसान होते. कारण हे केसांचे केराटिन असलेल्या प्रथिनांना नष्ट करते. हे टाळण्यासाठी तुम्ही बाहेर जाण्याच्या वेळी स्कार्फ बांधू शकता किंवा छत्री वापरू शकता, त्यामुळे केसांना उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळू शकते. परंतु जर टेलोजेन, केसांच्या वाढीचा शेवटचा टप्पा, खराब झाला, तर नवीन केस पुन्हा वाढणे कठीण आहे. प्रोटीनयुक्त आहार आणि कंडिशनर लावल्यास केसांचं झालेलं नुकसान काही प्रमाणात भरून निघेल आणि केस वाचू शकतात. आणि कदाचित पुन्हा काही प्रमाणात दाट होऊ शकतात.

प्रसूतीनंतर केस गळणे (गर्भधारणा झाल्यानंतर केस गळणे )

गेलेले केस परत येतात का

गर्भधारणेदरम्यान, केसांच्या वाढीच्या प्रक्रियेत बदल होतो. म्हणजेच या काळात केस गळत नाहीत, त्यामुळे ते दाट दिसतात. पण प्रसूतीनंतर, जेव्हा शरीरात हार्मोन्समध्ये बदल होतो, तेव्हा हे केस जे गर्भधारणेदरम्यान गळले नाहीत, ते गळायला सुरू होते. ह्यासाठी काळजी करण्याची गरज नाही, काही महिन्यांनंतर परिस्थिती सामान्य होते आणि केस वाढण्याची प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरू होते. परंतु यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुम्हाला कोणता गंभीर आजार झाला असेल तर त्या नंतर केस गळू शकतात.

गेलेले केस परत येतात का

कधीकधी अचानक केस खूप गळू लागतात आणि कारण समजत नाही. कारण काही आजार आहेत जे केसांवर थेट परिणाम करतात जसे उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, डेंग्यू, मलेरिया, ऑटो इम्यून रोग, ताण, नैराश्य इ. म्हणून, त्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना नियंत्रणात आणल्यास केस गळणे कमी होऊ शकते आणि स्थिती चांगली झाल्यावर नवीन केस हळूहळू वाढू शकतात.

अनुवंशिकता

गेलेले केस परत येतात का

आनुवंशिकता देखील केस गळण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे. कारण जर कुटुंबातील कोणाला टक्कल पडणे किंवा केसांची समस्या असेल तर त्याचा तुमच्या केसांवरही परिणाम होतो ज्यामुळे नंतर केस गळणे किंवा टक्कल पडणे सुरू होते. म्हणून, केस अधिक गळण्यास सुरुवात होताच, लगेच कारण जाणून घेण्यासाठी, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा.

प्रोटीन युक्त आहार घ्या. ह्यामुळे काही प्रमाणात केस गळणे टाळता येते, परंतु नवीन केसांची वाढ शक्य नाही. तुमच्या वडिलांचे केस जाऊन टक्कल असेल तर तुमचेही केस जाऊन हळूहळू टक्कल पडायला सुरूवात होईल. म्हणून वेळीच काळजी घ्या. अगदी पंचविशीत केस जायला सुरूवात होऊ शकते. ह्यासाठी चांगल्या त्वचारोग तज्ञाला भेटा आणि उपचार घ्या.

कांद्याचा रस घरगुती उपाय म्हणून करत असाल तर..

गेलेले केस परत येतात का

कांद्याचा रस केस गळणे कमी करतो किंवा कांद्याच्या रसाने नवीन केस वाढण्यामागे कोणतही अस्सल तथ्य समोर आलेलं नाही. कारण केस गळण्यामागे बरीच कारणे आहेत आणि कांद्याचा रस प्रत्येक कारणासाठी चालेल असं नाही, कांद्याचा रस हा सगळ्यावर पुरेसा उपाय म्हणून येऊ शकत नाही. म्हणून, हे काही दिवसांसाठी एक प्रयोग म्हणून वापरणे फायदेशीर आहे किंवा केसांना हानी पोहोचवत नाही ना हे पाहण्यासाठी काही दिवस कांद्याचा रस केसांना लावा. नंतरच त्याचा दररोज वापर करा. ह्याचा फायदा काही लोकांना होतो आणि केस गळायचे कमी होतात पण केस पुन्हा उगवल्याचे पुरावे फार कमी आहेत. पण तुम्ही एकदा नक्की वापरून बघा.

नारळ तेलाने चंपी करण्याचा घरगुती उपाय करून गेलेले केस परत येतात का?

गेलेले केस परत येतात का

नारळाच्या तेलाने मालिश केल्याने केसांना खूप फायदा होतो, जसे की केस गळणे कमी होते, नवीन केस येतात, केस गमावलेली चमक परत येते इत्यादी अनेक वर्षांपासून ही धारणा आहे. पण काही डॉक्टर सल्ला देतात की नारळ तेल प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. जर तुमचे तेलकट केस असतील तर नारळाच्या तेलामुळे आणखी नुकसान होईल. नारळ तेल फक्त केसांची कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे, कारण ते केसांचा हरवलेला ओलावा परत मिळवून देते परंतु नवीन केस उगवत नाहीत. तसे काही पुरावे नाहीत. पण तुमचे असलेले केस टिकून राहतात आणि लांब वाढू शकतात.

मिनोक्सिडिल (minoxidil)

गेलेले केस परत येतात का

केस गळत असतील किंवा केस गेले असतील तर ते पुन्हा येण्यासाठी सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या आणि प्रसिद्ध उपचारांपैकी एक म्हणजे मिनोक्सिडिल. हे एक रासायनिक औषध आहे. तुम्ही त्वचारोग तज्ञाला भेटाल तर तो तुम्हाला मिनोक्सिडिल (minoxidil) देतो. हे पातळ तेलासारखं, फोम किंवा शाम्पू पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मिनोक्सिडिलचे अनेक प्रकार देखील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनद्वारे उपलब्ध आहेत.

मिनोक्सिडिलमुळे त्वचेवर जळजळ होणे किंवा टाळूजवळच्या त्वचेवर केसांची नको असलेली वाढ ह्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. जर मिनोक्सिडिल केसांची वाढ पुन्हा सुरू करते किंवा असं मानलं जातं की मिनोक्सिडिल (minoxidil) लावलं तर केस पुन्हा येतात पण ते अनिश्चित काळासाठी वापरणे आवश्यक आहे किंवा तुम्ही लावणं सोडलं तर त्याचे परिणाम कमी होऊ लागतील. आणि पुन्हा केस गळू लागतील.

केस गळण्यामुळे टक्कल पडले असेल तर घरगुती उपाय करण्यात वेळ वाया घालवू नका आणि त्वचारोगतज्ज्ञांकडे जा. तो तुमचे केस आणि टाळू बघेल, तपासेल आणि त्यानुसार औषध आणि उपचार लिहून देईल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories